• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक

छेडछाड किंवा गुंडगिरी मुळे होणारे विकार व दुष्परिणाम

Kranti S
7 ते 11 वर्षे

Kranti S च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Aug 31, 2020

छेडछाड किंवा गुंडगिरी मुळे होणारे विकार व दुष्परिणाम
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

शाळेतील वरच्या वर्गातील मुलं बऱ्याच वेळा आपली ताकद आणि अनुभव वापरून नवीन विद्यार्थ्यांशी तसेच खालच्या वर्गातील मुलांशी असभ्य आणि आक्रमक पद्धतीने गैरवर्तन करतात .अशावेळी या वर्तनाला बळी पडलेले विद्यार्थी मानसिक संतुलन गमावतात. कधीकधी याचा परिणाम कायमस्वरूपी आणि गंभीर समस्यांमध्ये होतो.

कोण कोणत्या पद्धतीने बुलिंग होऊ शकते?

यामध्ये धमक्या देणे, अफवा पसरवणे, एखाद्यावर शारीरिक किंवा शाब्दिक हल्ला करणे ,हेतूपुरस्पर एखाद्यास गटातून बाहेर काढणे ,शारीरिक किंवा आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीवरून चिडवणे,  लैंगिक टिप्पण्या करणे, टोमणे मारणे ,आईवडिलांवरून चिडवणे, इतर मुलांना त्यांच्याशी मैत्री न करण्याचा सल्ला अथवा धमक्या देणे ,अश्लील वर्तन करणे, दुसऱ्याच्या वस्तू  हिसकावून घेणे किंवा त्यांचे नुकसान करणे ,शूद्र हावभाव करणे इत्यादींचा समावेश होतो.

बुलिंग कुठे होऊ शकते?

बऱ्याच वेळा हे सर्व प्रकार शाळेच्या आवारात, होस्टेलमध्ये, खेळाच्या मैदानावर, स्कूल बस मध्ये किंवा इंटरनेटवरूनही ( cyber bullying ) घडतात.

बुलिंग ला कोण बळी पडू शकते?

एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की 11 ते 18 या वयोगटातील 20% मुलं छेडछाड  व गुंडगिरीचा सामना करत असतात. काही मुलांना याचा धोका इतर मुलांपेक्षा जास्त असतो. ज्या मुलांचे फ्रेंड सर्कल कमी आहे ,शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमजोर आहेत  , स्थूल किंवा अतिशय बारीक आहेत, ज्यांना चष्मा किंवा ब्रेसेस आहेत, ज्यांना काही शारीरिक अपंगत्व आहे, आर्थिक परिस्थिती कमी आहे किंवा ज्यांचं राहणीमान साधं आहे सगळं किंवा जी मुलं वेगळ्या वांशिक गटातील आहेत अशा मुलांना याचा जास्त सामना करावा लागतो .
तसेच समलैंगिक ,उभयलिंगी किंवा ट्रान्सजेंडर असलेले विद्यार्थी सुद्धा बुलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिकार होतात .तसेच ऑटिझम किंवा एडी एचडी  असलेली मुलं सुद्धा याला बळी पडू शकतात .

बुलींगचा परिणाम काय होऊ शकतो?
याचा परिणाम म्हणून बरीच मुला नैराश्याच्या खाईत जातात. चिडचिड करणे ,एकटेच राहणे ,भूक मंदावणे, सतत  चिंताग्रस्त राहणे अशा गोष्टी या मुलांमध्ये निदर्शनास येऊ लागतात .काही मुले नशील्या पदार्थांच्या (  drugs) आहारी जातात .तर काही मुलं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करतात .एकटे राहणे ,सामाजिक कार्यातून माघार घेणे ,आत्मविश्वास कमी होणे हीसुद्धा याचीच लक्षण आहेत. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे ही मुलं  इतरांशी बोलणं टाळतात. तसेच सामाजिक कार्यातही माघार घेतात. त्यांना सतत असुरक्षित वाटते.

आपल्या मुलांबरोबर बुलींग होत आहे हे कसे ओळखाल?

सुरुवातीच्या काळात ही मुले शाळेत जाण्यासाठी टंगळमंगळ करतात. वारंवार डोकेदुखी ,पोटदुखी किंवा आजारी असल्याचं सांगतात. परंतु यापैकी कोणतेही कारण सत्य नसल्याचे वैद्यकीय चाचणी मध्ये आढळून येते .किंवा इतरही काही कारणे सांगतात .त्यांचे मार्कस हळूहळू कमी होऊ लागतात.  शाळेतील त्यांचे  स्वारस्य कमी होऊ लागते.

पालक म्हणून आपण कोणती सावधगिरी बाळगावी?

अशावेळी सावधगिरी बाळगा. ही मुले त्यांच्यावर अत्याचार होत असलेले कोणालाही जाणवू देत नाहीत. आपल्या मुलांबरोबर काय घडत आहे यावर लक्ष ठेवा. त्यांच्याशी नियमितपणे बोला. त्यांच्या शाळेतल्या गोष्टींमध्ये रुची दाखवा. त्यांच्याशी वारंवार संभाषण करा. आणि आपली मुलं आपल्याशी मोकळेपणाने संभाषण करु शकतील असे वातावरण निर्माण करा. शिक्षकांच्या संपर्कात राहा .तसेच त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या सुद्धा संपर्कात राहा .पालक म्हणून आपल्या मुलांसाठी आपण सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी गुंडगिरीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे देखील शक्य आहे .आपल्या मुलांना अशा समस्यांना  कशा हाताळायच्या याबद्दल मार्गदर्शन करा .गरज भासल्यास मानस शास्त्रज्ञांकडून सल्ला घ्या.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}