1. रोग-व्यवस्थापन-आणि-स्व-देखरेख- ...

रणरणत्या उन्हाळ्यातही मुलांना होण्यारी सर्दी: कारणं, लक्षणं व घरगुती उपाय

All age groups

Sanghajaya Jadhav

170.3K दृश्ये

2 months ago

रणरणत्या उन्हाळ्यातही मुलांना होण्यारी सर्दी: कारणं, लक्षणं व घरगुती उपाय
रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख
हवामानातील बद्दल

उन्हाळा सुरू झाला की, अनेक पालकांना वाटतं की आता आपल्या मुलांना सर्दी-पडसेचा त्रास होणार नाही. पण उन्हाळ्यात देखील लहान मुलांना सर्दीचा त्रास होतो, ज्यामुळे पालकांना चिंता वाटू लागते. मुलांमध्ये उन्हाळ्यात सर्दी होण्याची कारणं, लक्षणं आणि त्यावरील घरगुती उपाय जाणून घेऊया.

Advertisement - Continue Reading Below

उन्हाळ्यात सर्दी होण्याची कारणे

  • अतिथंड पदार्थांचे सेवन: आइसक्रीम, कुल्फी, शीतपेय यांचे सेवन मुलांना आवडते. पण या थंड पदार्थांमुळे घसादुखी व सर्दी होऊ शकते.
  • अचानक तापमान बदल: उन्हाळ्यात पंखा, कुलर, एसीचा वापर होतो. गरम वातावरणातून थंड वातावरणात गेल्यास सर्दीची शक्यता वाढते.
  • धूळ आणि प्रदूषण: उन्हाळ्यात बाहेर खेळताना मुलांना धूळ लागते. त्यामुळे सर्दी होऊ शकते.
  • अ‍ॅलर्जी: धूळ, परागकण किंवा इतर ॲलर्जीनमुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो.
Advertisement - Continue Reading Below

मुलांमध्ये सर्दीची लक्षणे

नाक वाहणे

वारंवार शिंका येणे

घसा खवखवणे

ताप येणे

थकवा जाणवणे

उन्हाळ्यात सर्दीवर घरगुती उपाय

तुळशी आणि आल्याचा काढा: तुळशीच्या पानांचा रस आणि आलं घालून काढा तयार करा. यामुळे सर्दी कमी होते.

हळदीचे दूध: कोमट दुधात हळद टाकून दिल्यास घसादुखी कमी होते.

वाफ घेणे: गरम पाण्याच्या वाफेमुळे नाकाची धुप कमी होऊन श्वसन सोपे होते.

मध आणि लिंबू: मध आणि लिंबाचा रस दिल्यास घशाला आराम मिळतो.

उन्हाळ्यात सर्दीपासून बचावाचे उपाय

मुलांना थंड पदार्थ जास्त देऊ नका.

मुलांना बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवायला लावा.

एसी किंवा कुलरचा योग्य वापर करा. थंडीतून लगेच गरमीत जाऊ देऊ नका.

मुलांच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडंट्स असलेले पदार्थ समाविष्ट करा.

पालकांनी घ्यावयाची काळजी

मुलांना योग्य प्रमाणात पाणी पाजावे.

आहारात फळे, भाज्या आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात द्यावीत.

सर्दी टाळण्यासाठी आहारातील बदल

आल्याचा रस, लसूण, तूप यांचा आहारात समावेश करा.

मुलांना फळं, भाज्या, सूप, नारळपाणी द्या.

फ्रोझन पदार्थ कमी करा, घरगुती कोमट पदार्थ द्या.

मुलांना स्वच्छता राखायला शिकवा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

सर्दी सात दिवसांहून अधिक टिकली तर

ताप वाढला आणि अंगदुखी झाली तर

नाकातून हिरवट शेंबूड येत असल्यास

उन्हाळ्यातील सर्दी साधारणपणे धोकादायक नसते, पण ती वेळेवर सांभाळली नाही तर त्रासदायक होऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास मुलांचे आरोग्य उत्तम राहू शकते. 

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...