3-7 वयोगटातील मुलींसाठी पौष्टिक पदार्थांची पाककृती, लहान मुलांना खाण्यास पौष्टिक पदार्थ

3 to 7 years

Canisha Kapoor

4.0K दृश्ये

20 hours ago

3-7 वयोगटातील मुलींसाठी पौष्टिक पदार्थांची पाककृती, लहान मुलांना खाण्यास पौष्टिक पदार्थ

लहान मुले 3-7 या वयोगटात आली की, त्यांच्या आवडी निवडी ब-याच प्रमाणात ठरलेल्या असतात. अशा वेळी मुळे त्यांना आवडेल तेच खाऊ घालण्यचा हट्ट करतात. या वयात लहान मुलांना पौष्टिक आहार खाऊ घालणे पण तितकेच महत्वाचे आहे.

Advertisement - Continue Reading Below

3-7 वयोगटातील लहान मुलांना खाण्यास पौष्टिक पदार्थ

Advertisement - Continue Reading Below

येथे आम्ही आपल्या मुलासाठी पोषक आहार किंवा अन्न रेसिपी सूचित करतो. प्रयत्न करण्याचा सल्ला द्या...

  • कॉर्न उपमा – नेहमीसारखी फोडणी करा. त्यात थोडा हिंग,कढीपत्ता आणि उडदाची डाळ घाला. ते परतलं की कांदा आणि कॉर्न दाणे घाला. झाकण ठेवून दोन्ही चांगलं शिजू द्या. त्यात आलं-मिरचीचं वाटण घालून परता. मग त्यात रवा घाला. तोही चांगला परता. त्यात साखर, मीठ घाला. अडीचपट पाणी घाला. लिंबाचा रस आणि खोबरं,कोथिंबीर घाला. उतरवताना १ चमचा साजूक तूप घाला. चांगलं एकत्र करा. याच पध्दतीनं भाज्या (फ्लॉवर,गाजर,मटार) घालूनही उपमा करता येईल.
     
  • सुशीला – कुरमुरे ५-७ मिनिटं पाण्यात भिजवा. चांगले भिजले की घट्ट पिळून एका ताटात काढा. त्यात तिखट, मीठ, साखर, लिंबाचा रस, दाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हातानं सगळं नीट एकत्र करा. तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करा. कढीपत्ता घाला. बारीक चिरलेला कांदा घालून परता. त्यावर कुरमुरे घाला. दणदणीत वाफ द्या.
     
  • दही पोहे – जाड पोहे धुवून घ्या. पाणी निथळून त्यात दही, थोडंसं दूध, मीठ, आवडत असल्यास साखर घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. वरून तळणीच्या मिरचीची खमंग फोडणी द्या. तळणीची मिरची आवडत नसेल तर बारीक चिरलेल्या हिरवी मिरचीची फोडणी द्या
     
  • दूध-पोहे – पोहे धुवून घ्या. त्यात हवं तसं दूध घाला. साखर घालून नीट कालवा. लाह्याचं दुधातलं पीठ – ज्वारीच्या लाह्यांचं पीठ दुधात कालवा. हवं तसं घट्ट-पातळ ठेवा. साखर घालून कालवा.
     
  • लाह्याचं फोडणीचं पीठ – लाह्याच्या पिठात थोडं आंबट ताक आणि पाणी घालून सरसरीत कालवून घ्या. त्यातच तिखट-मीठ आणि दाण्याचं कूट घाला. हिंग-मोहरीची फोडणी करा. कढीपत्ता घाला. त्यावर कालवलेलं पीठ घाला. चांगलं हलवून मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्या. साधारणपणे उपम्यासारखं झालं पाहिजे.
     
  • कणसाचा उपमा – कणसं जाड किसणीनं किसा. जरा जास्त तेलाची फोडणी करा. त्यात नेहमीपेक्षा जरासा जास्त हिंग घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. आवडत असल्यास शेंगदाणे घाला. कढीपत्ता घाला. त्यावर कणसाचा कीस घाला. मीठ घाला. कणसं गोड असतात त्यामुळे साखर घालू नका. मंद आचेवर मधूनमधून हलवत वाफ येऊ द्या. हवं असल्यास मिरचीऐवजी तिखट घाला. वरून थोडा पाण्याचा किंवा दुधाचा शिपका मारा. परत चांगली वाफ द्या. मोकळा झाला की गॅस बंद करा. वरून ओलं-खोबरं कोथिंबीर घाला.
     
  • कणसाचे वडे – कणसं किसून घ्या. त्यात मावेल तसं बेसन घाला. तिखट-मीठ-हळद घाला. आवडत असल्यास आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. भरपूर कोथिंबीर घाला. मध्यम आकाराचे वडे करून चांगले लाल रंगावर तळा. बेसन फार जास्त घालून पीठ घट्ट भिजवू नका. पीठ सरसरीतच ठेवा म्हणजे वडे कुरकुरीत होतील.
     
  • मिक्स डाळींचे वडे – हरभरा, उडीद, मूग, तूर या डाळी किंवा यापैकी कोणत्याही दोन-तीन डाळी ३-४ तास भिजवा. जाडसर वाटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, थोडे भरडलेले धणे, बारीक चिरलेला कढीपत्ता, आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. मध्यम आकाराचे वडे तळा.
     
  • बटाटे वडे – बटाटे उकडा. मॅश करा. कढईत थोड्या तेलाची फोडणी करा. त्यावर कांदा परता. जरा जास्त आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. मीठ आणि हवी असल्यास हळद घाला. वाटण परतलं गेलं की बटाटा घाला. हलवून गॅस बंद करा. थंड झाल्यावर हवे तितके लहान-मोठे गोळे करून वड्यांचा चपटा आकार द्या. बेसनात हळद-तिखट-मीठ घालून भिजवा. कडकडीत तेलाचं थोडंसं मोहन घाला. वडे त्यात बुडवून तळा.
     
  • साबुदाणा वडे – भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा मॅश करून घाला. एखादा बटाटा साल काढून कच्चा किसून घाला. आलं-मिरचीचं वाटण घाला. जि-याची पूड घाला. मीठ-साखर घाला. भरपूर कोथिंबीर घाला. चांगलं मळून घेऊन हवे त्या आकाराचे वडे करून तळा.

 

टॉयलरसाठी आपल्याला इतर कोणत्याही आहार सूचना आहेत का? टिप्पण्या विभागात आमच्यासह सामायिक करा!

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...