फादर्स डे च गिफ्ट घेताना संभ्रमात आहात का? जानूया ५ प्रभावशाली कल्पना

All age groups

Sanghajaya Jadhav

2.9M दृश्ये

3 years ago

फादर्स डे च गिफ्ट घेताना संभ्रमात आहात का? जानूया ५ प्रभावशाली कल्पना
सामाजिक आणि भावनिक
Special Day

आपल्या वडिलांना आपल्या शिवाय जास्त कोणीच ओळखू शकत नाही. त्याच्या आवडी निवडी आणि ते प्रत्येक्षात काय आणि कोणत्या गोष्टी वापरतात. याची पुरेपूर माहिती प्रत्येक पाल्यास असते. आपल्या वडिलांना सुंदरशी भेट वस्तू गिफ्ट देणं याहून परम सुख दुसरे नाही. 
या पितृ दिनी अश्याच काही साध्या सोप्या कल्पना आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहेत.   

Advertisement - Continue Reading Below

पितृ दिन ५ प्रभावशाली कल्पना 

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार 

  • माझी ओळख
  • माझी हिम्मत
  • माझे साहस
  • माझा सम्मान
  • माझा बाबा

१) एफएम रेडिओ

आपल्या बाबा ना त्याच्या दशकातील गाणी ऐकायला आवडत असतील तर  एफएम रेडिओ हे सर्वोत्तम भेट वस्तू आहे.  एफएम रेडिओ हे आतिशय कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत आणि हे गिफ्ट कुठेही कधीही घेऊन जाऊ , आणू शकतो आणि पुन्हा लक्षात राहणारे असे गिफ्ट आहे. 
अनन्य साधारण आणि अतिशय उत्कृष्ट अशी रेडिओ भेट कल्पना निवडा. 

२) स्मार्टवॉच

जर तुमचे वडील गॅझेटचे शौकीन असतील , तर तुम्ही स्मार्टवॉचमध्ये गुंतवणूक करणे उत्तम आहे, कारण ते तुमच्या बाबाचा फिटनेस स्तर सुधारून त्यांना विविध आरोग्य फायदे देईल.
आजची वेगवान जीवनशैली पाहता, आपल्यापैकी बहुतेकजणाच्या वडिलांची बैठी दिनचर्या आहे आणि त्याहीपेक्षा, साथीचे रोग त्यामुळे स्मार्टवॉच गरजेची वाटते. सर्वात सोप्या, सहज उपलब्ध आणि कार्यक्षम उपकरणांपैकी एक, स्मार्ट घड्याळ
दिवसभरातील आपल्या वडिलांची शरीराची क्रिया, झोप, पाण्याचे सेवन इत्यादींविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी, ज्यामुळे ते स्वतःला सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवू शकतील.

३) वॉलेट

आपल्या बाबाना एक वॉलेटतर नक्कीच तुम्ही देऊ शकाल आणि ते आवडीने घेतीलही कारण ते त्याच्या लाडल्याने दिलेलं असेल पुरुषांना नेहमीच लेदर वॉलेट आवडतात , तुमच्या नावासह वैयक्तिकृत १०० हून अधिक वॉलेट डिझाईन्समधून तुम्ही निवडू शकता किंवा आपले सर्व साधारण पाकीट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. एकदा आपल्या बाबाना काहीतरी देऊन बघा तुम्हाला समाधान मिळेल. 

४) मोबाईल 

बाप माणूस आपल्या स्वतः वर कधीच खर्च करत नाही तो फक्त मुलासाठी कष्ट घेत राहतो त्या व्यक्ती साठी आजच्या घडी ला मोबाईल बहूमुल्य असेल. 
आपल्या बाबास मोबाईल गिफ्ट द्या स्मार्ट फोन त्याच्या उपयोगी सुध्दा पडेल आणि तुमचे गिफ्ट भेटवस्तू सतत त्याच्या सोबत असेल अगदी जवळ. 

५) हेअल्थ चेकअप पॅकेज 

सर्वांची काळजी घेणारी आणि आपल्या स्वतःच्या आरोग्या कडे सर्वात जास्त दुर्लक्ष करणारी कुटूंबातील व्यक्ती असते ते म्हणजे आपले "बाबा". त्याच्या साठी ह्या फादर्स डे ला हेअल्थ चेकअप पॅकेज गिफ्ट दिल तर त्याचे आरोग्य संभाळले जाईल. आरोग्य हे नेहमीच सर्वप्रथम आणि आवश्यक आहे.  

घरातील लहानगे आपल्या बाबास ग्रीटिंग कार्ड स्वतः बनवून देऊ शकता. छोटया , छोटया गोष्टीही खूप आनंद देऊन जातात. हॅपी फादर्स डे!!

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...