1. रोग-व्यवस्थापन-आणि-स्व-देखरेख- ...

प्रिन्सेस सिंड्रोम आणि आईचा लाडका: मुलांचं हट्टी, आळशी वागणं – कारणं व उपाय

All age groups

Sanghajaya Jadhav

109.8K दृश्ये

1 months ago

प्रिन्सेस सिंड्रोम आणि आईचा लाडका: मुलांचं हट्टी, आळशी वागणं – कारणं व उपाय
रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख
Story behind it

मुलांच्या संगोपनात प्रेम, काळजी, आणि सुरक्षितता यांचे अत्यंत महत्त्व असते. पण जेव्हा हे प्रेम अंधळं होतं, तेव्हा ते ‘प्रिन्सेस सिंड्रोम’ किंवा ‘माँ का लाडला सिंड्रोम’मध्ये परिवर्तित होतं. यामुळे मुलं स्वावलंबी, जबाबदार न होता "मला सगळं हवं" या भावनेत अडकतात. आजच्या पालकत्वात एक मोठं आव्हान म्हणजे मुलांना अति लाडाने, अति सवलती देऊन त्यांना 'प्रिन्सेस' किंवा 'राजा बाबू' बनवणं. त्यातून तयार होणाऱ्या मुलांना स्वप्नातील जगातच राहायची सवय लागते. त्यांना जबाबदाऱ्या टाळायच्या असतात, निर्णय घ्यायचं धाडस नसतं आणि आयुष्यात काही चुकलं तर दोष दुसऱ्यांवर ढकलण्याची सवय लागते. यालाच इंग्रजीत "Princess Syndrome" किंवा "Entitlement" म्हणतात, आणि आपल्या भाषेत बोलायचं झालं तर "आईचा लाडका".

Advertisement - Continue Reading Below

प्रिन्सेस सिंड्रोम म्हणजे काय?

'प्रिन्सेस सिंड्रोम' ही संकल्पना मुख्यतः मुलींसाठी वापरली जाते. यात मुलगी नेहमी विशेष वागणूक मिळावी, ती केंद्रस्थानी असावी, आणि कोणी तरी तिचं रक्षण करावं अशी अपेक्षा ठेवते. प्रिन्सेस सिंड्रोम ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे मुलगी (किंवा मुलगा) स्वतःला अतिशय खास समजते, आणि प्रत्येक गोष्ट तिला/त्याला मिळणं अपेक्षित असतं – मेहनत न करता. ही भावना लहानपणापासून वाढत जाते, कारण पालक त्यांच्या लाडक्या बाळाच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करतात. हीच अती काळजी, अती सवलत पुढे जाऊन स्वावलंबनावर मर्यादा आणते.

Advertisement - Continue Reading Below

लक्षणं:

  • सतत एप्रिशिएशनची अपेक्षा
  • स्वतःहून निर्णय न घेणे
  • प्रत्येक गोष्टीत स्पेशल वागणुकीची गरज
  • नकार सहन न होणे
  • जीवनात संघर्ष न करण्याची वृत्ती

"आईचा लाडका" – एक अतिशय सामान्य पण धोकादायक संकल्पना

हा सिंड्रोम मुलांमध्ये आढळतो जिथे आई विशेषतः मुलाला फारच जपते, प्रत्येक काम त्याच्यासाठी करते, आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीपासून दूर ठेवते. मुलगा आईचा लाडका असणं चुकीचं नाही, पण जेव्हा तो लाड इतका वाढतो की त्याला जबाबदारी, कष्ट किंवा स्वयंपूर्ण होणं ही गोष्टी दूर वाटायला लागतात, तेव्हा हे धोकादायक ठरतं. अशा मुलांना पुढे जाऊन स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, ते भावनिकदृष्ट्या अस्थिर होतात.

परिणाम:

  • स्वयंपाक, कपडे घालणे, बॅग भरणे यासारख्या मूलभूत गोष्टीही त्यांना जमत नाहीत.
  • ते इतरांवर अवलंबून राहतात.
  • खोटं बोलून सुटका शोधतात.
  • त्यांच्या सहनशक्तीचा अभाव असतो.
  • नोकरी, लग्न यासारख्या नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात.

पालकांनी टाळायच्या 7 सामान्य चुका

  1. सर्व काही त्यांच्या मनासारखं घडवणं
  2. त्यांच्या चुका झाकणं
  3. घरकामातून दूर ठेवणं
  4. नेहमी दुसऱ्यांशी तुलना करणं
  5. 'ना' म्हणायला घाबरणं
  6. शिस्त लावण्यात सातत्य नसणं
  7. मुलांचं मत न विचारता निर्णय घेणं

मुलांना स्वावलंबी बनवण्याचे मार्ग:

स्वतःचे छोटे निर्णय घेऊ द्या – कपडे निवडणं, अन्नात काय खायचं ते ठरवणं यासारख्या छोट्या गोष्टींमध्ये सहभाग द्या.

घरकामात सहभागी करा – अंथरुण घालणं, पिशव्या उचलणं, जेवणात मदत करणं.

त्यांना 'ना' म्हणा – प्रत्येक वेळेस होकार देणं योग्य नाही. स्पष्ट पण प्रेमळ नकार देण्याचं कौशल्य आत्मसात करा.

स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या – चूक झालीच तर शिक्षा न करता परिणाम समजावून द्या.

पैशांची किंमत समजवा – पॉकेट मनी द्या, पण जबाबदारीसह.

प्रशंसा आणि टीका यांचा योग्य समतोल ठेवा

मुलांचं स्पॉईल होणं कसं ओळखाल?

  1. सतत रडून गोष्टी मिळवायचा प्रयत्न करतात.
  2. दुसऱ्यांचं ऐकण्यास नकार देतात.
  3. छोटीशी गोष्ट न मिळाल्यास रागावतात किंवा हट्टी होतात.
  4. जबाबदारी घ्यायला तयार नसतात.

मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवावा?

त्यांचं ऐका – त्यांचं मत विचारात घ्या, त्यांना महत्त्व द्या.

त्यांना बोलण्याची संधी द्या – कुटुंबाच्या गप्पांमध्ये त्यांचं मत विचारलं जावं.

स्वतःचं काम स्वतः करू द्या – काम केल्यावर जो आत्मगौरव येतो, तोच खरी आत्मविश्वासाची पायरी आहे.

तुमचं प्रोत्साहन सतत द्या – "तू हे करू शकतोस" हे ऐकणं त्यांचं मनोबल वाढवतं.

अनुशासनाचे (शिस्तीचे) काही सोपे नियम:

नियम ठरवा आणि त्याचे पालन करा.

नियम तोडल्यानंतर स्पष्ट आणि त्वरित परिणाम समजावून द्या.

पालक स्वतः शिस्तीचे आदर्श असले पाहिजेत.

वेळोवेळी संवाद साधत राहा.

स्वतःच्या मुलांना प्रेम देणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणं हाच खरं "प्रेम" आहे. "प्रिन्सेस सिंड्रोम" किंवा "माँ का लाडला" ही टाळण्यासाठी आईवडिलांनी काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात – ते त्यांचं भवितव्य उज्वल करण्यासाठीच असतात.म्हणूनच ‘आईचा लाडका' किंवा ‘प्रिन्सेस’ बनवण्यापेक्षा, त्यांना योद्धा, नेता, आणि स्वतंत्र विचार करणारा नागरिक बनवा.

आजपासूनच पालक म्हणून आपण ठरवूया –

"मी माझ्या मुलांना राजकुमार किंवा राजकुमारी बनवणार नाही, मी त्यांना राजा किंवा राणी बनवणार – स्वतःच्या जगावर राज्य करणारे!"

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...