गुढी पाडवा: मुलांच्या आरोग्याचं तोरण बांधा दारी - उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्याचे घरगुती 10 उपाय

गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घराच्या मुख्य द्वारावर गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी पाडवा सणाचा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहेच, पण याचबरोबर या काळात उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते आणि यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळा सुरू झाला की मुलांच्या शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ताप, अंगाची आग होणे, त्वचेवर लाल चटके येणे अशा समस्यांना मुलं सामोरी जातात. या ब्लॉगमध्ये आपण उन्हाळ्यातील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
शरीरातील उष्णता वाढण्याची कारणे:
- वाढता उन्हाळा आणि ऊन
- कमी पाणी पिणे
- मसालेदार, तळलेले आणि उष्ण पदार्थांचे सेवन
- चुकीची जीवनशैली आणि आहार
- मानसिक ताण आणि तणाव
- शरीरातील उष्णतेची लक्षणे:
- डोकेदुखी
- डोळ्यांची आग होणे
- त्वचेवर पुरळ येणे
- तहान जास्त लागणे
- लघवीचा रंग गडद होणे
- शरीरात अस्वस्थता आणि चिडचिड
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय:
1. धण्याचे पाणी:
दोन ते तीन चमचे धणे पेलाभर पाण्यात सकाळी दोन तास भिजत ठेवून ते पाणी प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
दोन चमचे धणे एक पेलाभर पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्यावे.
2. सब्जा बीजांचे पाणी:
सब्जा बिया पाण्यात भिजवून त्या पाण्याचा उपयोग करा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि तहान भागते.
3. बेलफळाचे सरबत:
बेलफळाच्या गरात पाणी, गूळ आणि चिमूटभर मीठ घालून सरबत तयार करा. हे सरबत पिण्याने शरीर थंड राहते.
4. पायांना कोमट पाण्याने शेक:
एका टबमध्ये कोमट पाण्यात दोन चमचे मीठ घालून १५-२० मिनिटे पाय बुडवा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
5. ताक:
रोज एक ग्लास ताक प्यावे. ताकात जीरं, मीठ आणि कोथिंबीर घालून प्यायल्यास उष्णतेपासून आराम मिळतो.
6. ओव्याच्या पानांचा आहारात समावेश:
ओव्याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम असतात. हे गुणधर्म शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
7. गुलकंद:
रोज एक चमचा गुलकंद खावा. गुलकंद थंडावा देऊन शरीरातील उष्णता कमी करतो.थंड दुधात गुलकंद मिसळून दिल्याने मुलांना गोडवा आणि थंडावा मिळतो. हे शरीरात होणारी उष्णता कमी करण्यास उपयुक्त आहे.
8. वाळा आणि साळीच्या लाह्या:
पाण्यात वाळा आणि साळीच्या लाह्या टाकून ते पाणी प्यावे. हे पाणी शरीराला थंडावा देते.
9. वेळेवर जेवण:
शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी वेळेवर जेवण आवश्यक आहे. पाचक रसांचे योग्य प्रमाण आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
10. काकडी आणि टॉमेटो:
मुलांच्या डब्यात काकडी आणि टॉमेटोच्या फोडी देण्याने शरीरातील उष्णता कमी होते. हे पदार्थ सहज पचतात आणि त्वचेला ताजेतवाने ठेवतात.
आणखी घरगुती उपाय आणि आरोग्यविषयक टिप्स:
- नारळपाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
- रोज सकाळी कोरफडीचा रस प्यावा, यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचा चमकदार होते.
- फळांचा रस, विशेषतः काकडी, टरबूज आणि खरबूज यांचा समावेश आहारात करावा.
- संत्र, मोसंबी आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेल्या फळांचा उपयोग करावा.
- अंगावर पांढरे, हलके आणि सुती कपडे परिधान करावेत.
उन्हाळ्यात मुलांची काळजी घेण्यासाठी हे उपाय सहज करता येतात. त्यांच्या आहारात पाणीयुक्त पदार्थांचा समावेश करावा आणि उष्णता वाढविणारे तळलेले, मसालेदार पदार्थ कमी करावेत. यामुळे मुलांचं आरोग्य उत्तम राहील आणि ते आनंदी राहतील. उन्हाळ्यातील शरीराची काळजी घेण्यासाठी या सोप्या आणि घरगुती उपायांचा अवलंब करून आपण शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवू शकतो
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...