गुढी पाडवा: मुलांसोबत गुढी सजवा आणि कडू लिंबांच्या सेवनाची आरोग्यदायी माहिती

All age groups

Sanghajaya Jadhav

134.4K दृश्ये

2 months ago

गुढी पाडवा: मुलांसोबत गुढी सजवा आणि कडू लिंबांच्या सेवनाची आरोग्यदायी माहिती
सामाजिक आणि भावनिक
Special Day

गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि घराघरांत गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो. विशेषतः लहान मुलांसाठी हा सण खूपच खास असतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलांना आपल्या परंपरा समजावून सांगणे आणि त्या आनंदाने साजऱ्या करणे महत्त्वाचे आहे. गुढी उभारताना मुलांना स्वतःहून काम करू द्या. त्यांना नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायला सांगा, जसे की गुढीच्या झेंड्यावरील चित्रं काढणे, त्यावर शुभेच्छा लिहिणे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.चला तर मग, या गुढी पाडव्याला आपल्या मुलांसोबत काही सुंदर सजावटीच्या कल्पना आजमावून पाहूया.

Advertisement - Continue Reading Below

गुढीचे सांस्कृतिक महत्त्व

गुढी पाडवा का साजरा करतात, त्याचा इतिहास, पौराणिक कथा आणि विविधता मुलांना सांगावी. गुढी पाडव्याचा श्रीरामाच्या विजयोत्सवाशी असलेला संबंध, मराठ्यांच्या पराक्रमाशी जोडलेली कहाणी आणि गुढीचे 'विजय ध्वज' म्हणून महत्त्व मुलांना समजावून द्या. यामुळे मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा समजेल.गुढी पाडवा हा सण फक्त परंपरा नाही, तर नवीन पिढीला आपली संस्कृती आणि मूल्ये शिकवण्याची संधी आहे. त्यामुळे गुढी उभारतानाचा हा क्षण अधिक संस्मरणीय आणि शिकवणीतून समृद्ध करा.

  1. गुढी पाडव्याचा मुख्य आकर्षण म्हणजे गुढी. मुलांसोबत एकत्रितपणे गुढी तयार करणे ही एक मजेदार क्रिया होऊ शकते. तुम्ही बाजारातून मिळणाऱ्या सजावटीच्या वस्तूंबरोबरच घरातील कापडी कपडे, फुलं, मण्यांचे हार आणि रंगीत दोऱ्यांचा वापर करू शकता. मुलांना गुढीचे महत्त्व समजावून देत, त्यांच्याकडून गुढी सजवून घेणे ही एक सुंदर संस्काराची प्रक्रिया ठरू शकते.
  2. रांगोळी काढणे ही एक सुंदर कला आहे आणि गुढी पाडव्याला तिचे महत्त्व आणखीनच वाढते. मुलांना रांगोळी काढायला शिकवा. सुरुवातीला सोप्या रांगोळ्या दाखवा आणि हळूहळू त्यांना रंगांची ओळख करून द्या. विविध रंगांच्या पावडरने तयार केलेली रांगोळी मुलांसाठी रंगांचा आनंद देईल. शिवाय, रंगांमधून मुलांच्या कल्पकतेला चालना मिळेल.
  3. फुलांच्या माळा आणि तोरणे लावून घर सजवणे ही पारंपरिक गोष्ट आहे. मुलांना फुलांची ओळख करून देत त्यांना फुलांच्या सुगंधाचा आनंद मिळू द्या. त्यांना मोगरा, झेंडू, अबोली यांसारखी फुलं वापरून तोरणं तयार करायला शिकवा. घरात फुलांची सजावट केली तर त्यांना एक आनंददायक वातावरण मिळेल.
  4. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी गुढी पाडव्याच्या थीमवर आधारित हस्तकला आणि क्राफ्ट्स तयार करा. पेपर कटिंग, चित्रकला, शिल्पकला यांचा वापर करून गुढी, शिवाजी महाराजांची चित्रं, किल्ले आणि इतर पारंपरिक वस्तू तयार करू शकता. मुलांना त्यातून भारतीय संस्कृतीचा परिचय होईल आणि ते आनंदाने सहभागी होतील.

गुढी पाडव्याला कडू लिंबाच्या (निंब) पानांचे सेवन करण्याची प्रथा आहे. या प्रथेमागे आरोग्यविषयक शास्त्रीय कारणे आणि धार्मिक महत्त्व आहे. मुलांना या पानांचे सेवन केल्याने विविध प्रकारचे फायदे होतात.

कडू लिंबाच्या पानांचे सेवनाचे महत्व:
आरोग्याची सुरुवात: हिंदू नववर्षाच्या प्रारंभीच आरोग्यदायी जीवनासाठी कडू लिंबाचे सेवन केले जाते. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील, अशी धारणा आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: कडू लिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

रक्तशुद्धी: या पानांमध्ये रक्तशुद्धीकरणाची क्षमता असते, ज्यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते.

जंतूसंसर्गावर नियंत्रण: मुलांना वारंवार होणाऱ्या जंतूसंसर्गांपासून संरक्षण मिळते.

Advertisement - Continue Reading Below

पचनशक्ती सुधारते: कडू लिंबाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढते.

मुलांना होणारे फायदे:
रोगप्रतिकारक शक्ती वाढते: मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते सर्दी, ताप, खोकला यांपासून सुरक्षित राहतात.

चमचमीत खाण्याची सवय कमी होते: कडू चवीमुळे मुलांना चमचमीत आणि जंक फूड खाण्याची सवय कमी होते.

तोंडातील संसर्ग टाळते: कडू लिंबाच्या पानांमुळे तोंडातील जंतूसंसर्ग कमी होतात आणि हिरड्या मजबूत होतात.

त्वचेसाठी उपयुक्त: कडू लिंबामधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी: कडू लिंबामधील 'बिटा-कॅरोटीन' डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

मुलांना कडू लिंबाचे सेवन कसे करावे:
साखरेसोबत: मुलांना कडू लागले तर साखरेसोबत कडू लिंबाची पाने खायला द्यावीत.

चूर्ण स्वरूपात: कडू लिंबाची पाने वाळवून, पूड करून मधासोबत दिल्यास मुलांना खायला सोपे जाईल.

गोड वरणासोबत: गोड वरण किंवा गोड शिरामध्ये थोडे कडू लिंबाचे चूर्ण मिसळून दिल्यास मुलांना आवडेल.

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुलांना कडू लिंबाचे सेवन करून त्यांचे आरोग्य आणि जीवन समृद्ध करण्याचा हा पारंपरिक मार्ग नक्कीच उपयुक्त ठरतो! 

गुढी पाडवा म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. मुलांना आपल्या परंपरा आणि सणांची ओळख करून देणे, त्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे हे पालक म्हणून आपले कर्तव्य आहे. या गुढी पाडव्याला तुमच्या मुलांसोबत आनंदाने सजावट करा आणि हा खास दिवस अविस्मरणीय बनवा!

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...