"पोळा" सण पद्धत, उद्देश, महत्व आणि पौराणिक कथा

Only For Pro

Reviewed by expert panel
संपूर्ण महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भव्य पातळीवर साजरा केला जाणारा हा एक मराठी सण असून लहान थोरांना सामावून घेणारा सण आहे "पोळा". श्रावणातील पिठोरी अमावस्येला साजरा केला जाणारा असा ढवळ्या-पोवळ्याचा, सर्जा- राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे तसेच हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ... (बहिणाबाई चौधरी)
उद्देश
१. या सनाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे आभार प्रकट केली जातात.
२. हा उत्सव साजरा केल्याने शेतात भरपूर धान्य पिकते आणि गोधन वाढते, असे समजले जाते.
३. पोळ्याच्या निमित्ताने प्राणीमात्रावर दया धर्म करा असे सांगण्याचा उद्देशही आहे.
४. या उत्सवद्वारे पशुसंवर्धन हा हि उद्देश आहे.
५. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस.
उत्सव साजरा करण्याची पद्धत
शेतकर्यांमध्ये या उत्सवाला फार महत्त्व आहे. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस ,बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो.
- या सणादिवशी महाराष्ट्रातील गावो-गावी,खेड्यापाड्यावर शेणाने आगंण सारवून रांगोळ्या काढल्या जातात , प्रत्येक घराला समृध्दतेचे प्रतीक आंब्याच्या पानांचे तोरण बांधली जातात.
- पेरण्या झाल्यानंतर शेतीच्या कामांतून बैल रिकामे झाले म्हणजे त्यांना न्हाऊ-माखू घालायचे, आरती ओवाळायची, नैवेद्य दाखवायचा आणि मग दुपारी रंगवून आणि शृंगारून गावातून मिरवत न्यायचे, असा हा उत्सवसोहळा असतो.
- या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते.
- बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि शिंगे घासली, बाशिंगे लावली, मंडुळी बांधली, मोरकी आवळली जाते तसेच तोडे चढविले, कासरा ओढणे , दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांदे तुपाने किंवा हळदीने शेकले जातात.
- बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
- त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते.
बैल पोळ्याचे महत्त्व
दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात.शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
कुठे- कुठे साजरा केला जातो बैलपोळा सण बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रात येथील शेतकरी वर्ग साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. पोळा अमावस्येला ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात.
पौराणिक दंतकथा
पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे जेव्हा कृष्णाच्या अवतारात धर्तीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...