"गोपाळकाला खा सुदृढ आणि सबल व्हा": रेसिपी आणि आरोग्यदायी ५ फ़ायदे

All age groups

Sanghajaya Jadhav

2.7M दृश्ये

3 years ago

"गोपाळकाला खा सुदृढ आणि सबल व्हा": रेसिपी आणि आरोग्यदायी ५ फ़ायदे

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Himani Khanna

वाढीसाठी अन्न
सामाजिक आणि भावनिक
रोग प्रतिकारशक्ती
Special Day

महाराष्ट्रीयन सणांपैकी एक असा "गोपाळकाला" सर्व बाळगोपाळांना आवडणारा. दर वर्षी या सणांची वाट पाहणारे आपल्या गल्लीतील लोकप्रिय गोविदा. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, हिंदू भाविक उपवास करतात. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात "गोपाळकाला"(दहीकाला) सेवन करूनच उपवास सोडला जातो.  उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला हा पदार्थ तयार केला जातो . भाविक या दिवशी भगवान कृष्णाला अर्पण करण्यासाठी खास अन्न शिजवतात. त्याला  "गोपाळकाला" म्हणतात. हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थातील आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. भगवान कृष्ण हे दुग्धजन्य पदार्थांच्या प्रेमासाठी ओळखले जातात. गोपाळकाला म्हणजे दही, दूध, लोणी, ज्वारीच्या ,साळीच्या लाह्या, फुटाण्याची डाळ, ताक, उपलब्ध फळे, चपटे तांदूळ (पोहे) शेंगदाणे आणि नारळ आणि दही यांचे चवदार मिश्रण.  तसेच मुरलेली वेगवेगळी  लोणची, तुपाची फोडणी ! आज आपण या ब्लॉग मध्ये गोपाळकाल्याची रेसिपी आणि फायदे जाणणार आहोत. 

Advertisement - Continue Reading Below

तुम्ही घरी कसे तयार करू शकता "गोपाळकाला"?

चविष्ट , मधुर गोपाळकालामध्ये श्रीकृष्णाची एक दंतकथा आहे. पुराणानुसार, गुरेढोरे चरल्यानंतर कृष्ण आपल्या मित्रा सोबत जेवण करायचा, जिथे तो सर्व उपलब्ध अन्न एकत्र करून मिश्रण किंवा ‘काला’ बनवायचा.

गोपाळकाला रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

साहित्य:

  • कढीपत्ता
  • १/२ ज्वारीच्या ,साळीच्या लाह्या
  • १/२ फुटाण्याची  डाळ
  • १ कप ताजे नारळ (किसलेले)
  • २५० ग्रॅम तुटलेला तांदूळ
  • ताज्या फळाच्या फोडी 
  • १/२ टीस्पून साखर
  • ६० ग्रॅम दही
  • २ आवडी नुसार हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
  • १०० ग्रॅम काकडी (बारीक चिरून)
  • १ चमचा तूप
  • १ टीस्पून जिरे/मोहरी 
  • चवीनुसार मीठ

प्रक्रिया:पद्धत:

Advertisement - Continue Reading Below
  • चपटे तांदूळ (पोहे) वाहत्या पाण्याखाली धुवा आणि चाळणीत काढून ठेवा. 
  •  तांदूळ साधारण १५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  •  कढईत तूप गरम करा.
  • थोडे कढीपत्ता,जिरे, आले आणि हिरवी मिरची तुपात परतून घ्या.
  • एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये हे काढून टाकलेले पोहे घ्या 
  •  चिरलेली काकडी, खोवलेले खोबरे,  दही, मीठ आणि साखर मिसळा.
  • हे मिश्रण शिजवलेल्या तांदळावर ओता.
  • उर्वरित साहित्य घाला आणि चांगले मिसळा.

 "गोपाळकाला"आरोग्यदायी ५ फ़ायदे 

१. हा आतिशय रुचकर पौष्टिक पदार्था पैकी एक , कमी-कॅलरी असलेला मेनू तुम्ही आपल्या लहानग्यांना नाश्त्यात देऊ शकता किंवा तुमची मुलं शाळेतुन घरी आल्यावरही देऊ शकता. 

२. आपल्या संस्कृती मध्ये अनेक असे पदार्थ आहेत जे विशिष्ट सणाला केले जातात. परंतु यातील पौष्टिक मूल्ये लक्षात घेता हे वर्षातून कधीही खायला काहीच हरकत नाही. 

३. वन डिश मिल म्हणून हा योग्य पर्याय आहे. पिझ्झा, बर्गर , नूडल्स , तेलकट - तुपकट पदार्थापेक्षा शतपटीने चवदार आणि तितकाच पौष्टिक!! 

४. प्रोटीन, कार्बोहाइड्रेट,जवळजवळ  सर्व व्हिटॅमिन, मिनरल असणारा गोपाळकाला

. यात सगळी पोषणमूल्ये आहेत. 

मग नक्की बनवताय ना घरी गोपाळकाला आपल्या लहानग्या , थोरा - मोठ्यासाठी!! नक्कीच तयार करा आणि कंमेंट जरूर करा.  

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...