बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू : साहित्य आणि फायदे

0 to 1 years

Sanghajaya Jadhav

3.1M दृश्ये

3 years ago

बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू : साहित्य आणि फायदे

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Parentune Experts

पोषक आहार
नियमित टिप्स
वाढीसाठी अन्न
रोग प्रतिकारशक्ती

आई आणि मूल दोघे सुदृढ असायला हवे त्यासाठी परंपरागत गोष्टी सांगितल्या आहेत त्या पैकी डिंकाचे लाडू खाणं चांगलं असं आवर्जून सांगितलं जात. मुलाच्या जन्मानंतर बाळंतीनीस तिच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी अनेक विविध अंगी शक्तीच्या गोष्टी दिल्या जातात. डिंकाचे लाडू देखील त्यापैकी एक आहे, जे आईच्या शरीरातील हाडे मजबूत करतात. प्रसूतीनंतर ताकद येण्यासाठी बनवलेल्या या लाडूंची पद्धत काय आहे, जाणून घेऊया.

Advertisement - Continue Reading Below

डिंकाचे लाडू बनवण्याचे साहित्य

२०० ग्रॅम डिंक

१ कप गहू
 
२ कप साखर

आर्धी वाटी खसखस

१ वाटी देशी तूप

अर्धा कप खारीक

१ टीस्पून खरबूज बिया

५० ग्रॅम बदाम

१ वाटी सुके खोबरे

५-१० लहान वेलची

डिंकाचे लाडू रेसिपी

प्रथम डिंक बारीक फोडून घ्या.डिंक जाडसर कुटावा. आता कढईत तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्या. डिंक चांगला फुगायला लागला की भाजला आहे असे समजून घ्या. आता एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा.खोबरे किसून, भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. खसकस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. आता पीठ हलके सोनेरी होईस्तोवर तुपात तळून घ्या आणि नंतर बाहेर काढून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून साखरेचा पाक बनवा. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी. नंतर साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक करून, त्यात अर्धी वाटी तूप घालावे. या सिरपमध्ये भाजलेला डिंक, गहू आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करा. मिश्रण थंड झाल्यावर लाडूचा आकार द्या. हे लाडू गरमच वळावे लागतात. हे लाडू उपवासालाही चालतात.तसेच बनवलेल्या या लाडूंमध्ये सुंठही वापरता येते.

डिंकाच्या लाडूचे फायदे 

  • बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या मणक्यामध्ये,पाठीत तीव्र वेदना होतात, त्याचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.

 

  • प्रसूतीनंतर शरीरात अंगदुखी होते. याच्या सेवनाने सांधेदुखीत आराम मिळतो.

 

  • या पौष्टिकतेने भरलेल्या आहाराचा फायदा स्तनपानाच्या माध्यमातून बाळापर्यंतही पोहोचतो.

 

  • या लाडूंच्या सेवनाने स्तनांमध्ये दूध वाढते. हे लाडू तुम्हाला डिलिव्हरीनंतरची कमजोरी लवकर बरे करण्यास मदत करतात.
ज्यांची प्रसूती शस्त्रक्रिया किंवा गुंतागुंतीमुळे झाली असेल त्यांना हे लाडू दिले जात नाहीत. सर्जिकल टाके बरे झाल्यानंतरच त्यांचे सेवन केले जाते कारण त्यांचा प्रभाव गरम असतो, ज्यामुळे टाके प्रभावित होण्याची शक्यता असते.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...