धुळवळ खेळताना आपल्या लहानग्यांची कशी काळजी घ्याल? ११ टिप्स

All age groups

Sanghajaya Jadhav

2.1M दृश्ये

2 years ago

धुळवळ खेळताना आपल्या लहानग्यांची कशी काळजी घ्याल? ११ टिप्स

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Jayashree Shiwalkar

नियमित टिप्स
त्वचेची देखभाल
Special Day

होळी हा वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा आबालवृद्धांचा आवडता सण आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी परंपरागतपणे दोन दिवस मनवला  जातो. प्रथम होळी दहन केली जाते नंतर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून धुळवळ खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. यास धुळवड असेही म्हटले जाते. सर्व थोर/लहानग्यांना महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. चला होळी सणा बद्दल आणखी जाणून घेऊया!! 

Advertisement - Continue Reading Below

होळी सण साजरा करण्यामागील मागील गोष्ट?
एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले.

 धुळवळ साजरी करताना लहानग्यांची कशी काळजी घ्याल? 

१) पूर्ण शरीराला तेल लावायला विसरू नका यामुळे रंग अंगाला लागणार नाही आणि लवकर निघेल. 

२) भांग हा पदार्थ प्यायला न ठेवता त्या ऐवजी सरबतं , मठ्ठा , ताक , मसाला दूध ठेऊ शकता,  भांग अश्या पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.

३) आपल्या लहानग्याच्या डोळ्यावर गॉगल वापर चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये.

Advertisement - Continue Reading Below

४) घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अश्या सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते.

५) नैसर्गिक रंग जास्तीत जास्त वापरा त्यामुळे इतरांना व स्वतःला त्रास होणार नाही. 

६) धुळवळ खेळताना भरपूर पाणी प्या कारण खूप सारे कार्यक्रम उन्हात ठेवलेले असतात त्यामुळे डिहायड्रेट होण्याची संभावना असते. 

७) मुलांना कपडे घालताना कपड्याचा पोत जाड ठेवा यामुळे त्यांना अनेक गोष्टी पासून स्वरक्षण होईल. 

८) केसावर किंवा डोक्यात टोपी घाला त्यामुळे तुमच्या केसावर रंगाचा थर साचणार नाही. 

९) धुळवळ खेळल्यानंतर खूप गरम अथवा कोमट पाण्याने अंघोळ करू नका. कारण कोमट पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात आणि त्यामध्ये रंग जावून तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान होऊ शकते. यासाठी रंग काढण्यासाठी आणि अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करा. 

१०) त्वेचेचा कोरडे पणा कमी करण्यासाठी एखादे मॉइश्चरायझर नक्की लावा. 

११) चांगल्या पदार्थावर ताव मारा आणि खुश रहा. 

आनंद दिल्याने आनंद आणखी वाढतो असे म्हणतात म्हणून नेहमी वाद टाळण्याचा प्रयन्त करा आणि समाधानी रहा या धुलीवंदनाच्या सर्वाना खूप साऱ्या शुभेच्छा !!

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...