आरोग्यदायी चपात्यांचे 7 प्रकार – मुलांसाठी सुपरफूड!

All age groups

Sanghajaya Jadhav

20.7K दृश्ये

1 weeks ago

आरोग्यदायी चपात्यांचे 7 प्रकार – मुलांसाठी सुपरफूड!
रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख
वाढीसाठी अन्न

आपण रोजच्या आहारात चपाती व भाकरी खातो, पण आपल्याला तिचा संपूर्ण आरोग्यावर होणारा परिणाम माहित आहे का? चपाती ही आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक मुख्य घटक असून तिच्या वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या शरीरावर अनमोल लाभ होतो. विशेषतः लहान मुलांच्या वाढीच्या टप्प्यावर योग्य चपातीचा समावेश केल्यास त्यांचे आरोग्य अधिक बळकट होऊ शकते. या ब्लॉगमध्ये आपण अशाच ७ प्रकारच्या आरोग्यदायी चपात्यांविषयी माहिती घेणार आहोत.

Advertisement - Continue Reading Below

1. गव्हाची चपाती (Wheat Roti)

गव्हाची चपाती ही सर्वसामान्य आणि दररोज खाल्ली जाणारी चपाती आहे. गव्हात फायबर, कार्बोहायड्रेट्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि लोह असते. मात्र, जर ती जास्त प्रमाणात खाल्ली गेली, विशेषतः पराठा किंवा तूप लावून, तर वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी किंवा वजन कमी करत असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात सेवन करावी.

फायदे:

ऊर्जा मिळवण्याचा प्रमुख स्रोत

पचनासाठी फायबरयुक्त

लहान मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त, पण प्रमाणात खाणे गरजेचे

2. ज्वारीची भाकरी  (Jowar Roti)

ज्वारी ही ग्लूटेन फ्री असून वजन कमी करायला मदत करणारी धान्य आहे. ज्वारीत अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन आणि लोह यांचा समावेश आहे. ही भाकरी लहान मुलांच्या आहारात नक्की असावी, विशेषतः उन्हाळ्यात.

फायदे:

पचनक्रिया सुधारते

मधुमेह व वजन नियंत्रित करण्यास मदत

ग्लूटेन इंटोलरन्स असलेल्या मुलांसाठी उत्तम पर्याय

3. मक्क्याची चपाती (Makka Roti)

मक्का म्हणजेच कॉर्न हे उष्णतेसाठी उत्तम असते. हिवाळ्यात मक्क्याची चपाती खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये फायबर, झिंक, आयर्न, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

थकवा दूर करते आणि ऊर्जा मिळवून देते

हाडे बळकट करण्यास मदत करते

4. रागीची चपाती/रोटी (Ragi Roti)

रागी म्हणजे नाचणी. हिचा उपयोग मुलांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये कॅल्शियम, लोह, आणि अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात.

फायदे:

हाडे आणि दात बळकट होतात

हिमोग्लोबिन वाढवते

लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या थकव्यापासून संरक्षण

5. बाजरीची भाकरी (Bajra Roti)

Advertisement - Continue Reading Below

बाजरी भाकरी ही थंडीमध्ये खाण्यासाठी सर्वोत्तम धान्य आहे. यामध्ये फायबर आणि प्रोटीन प्रचुर प्रमाणात असून ती मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

फायदे:

रक्तातील साखर नियंत्रित करते

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

हृदयासाठी आरोग्यदायी

6. बेसनाची चपाती/पराठे/ठेपले (Besan Roti)

बेसन म्हणजे हरभऱ्याचे पीठ. यामध्ये प्रोटीन, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. ही चपाती शरीरातील स्नायूंना बळकटी देण्यासाठी उपयुक्त आहे.

फायदे:

स्नायूंना ताकद देते

पचन सुधारते

मुलांच्या वाढीसाठी उत्तम पर्याय

7. ओट्सची चपाती (Oats Roti)

ओट्स ही आधुनिक जीवनशैलीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये सोल्युबल फायबर, बीटा ग्लूकन, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

फायदे:

कोलेस्ट्रॉल कमी करते

हृदयासाठी फायदेशीर

वजन नियंत्रित ठेवते

आपल्या मुलांच्या आहारात या भाकरी/चपात्यांची भूमिका:

मुलांच्या आरोग्यासाठी फक्त दूध, भाजी किंवा फळे पुरेसे नाहीत. विविध प्रकारच्या चपात्या त्यांना संपूर्ण पोषण देतात. दररोज एकाच प्रकाराची चपाती न देता, आठवड्यातून २-३ वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या वापरल्यास त्यांना सर्व प्रकारचे पोषक तत्त्व मिळू शकतात.

उदाहरण:

सोमवारी: ज्वारीची भाकरी + पालेभाजी

मंगळवारी: गव्हाची चपाती + टोमॅटो उसळ

बुधवारी: रागीची चपाती +  बटाटा/आलू-मेथी

गुरुवारी: बेसनाची चपाती + दही

शुक्रवारी: ओट्स चपाती + पनीर भाजी

शनिवारी: मक्क्याची चपाती + बटाट्याची भाजी

रविवारी: बाजरीची चपाती + वरण

'चपाती म्हणजे फक्त पोषण नव्हे, ती एक आरोग्य सुधारणारी औषधी आहे.' आपल्या स्वयंपाकघरातील या साध्या घटकाचा योग्य वापर केल्यास, आपल्या मुलांचे आरोग्य, पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि वाढीमध्ये नक्कीच सुधारणा होईल. त्यामुळे आजपासूनच आपल्या आहारात विविध प्रकारच्या चपात्यांचा समावेश करा आणि संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्याची वाटचाल सुरू करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...