सेलेब्रिटी हेयर स्टाईलिंगपासून पालकत्वापर्यंत: अधुना भबानी यांचा प्रवास

All age groups

Sanghajaya Jadhav

385.8K दृश्ये

5 months ago

सेलेब्रिटी हेयर स्टाईलिंगपासून पालकत्वापर्यंत: अधुना भबानी यांचा प्रवास
Story behind it

प्रसिद्ध सेलेब्रिटी हेयर स्टायलिस्ट अधुना भबानी यांची कथा हे प्रत्येक आई-वडिलांसाठी प्रेरणादायक आहे. बालपणीच त्यांनी केस कापण्याची कला शिकण्याचं स्वप्न पाहिलं, ज्यामुळे त्यांनी BBLUNT हा प्रसिद्ध हेअरकेअर ब्रँड सुरू केला. मात्र, त्यांच्या आयुष्यातील खरा विजय म्हणजे त्यांच्या दोन मुलींसोबतचा गाढ संवाद आणि जवळीकता.

बॉलीवूड अभिनेता व गायक,प्रोड्युसर फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांचा विवाह 2000 साली झाला होता. 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. अधुनापासून घटस्फोट घेतल्यानंतर एका वर्षानंतर फरहानने शिबानी दांडेकरला डेट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी लग्न केले.
एका इंटरव्यू मध्ये फरहान अख्तर ने खुलासा केला होता की त्यांच्या घटस्फोटमुळे मुलीचे भावनिक नुकसान झाले. मुलींच्या या इमोशनल नुकसानासाठी फरहान स्वतःला जबाबदार मानतात.

अधुना सांगतात, "माझ्या मुलींबरोबरचा माझा संवाद नेहमी खुला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांशी संवाद साधण्यासह त्यांचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांशी नातं घडवताना आपण एकमेकांशी कसं बोलतो, काय शिकतो आणि त्यांचं नेतृत्व कसं स्विकारतो, यावर त्या नात्याचा पाया ठरतो."

अधुनाला ही त्यांच्या मुली शाक्या आणि अकीरा यांनी खूप काही शिकवलं. किशोरवयीन मुलींशी कसं वागावं, त्यांचं भावनिक आणि शारीरिक बदल समजून घेणं कसं महत्त्वाचं आहे, याबद्दल त्या सांगतात. किशोरवयात होणाऱ्या हार्मोनल बदलांकडे बंडखोरी म्हणून न पाहता, त्यामागचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे.

शिक्षणातील बदल आणि मुलांची जडणघडण
शाक्याच्या शालेय जीवनात आलेल्या IGCSE ते IB बोर्डमधील बदलांचा उल्लेख करत अधुना म्हणतात, "शिक्षण पद्धतीमध्ये सर्जनशील मुलांसाठी अधिक सहयोगी दृष्टिकोन आवश्यक आहे. प्रत्येक मुलाची गरज वेगळी असते. शाक्याच्या स्वतःच्या कष्टांमुळे घरातून शिक्षण यशस्वी ठरलं."

पालकत्वातील मुख्य गोष्टी
अधुना पालकत्वासाठी काही सोप्या गोष्टी मांडतात:
 

Advertisement - Continue Reading Below
Advertisement - Continue Reading Below
  1. मुलांच्या निर्णयांना सन्मान देणं.
  2. त्यांचं ऐकून त्यांना सुरक्षित वाटेल असा संवाद ठेवणं.
  3. आजी-आजोबांकडून येणाऱ्या सल्ल्यांमध्ये योग्य तेच स्वीकारणं.

नव्या युगात पालकत्वाचे आव्हान
सोशल मीडियासारख्या गोष्टींमुळे आजची पिढी वेगळ्या दबावाखाली वाढते आहे. अधुना सांगतात, "आपल्या मुलांना ऐकून घेणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं ही आपल्या पालकत्वाची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे." शून्य ते सात वयाच्या वर्षांत पालकांनी मुलांसाठी वेळ देणं अनिवार्य आहे.

अधुना भबानी यांचा हा प्रवास पालकत्वाचा उत्तम आदर्श आहे. त्यांनी दाखवून दिलं की मुलांसोबत संवाद आणि विश्वासाचं नातं निर्माण केल्यास आपण एक यशस्वी पालक होऊ शकतो.

 

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...