0-1 पेक्षा लहान मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे, आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी लस

Prasoon Pankaj च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Jan 15, 2021

प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रंगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात,किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.
लसीकरण का आवश्यक आहे ?
बाळाला त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्येच लसीकरण करणे अत्यावश्यक असते. डांग्या खोकल्यामुळे होणार्या मुलामुलींच्या मृत्यूंपैकी अर्धे, पोलिओने होणार्या मृत्यूंपैकी एकतृतियांश तर गोवरामुळे होणार्या मृत्यूंपैकी एकचतुर्थांश त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षामध्येच होतात. लसीकरणामुळे कित्येक गंभीर आजारांपासून बचाव होतो. लस न टोचलेले बाळ जास्त वेळा आजारी पडते त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा पोषण न मिळून त्याचे मरणदेखील ओढवू शकते.मूल आजारी असले, त्याला काही अपंगत्व असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित असते.
आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी लस
बाळाच्या पहिल्या वर्षामध्ये त्याला संरक्षण देण्यासाठी खालील तक्त्यामधील सर्व लसी देणे महत्वाचे आहे. येथे जाणून घ्या...
-
बीसीजी
-
एचआयबीवय
-
डीपीटी
-
पोलिओ
-
हेपेटायटिस बी
-
गोवर
-
त्रिगुणी लस( डांग्या खोकला,घटसर्प, धनुर्वात)
-
द्विगुणी लस( घटसर्प व धनुर्वात)
बाळाच्या पहिल्या वर्षामध्ये त्याला संरक्षण देण्यासाठी खालील तक्त्यामधील सर्व लसी देणे महत्वाचे आहे. बाळाच्या पहिल्या वर्षामध्ये काही कारणास्तव लसीकरण पूर्ण झालेले नसल्यास विशेष राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्या अंतर्गत किंव शक्य तितक्या लवकर ते पूर्ण करा. आरोग्यकेंद्रात या लसी मोफत मिळतात. या लसींची शिफारस का झाली ते जाणून घ्या...
-
बी.सी.जी. - बाळाचा क्षयरोगापासून (विशेषत: मेंदूचा क्षयरोग) बचाव करण्यासाठी बी.सी.जी. उपयोगी आहे. ही लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. ही लस जन्मल्यावर लगेच दुस-या दिवशीही दिलेली चालेल. शक्यतो ही लस तीन-चार महिन्यांपर्यंत टोचली जावी. काही कारणांनी हे राहून गेल्यास एक वर्षापर्यंत तरी टोचून घेणे आवश्यक आहे.
- टोचलेल्या जागी 15 दिवसांनी छोटी पुळी तयार होते. चार ते सहा आठवडयांत ही पुळी भरून येऊन बी.सी.जी. ची खू्ण तयार होते.
-
त्रिगुणी लस - या लसीत डांग्या खोकला,घटसर्प, धनुर्वात या तीन लसींचा समावेश आहे.
-
त्रिगुणी लस वयाच्या तिस - या महिन्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा याप्रमाणे तीन वेळा (शक्यतो मांडीवर) टोचतात. लस टोचल्यानंतर एक दिवस ताप येतो. त्यासाठी पॅमालची चतकोर गोळी किंवा तापाचे पातळ औषध द्यावे. संपूर्ण प्रतिकारशक्ती येण्यासाठी दरमहा पहिले तीन व नंतरचे बूस्टर डोस जरूरीचे आहे. शक्यतो पहिल्या दोन इंजेक्शनमधील अंतर दोन महिन्यांहून अधिक असू नये.
-
पोलिओ - हे डोस लाल रंगाचे थेंब असतात. बाळाला पोलिओचा पहिला डोस जन्मल्यानंतर 1/2दिवसांत द्यावा. नंतरचे डोस त्रिगुणी लसीच्या बरोबरीने मुलांना तोंडाने पाजतात. डोसच्या आधी व नंतर अर्धा तास गरम पाणी, गरम दूध देऊ नये.
-
गोवर प्रतिबंधक लस - गोवर हा तसा साधा आजार असला तरी अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गोवरानंतर न्यूमोनिया, छातीत कफ (श्वासनलिकादाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. यामुळे मुळात सौम्य कुपोषित असलेली मुले जास्तच कुपोषित होतात. म्हणून गोवर लस महत्त्वाची असते.
- बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे इंजेक्शन व 15 व्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बूस्टर (फेरडोस) इंजेक्शन द्यावे. गोवर लसीनंतर ताप किंवा गाठही येत नाही. हे इंजेक्शन त्वचेखाली देतात.
-
द्विगुणी लस - यामध्ये फक्त घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस असते. यात डांग्या खोकल्याविरुध्दची लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर डांग्या खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बूस्टरसाठी द्विगुणी लसीची इंजेक्शने व पोलिओ डोस देतात.
- काही कारणांनी मुलाला तिस - या वर्षापर्यंत कुठलीच लस दिलेली नसेल तर प्रत्येक महिन्यात एक अशी द्विगुणी लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावे. एक वर्षाने दोन्हींचे बूस्टर व पाचव्या वर्षी दुसरा बूस्टर द्यावा.
लसीकरण पूर्णपणे करण्यात आले पाहिजे अन्यथा दिलेल्या लसींचादेखील काही ही उपयोग होत नाही. यासाठी ०-१ वयोगटातील बालकांना लसीकरण करणे गरजेचे आहे.लसीकरण व त्यासंबंधीच्या सल्ल्यासाठी आरोग्य सेवकाला भेटा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.


