3 वर्षाच्या मुलांमध्ये कोणत्या कौशल्यांचा विकास होणे आवश्यक? पालकांनी काय शिकवावे?

जर तुमचं मूल 3 वर्षाचं आहे तर त्यांना उपजवत कोणत्या गोष्टी यायला हवीत आणि एक पालक म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकवायला हव्यात. 3 वर्षाचं मूल ही वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अवस्था असते. या वयात मुलांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो. यामुळे त्यांना कोणत्या गोष्टी यायला हव्यात आणि एक पालक म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकवायला हव्यात हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
1. भाषा आणि संवाद कौशल्य
3 वर्षाचं मूल साधारणतः 4-5 शब्दांची वाक्यं बोलू शकतं.
त्यांना साधे प्रश्न विचारता येतात आणि उत्तर देता येतं.
पालकांनी त्यांच्याशी सतत संवाद साधायला हवा. कथा सांगणं, गाणी गाणं, चित्रं दाखवून त्यावर चर्चा करणं यामुळे भाषिक कौशल्य वाढतं.
मुलांना मराठीसह इतर भाषांचं ज्ञान द्यायचं असल्यास त्यांना सहज समजेल अशा पद्धतीने संवाद साधावा.
2. शारीरिक विकास आणि हालचाल
मुलं धावू शकतात, पायऱ्या चढू-उतरो शकतात, उड्या मारू शकतात.
हात आणि बोटांमध्ये समन्वय वाढलेला असतो, त्यामुळे छोट्या गोष्टी उचलणे, रंगवणे, चहाच्या सेटशी खेळणे शक्य होतं.
पालकांनी बाहेर खेळण्याची सवय लावावी. झोके, घसरगुंडी, चेंडू फेकणे-झेलणे हे खेळ उपयुक्त ठरतात.
बोटांच्या हालचाली सुधारण्यासाठी रंगवणं, मातीच्या गोष्टी तयार करणं, लहान पझल्स सोडवणं यासारख्या कृती उपयोगी ठरतात.
3. स्वावलंबन कौशल्य
3 वर्षांचे मूल काही प्रमाणात स्वतःचे कपडे घालू शकतात, बूट घालू शकतात.
चमच्याने खाणं, कपात पाणी पिणं शिकलेले असते.
स्वच्छता आणि हात धुण्याची सवय लावणं आवश्यक असतं.
पालकांनी मुलांना छोटे छोटे जबाबदारीचे काम द्यावेत. जसे खेळणी जागेवर ठेवणं, कपडे व्यवस्थित करणं.
4. सामाजिक आणि भावनिक विकास
या वयात मुलं इतर मुलांसोबत खेळायला सुरुवात करतात.
त्यांच्या भावना व्यक्त करण्याची क्षमता वाढते. ते आनंद, राग, दु:ख स्पष्टपणे दर्शवू शकतात.
पालकांनी त्यांना दुसऱ्यांसोबत शेअरिंग, वाटणी, सौजन्य शिकवावं.
जर मूल हट्टीपणा करत असेल तर संयमाने हाताळा. त्यांना योग्य आणि अयोग्य गोष्टी स्पष्टपणे समजावून सांगा.
5. सर्जनशीलता आणि विचारसरणी
3 वर्षांची मुलं काल्पनिक गोष्टीत रस घेतात. त्यांना गोष्टी ऐकायला, नवीन खेळ खेळायला आवडतं.
त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी त्यांना रंगीत चित्रं, कथाकथन, हस्तकला यांचा वापर करायला द्या.
त्यांचं निरीक्षण कौशल्य वाढवण्यासाठी रोजच्या गोष्टींबद्दल चर्चा करा. उदाहरणार्थ, "आज आकाशात कोणता रंग आहे?" किंवा "हा फळ कोणत्या रंगाचा आहे?" असे प्रश्न विचारावेत.
6. गणित आणि बुद्धीवाढ
मुलांना 1 ते 10 अंक ओळखता यायला हवेत.
छोट्या वस्तू मोजता यायला हव्यात.
रंग, आकार आणि पॅटर्न समजायला हवेत.
पालकांनी खेळातून गणित शिकवावं. उदा. घरी असलेल्या वस्तू मोजणं, खडूने आकडे लिहिणं.
7. शिस्त आणि चांगल्या सवयी
3 वर्षांच्या मुलांना योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून द्यायला हवी.
"धन्यवाद," "क्षमस्व," "कृपया" यासारखे शब्द वापरण्याची सवय लावावी.
घरात विशिष्ट नियम पाळण्याचं महत्त्व पटवून द्यावं. जसे की, खेळण्यांनंतर त्यांना योग्य ठिकाणी ठेवणं, अन्न खाल्ल्यानंतर हात धुणं.
जर मूल हट्टीपणा करत असेल, रडून हट्ट करत असेल तर शांत राहून त्यांना समजवावं. शारीरिक शिक्षा टाळावी.
8. योग्य आहार आणि आरोग्य
3 वर्षांच्या मुलांसाठी पोषणयुक्त आहार देणं गरजेचं आहे.
दूध, फळं, भाज्या, कडधान्यं यांचा समावेश असावा.
साखरयुक्त पदार्थ, जंक फूड यावर नियंत्रण ठेवावं.
पाणी पुरेसं प्यायला द्यावं.
झोपेची योग्य सवय लावावी. रात्री 9-10 वाजता झोपण्याची सवय चांगली ठरते.
9. स्क्रीन टाइम आणि डिजिटल सवयी
3 वर्षांच्या मुलांना मोबाइल, टीव्ही, टॅब यांचा अतिवापर टाळावा.
डिजिटल माध्यमांचा वापर शिक्षणासाठी मर्यादित प्रमाणात करावा.
त्याऐवजी पुस्तके, ब्लॉक्स, पझल्स आणि क्रिएटिव्ह खेळ देणं अधिक फायदेशीर ठरतं.
10. पालकांची भूमिका आणि संयम
पालकांनी मुलांना प्रेमाने मार्गदर्शन करावं.
मुलांशी नेहमी संवाद साधा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मूल चुका करत असेल तर त्यांना रागावण्यापेक्षा त्यांना समजावून सांगावं.
मुलाच्या प्रत्येक लहान प्रगतीचं कौतुक करा, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
मुलांनी जर चुका केल्या तर त्यांना योग्य पद्धतीने त्याचे परिणाम समजावून द्या.
3 वर्षांच्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी पालकांनी योग्य दिशेनं मार्गदर्शन करायला हवं. संवाद, प्रेम आणि संयमाच्या मदतीने त्यांना शिस्त आणि चांगल्या सवयी लावता येतात. खेळ, गोष्टी आणि दैनंदिन जीवनातील साध्या कृतींतून शिकण्याची संधी देऊन मुलांच्या बुद्धीमत्तेचा विकास शक्य आहे. मुलांच्या लहानशा प्रगतीचंही कौतुक करून त्यांना अधिक आत्मविश्वास आणि स्वावलंबन देणं हेच पालकत्वाचं यश आहे
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...