बालकांची बाळघुटी साहित्य आणि उपयोग

बालकांची बाळघुटी साहित्य आणि उपयोग (Child's infant Balghuti,syrup and uses)
परंपरागत चालत आलेली घरोघरी प्रत्येक नवजात बालकास संगोपनात उपयोगात आणली जाते ती म्हणजे बाळघुटी.यात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात,मधात उगाळून बाळाला दोन ते तीन वेळा मात्रा नुसार चाटवली जातात.अशी औषधे परंपरेने घराघरांतून चालत आली आहेत.काही वस्तूचे प्रमाण ते वापरातुन इतरांवर अवलंबवून सिद्ध होते तसेच बाळगुटी ही वर्षानुवर्षे चालत आलेली वापरातील सिद्ध पध्दती. आपल्या आजीचा सोनेरी बटवा म्हटलं तरी चालेल. तसेच आजारपण होऊ नये म्हणून आधीच लक्षणावरच उपचार पद्धती भारतीय आयुर्वेदिकशास्त्र सांगते.ही औषधे टिकाऊ स्वरूपात आपणास केव्हा ही वापरता येतात. ही बाळघुटी उगाळून त्यांचे सूक्ष्म अंश बाळाला रोज चाटवता येतात.
- बाळघुटी साहित्य (balghuti & uses) :- जायफळ,वेखंड,मायफळ,बेहडा,हीरडा, बाळहीरडा,पींपळी, ब्राम्ही,जेष्ठमध,सोन्याची कांडी,बदाम,अश्वगंधा,अतीवीष,काकडशींगी, हळकुंड,सुंठ,खारीक,मुरुडशेंग,चींचोका,अक्कलखरा,गुळवेल.
1.मुरुडशेंग :-पीळदार मुरडलेली शेंग पटकन ओळखू शकतो.लहान मुलांच्या आतडी वीकारात मुरुडशेंग ही फार बहुमोल वनस्पती आहे. पोटात दुखण्यामुळे बाळ थांबून थांबून रडत असेल तर मुरुडशेंग अधिक उगाळावी.पोटातुन दिल्यास आतडीची सुज कमी करते.लहानबाळास उगाळून लघु स्वरूपात देता येते.याची मात्रा प्रमाण प्रेत्यकास प्रकृती नुसार वेगळं असते. शीतवीर्य अशी मुरुडशेंग त्रीदोषघ्न आहे.पोटातुन दिल्यास आतडीची सुज कमी करते .
2.वेखंड :-बाळाची छाती कफाने भरलेली असल्यास वेखंड उगाळून वापरावे. स्वच्छ दगडावर वेखंड उगाळेल अस किंचीतस पाणी मग मध (एक चमचा) टाकून त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकट उलटी होऊन छाती मोकळी होते.
3.मायफळ :-मायफळ हे एक औषधी फळ आहे. सुपारीपेक्षा किंचित लहान असते. यास कोणी तुरटें असेंहि म्हणतात. विशेषतः लहान मुलांच्या आजारावर हे फार उपयोगी पडतें.मात्रा -लहानबाळास सहानीवर घासुन अतीशुष्म मात्रा मोठ्यांना -वैद्दाच्या सल्याने प्रकृतीनुसार
4.बाळहिरडा/चिचोका :- कधीकधी बाळाला शी होताना त्रास होतो कुंथावे लागते.यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाळहिरडा अधिक उगाळावा व चिंचोका त्या सोबत उगाळू नये किंवा देऊ नये.बाळाची पातळ शी होत असल्यास जायफळ,चिंचोका, यांचे उगाळणे अधिक करून चाटण देता येते.
5.जायफळ :-लहानग्यांच्या अनेकानेक विकारावर गुणकारी औषध जायफळ पूड आहे.जायफळ पूड,मध मिक्स करून योग्य प्रमाणात देऊन अनेक विकार दुर करू शकतो.ताप आल्यास छाती,माथ्यावर जायफळ उगाळून लावतात.लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.
6. पीपंळी :- पीपंळीचूर्ण मधातून घेतल्यास भुक लागण्यास मदत होते आणि पचन सुधारते.
7. बदाम,खारीक,जेष्ठमघ,सुंठ,सोन्याची कांडी :-बदाम बुध्दीवर्धक , खारीक हाडांचे पोषण ,जेष्ठमघ अनेक रोगावर गुणकारी , सुंठ पंचनशक्ति सुधारते , सोन्याची कांडी सोन्या सारखीच लाभदायक.
-
काही समस्या असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि या ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...