मुंबईमधील धुवांधार पावसामुळे होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने जाहीर केली नियमावली!!

All age groups

Sanghajaya Jadhav

880.9K दृश्ये

10 months ago

मुंबईमधील धुवांधार पावसामुळे होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने जाहीर केली नियमावली!!
रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख
रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख

मुंबईमध्ये धुवांधार पावसाचे आगमन होताच, महाराष्ट्र सरकारने आपत्कालीन उपाययोजना म्हणून नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे उद्दिष्ट मुंबईकरांचे रक्षण करणे, पावसामुळे होणाऱ्या आपत्तींचे नियोजन करणे आणि शहरातील सामान्य जनतेचे जीवन सुसह्य बनवणे आहे. तसेच मुंबईत सततच्या पावसामुळे आणि वाढत्या ट्राफिकच्या समस्येमुळे मुंबई महापालिकेने सकाळच्या सत्रातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय पालकांच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला गेला आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शिक्षणाचा समतोल राखला जाईल.त्यामुळे शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सकाळच्या सत्रात तातडीने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement - Continue Reading Below

नवीन नियमावली जाहीर
नवीन नियमावलीनुसार, खालील नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे:

  • सकाळच्या सत्रातील शाळा व महाविद्यालये सकाळी 7 ते 10 या वेळेत बंद राहतील.सर्व शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात शाळा, महाविद्यालयांचे आवार स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावे.शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा आणि वाहतुकीची व्यवस्था सुनिश्चित करावी.
  • पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
  • विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी योग्य साधने उपलब्ध करून द्यावीत.
  • पावसामुळे रस्त्यांची परिस्थिती तपासून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची सूचना.
  • शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था ठेवावी.
  • सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती देण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध करून द्यावीत.
  • शाळा व महाविद्यालयांनी आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करावी.
  • आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी उपाययोजना करावी.

मुंबईत धुंवाधार होत असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मीडियाच्या माहितीनुसार, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात दैना झाली आहे.  जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने लोकांना आपल्या घरातून निघणेही कठीण झाले आहे. शाळा-कालेज आणि मोजक्या कार्यालयांना तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार येत्या काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे वर्तविले आहे. खूप ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डास, कीडे, सरपटणारे जीव-जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. या जीवनामुळे पावसाळी आजारांचा त्रास बळावतो. जागरूक पालकांनी अशा वेळी काय करावे, याबाबत थोडेसे...

पावसाळ्यात जेव्हा पाणीच शत्रू होतो...
काही आवश्यक बाबी

मुंबईच्या पावसाने पुराची शक्यता बळावल्याची माहिती आहे. म्हणूनच मुंबईकर पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

१) खूपच गरजेचे असेल, तरच घराबाहेर पडावे - स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे खूपशा ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी साठलेले असल्याने घरचे वाहनही चालवणे कठीण झाले आहे.

 २) घरात खाणे-पिण्याची सगळी सोय करून ठेवावी. - येणाऱ्या ३-४ दिवसांत शक्यतो हीच परिस्थिती कायम राहील, असे गृहीत धरून आपल्या घरात खाण्या-पिण्याच्या सर्व सामानांची व्यवस्था करून ठेवावी. बटाटे-कांदे, हिरव्या भाज्या, डाळ, राजमा, कडधान्य यांशिवाय तांदूळ, कणिकही साठवून ठेवा. रोज लागणाऱ्या सामानांची यथासांग व्यवस्था करून ठेवावी. 

 ३) वीज खंडित होणे- पावसामुळे वीज खंडित होणे हा प्रकार वारंवार होऊ शकतो; अशावेळी धावपळ करणे शक्यही नसते म्हणून पूर्वीच मेणबत्ती बॅटरी सेल टॉर्च जवळ असणे गरजेचे आहे. विजेचे तार आणि कनेक्शन सुरक्षित राहतील, याकडे लक्ष पुरवावे. जेणेकरून पाण्याच्या संपर्काने शॉर्टसर्किट होणार नाही. यावर एकच उपाय करावा तो म्हणजे विजेचा मुख्य स्वीच बंद ठेवणे.

४) या पावसाळी वातावरणात मुलांना बाहेर खेळण्यास जाऊ देणे म्हणजे स्वतःच्या त्रासात भर टाकणे होय. पण, त्यांना प्रेमाने, रागाने समजावणे गरजेचे.

५) रस्त्यावर जर दोन फूटपेक्षा जास्त पाणी असेल तर स्वतः व मुलांना सोबत घेऊन पाण्यात जाण्याचे धाडस करूच नका.

Advertisement - Continue Reading Below

६) कोणत्याही आकस्मिक घटनेला तोंड देण्याकरिता तुमच्याजवळ एक इमर्जन्सी कीट नक्की ठेवा. या इमर्जन्सी कीटमध्ये टॉर्च, फर्स्ट एड किट, औषध, मुलांकरिता हलके कपडे, तुमचे गरजेचे डॉक्युमेंट्स, काही रोख रक्कम असणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात मुलांना आजारी पडण्यापासून असे वाचवा

मुलं भिजली असतील तर...

पावसाळ्यात जेव्हा पहिला पाऊस होतो तेव्हा मुलांना पाण्यात खेळू न देणेच योग्य. खेळल्यास त्याचे डोके शरीर टाव्हेलने स्वच्छ करावे. त्याला दुसरे कपडे घालायला द्यावे. मुलाला हळद-आलं मिसळून गरमागरम दूध प्यायला देणे जेणेकरून त्याच्या शरीरात गर्मी येईल आणि तो कोणत्याही 'इन्फेक्शन'पासून दोन हात दूर राहील. पावसाळ्यात त्याच्याजवळ अभ्यासाच्या पुस्तकांसोबत रेनकोट असणे गरजेचे आहे. 

मुलांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको 
मुलांना पावसाच्या साठलेल्या पाण्यात खेळण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. मुलांना काहीही खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर हात स्वच्छ धुणे बंधनकारक करावे. मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने त्यांना शक्यतो अँटीसेप्टिक साबणाने अंघोळ करावयास लावणे. जेणेकरून त्यांना एलर्जी वा फंगल इन्फेक्शन होणार नाही.

मान्सूनमध्ये बॅक्टेरियात वाढ होते यामुळे मुलांना एलर्जीचा त्रास होतो म्हणूनच खाण्यापिण्याच्या वस्तूंची स्वच्छता करणे गरजेचे असते. लहान मुलांवर अस्वच्छतेचा मोठ्या माणसांच्या तुलनेत लवकर प्रभाव पडतो म्हणूनच कोणतीही खाण्याची वस्तू मुलांना देण्यापूर्वी ती स्वच्छ असल्याची खात्री करूनच द्यावी. पालकांनी हे लक्षात ठेवावे की मुलांनी हात धुऊनच एखादी वस्तू किंवा जेवण करणे गरजेचे आहे. आपणही हात स्वच्छ धुऊन मुलांना जेवायला देणे. अन्न गरम असल्यावरच मुलांना खाऊ घालावे,  त्यास परत गरम करून देणे शक्यतो टाळावे. 

मुलांना फिल्टरचे पाणी देणे-
 जूनमध्ये पाऊस आणि गर्मी सोबतच असल्याने मुलांना डिहायड्रेशन होत असतो. म्हणूनच, मुलांना स्वच्छ उकळलेले पाणी म्हणजेच फिल्टरचे पाणी द्यावे. मुलांना थोड्या थोड्या वेळाने ज्यूस व नारळ पाणी पाजत राहा, ज्यामुळे मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता पडणार नाही.

मुलांच्या झोपण्याच्या खोलीची स्वच्छता राखा -

मुलांच्या खोलीला 'ओल' मुक्त ठेवावे. तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवावे. खोलीतील खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून स्वच्छ हवा खेळती राहील. रात्री तापमान सामान्य राहील, याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. एसी शक्यतो टाळावा. पावसाळ्यात एसीची हवा हानिकारक असते. 

आरामदायक कपडे घालावेत -

पावसाळ्यात किडे माकोडे यांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जास्त असतो म्हणूनच मुलांना फुल पॅन्ट,  फुल शर्ट घालावा. कपडे सैल असावीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये मुलांना मुलांचे कपडे जराही ओले होऊ देता कामा नये. परिणामी,  संक्रमणाचा त्रास होतो. आपल्या मुलाची तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. सुदृढ आरोग्य राखावयाचे असेल तर थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली, तर पावसाळ्यात होणारे आजार दूर ठेवता येतील.

पालकांची भूमिका आणि जबाबदारी
मुंबई महापालिकेच्या निर्णयानुसार, पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि पावसाळ्यात शाळा व महाविद्यालयांच्या आवारातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य करावे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी सुरक्षित साधने उपलब्ध करून द्यावीत आणि त्यांच्या प्रवासाची स्थिती तपासून योग्य खबरदारी घेण्याची सूचना द्यावी.मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शिक्षणाचा समतोल राखला जाईल.

मुंबईमधील धुवांधार पावसामुळे होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या या नियमावलीमुळे शहरातील नागरिकांचे जीवन सुरक्षित आणि सुसह्य होईल अशी अपेक्षा आहे. या नियमावलीचा योग्य रीतीने पालन केल्यास आपत्तींचा सामना करण्यात मदत होईल आणि नागरिकांचे आरोग्य व संपत्तीचे संरक्षण केले जाईल.मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या शिक्षणाचा समतोल राखला जाईल.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...