मुलांच्या संगोपनाशी संबंधित 15 महत्त्वाच्या गोष्टी

All age groups

Sanghajaya Jadhav

2.8M दृश्ये

3 years ago

मुलांच्या संगोपनाशी संबंधित 15 महत्त्वाच्या गोष्टी
सामाजिक आणि भावनिक

मुलांचे संगोपन करणे ही एक अशी कला आहे, जिची सुरुवात तर आपण करून देतो पण आपल्याला त्यासाठी आयुष्यभर काहीतरी नवीन शिकत राहावे लागते, म्हणजेच अपडेट राहणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे, फक्त हे समजून घेतलं की सार साधंसोपं गणित असत. 
मुलांच्या संगोपनाशी संबंधित काही पालक पारंपारिक तर काही आधुनिक पद्धती वापरतात आणि प्रयत्न करतात की मुले सर्वांत आधी चांगली माणुस बनून देशाचे चांगले नागरिक बनतील. 

Advertisement - Continue Reading Below

मुलांच्या संगोपनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. 

मी तुमच्यासोबत शेअर करत असलेल्या गोष्टी, मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केल्या आहेत, मला आशा आहे की ते तुमच्या मुलाची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील.

१) सीमा निश्चित करणे

लहान मुलांच्या त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही सीमा निश्चित करणे फार महत्वाचे आहे.
२) उड्डाण थांबवू नका

लहान मुलाच्या उंच झेप घेणाऱ्या पंखाना रोखू नका त्यांचे उड्डाण थांबवू नका कारण मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांना तुमच्या स्वतःच्या देखरेखीखाली उडू द्या.

३) प्रश्न सोडवू द्या

कधीकधी त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू द्या, ते स्वावलंबी बनतील. 
४) पौष्टिक अन्नाची सवय 

घरच्या घरी बनवलेल्या चांगल्या आणि पौष्टिक अन्नाची सवय त्यांना सुरुवातीपासूनच लावा, त्यांना समजावून सांगा की या खाण्याने ते मजबूत होतील आणि सर्व काही सहज करू शकतील.

५) सवयी आणि वागणूक

या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी आणि वागणूक देखील बदलणे आवश्यक आहे कारण ते आपल्याला पाहून सर्वात जास्त शिकतात.
६) खोटे न बोलण्याचा प्रयत्न करा

मुलांशी खोटे न बोलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मुलांची स्तुती कराल तेव्हा ते मनापासून करा त्यांना आनंद देण्यासाठी नाही.

Advertisement - Continue Reading Below

७) स्वत:साठी ब्रेक घ्यावा

कधीतरी स्वत:साठी ब्रेक घ्यावा, तो तुम्हाला वाईट ( चुकीचा ) पालक बनू देणार नाही, मुलांना समजावून सांगितलात तर त्यांना समजेल की आम्हालाही स्वतःसाठी वेळ हवा आहे.
८) संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण

दिवसातून एकदा तरी, संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण केले पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायचे असेल की माझे तुझ्यावर प्रेम आहे, तेव्हा ते सांगा.

९) मुलांना सक्रिय ठेवा

मुलांना सक्रिय ठेवा, यामुळे ते निरोगी राहतील
१०) पुन्हा त्यांच्या दृष्टिकोनातून

आणि मी आता म्हटल्याप्रमाणे माझी मुलं किशोरवयीन आहेत, आम्ही जगाकडे पुन्हा त्यांच्या दृष्टिकोनातून पाहू लागलो आहोत.
११)  पेहराव आणि वागणूक

आता या वयात मुलं, त्यांची विचारसरणी, पेहराव आणि वागणूक एवढ्या झपाट्याने बदलतात की ते स्वतःही हे बदल पूर्णपणे स्वीकारू किंवा नाकारू शकत नाहीत.

१२) हार्मोनल बदल

जसे हार्मोनल बदल त्यांना अचानक आपल्या पासून हायजॅक करतात, तेव्हा आपण पुढे येऊन त्यांना मित्र बनून किंवा पालक बनून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यायला हवा. 
१३) जबाबदाऱ्याही द्या

त्यांना जबाबदार बनवण्यासाठी छोट्या जबाबदाऱ्याही द्या. त्यांच्यासाठी स्वच्छ राहणे आणि इतरांची काळजी घेणे आणि त्यांचा आदर करणे शिकणे देखील खूप महत्वाचे आहे.

१४) यातूनच शिकतील

कर्त्यव्य , जबाबदाऱ्या द्या ,सांगा ते यातूनच शिकतील तुम्ही बघाल तुमचे मुलं मोठे झाले आहे. 

१५) समाधान महत्वाचे 

शेवटी समाधान महत्वाचे तुम्ही संतुष्ट समाधानी राहलात की मुलंही तसंच बनेल. 

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...