• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
अन्न आणि पोषण

1 ते 3 वयोगटातील मुलांचे आरोग्य आणि संगोपन

Canisha Kapoor
1 ते 3 वर्ष

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 26, 2018

1 ते 3 वयोगटातील मुलांचे आरोग्य आणि संगोपन

बाळ जन्माला आल्यानंतर ते मोठे होईपर्यंत म्हणजे साधारण एक ते तीन वर्षे त्याची काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते . या काळात बाळाचा शारीरीक व मानसिक विकास होणे अत्यंत महत्त्वाचे असते . हा सर्वांगीण विकास नीट झाला तर बाळाला भविष्यात रोगविकारांची बाधा येत नाही . बाळाचा सर्वांगीण विकास कसा घडवावा ? कोणती काळजी घ्यावी ? असे बरेच प्रश्न प्रत्येक आईला पडतात.

 1.  आहार:-दुसऱ्या वर्षातसुद्धा आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो . त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते . बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे . तसेच बाळ जसे मोठे होत राहील तसेच आईच्या दुधासोबतच भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा . हा आहार बाळाच्या वाढीसाठी मदत करतो . तसेच काही दिवसांनी म्हणजे जेव्हा बाळ दीड ते दोन वर्षाचे होईल तेव्हा वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे . आणि जेव्हा बाळ अडीच वर्षे पूर्ण करेल त्यानंतर त्याला घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील . तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते . याप्रकारे बाळाच्या आहाराची काळजी घेतली तर ती बाळाच्या वाढीसाठी मदत करते.
   
 2. बाळाचे बदल :- बाळामध्ये होणाऱ्या बदलांवर आईचे बारकाईने लक्ष असणे गरजेचे असते . बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे . ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. तसेच बाळाची वाढ होत असताना त्याला योग्य आहारा सोबतच योग्य कपडे वापरणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते . बाळाला असे कपडे घालावे कि ज्याने त्याच्या वाढीत बाधा येणार नाही.
   
 3. बाळ जेव्हा एक वर्षांचे होते तेव्हा ते हळूहळू पाऊले टाकायला सुरुवात करते . या काळात बाळाकडे लक्ष देणे गरचेचे असते कारण ते चालताना त्याचा तोल जाऊ शकतो मग बाळ पडू नये त्याला लागू नये ही काळजी घ्यावी लागते . बाळाची तेलाने मालिश करणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते कारण मालिश केल्याने बाळाची हालचाल लवकर होण्यास मदत होते . बाळ जेव्हा साधारण एक  वर्ष्याचे होते तेव्हा त्याला दात येतात . यादरम्यान बाळाला त्रास होतो उलट्या होणे, ताप येणे अश्या समस्या येतात . यावेळी बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखवणे गरजेचे असते.
   
 4. स्वछता:- बाळाच्या आहाराबरोबरच त्याची स्वच्छता तेवढी च महत्त्वाची असते . कारण बाळाच्या स्वच्छतेचा बाळाच्या आरोग्यावर खुप जास्त परिणाम होऊ शकतो . बाळाचे कपडे गरम पाण्याने धुवावेत . त्यामध्ये डेटोल वगैरे टाकावे कारण त्याने बाळ आजारांपासून दूर राहते . बाळाचे डायपर वेळेवर बदलावे जास्त काळ बाळाला डायपर मध्ये ठेवू नये . डायपर ओले असल्यास ते पटकन बदलावे त्याने जंतू पसरू शकतात व त्याने बाळाला आजार होऊ शकतात . तसेच त्वचेचे आजार होण्याचीही तेवढीच शक्यता असते . बाळाला जे रुमाल आपण वापरतो ते सुद्धा स्वछ धुतलेले हवेत . कमीतकमी दिवसातून दोन वेळा तरी बाळाला स्वछ करावे व त्याचे कपडे बदलावे . आपण ज्या ताट व वाटी मध्ये आपण बाळाला जेवण चारतो ते देखील स्वछ धुतलेले हवे . बाळाची स्वछता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे कारण याचा बाळाच्या आरोग्यावर खुप परिणाम होतो . बाळाचा आहार , स्वछता व त्याचे बदल याबरोबरच बाळाच्या सवयी व त्याची वागणूक यावर लक्ष ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते . बाळ कसे वागते कसे बोलते यावर देखील आईचे बरकाईने लक्ष असायला हवे . कारण हा काळ बाळाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा असतो.

 • 2
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.

| Jan 06, 2019

maze bal 1 ahinyche ahe .sandas warnwar karto , tyamule tyala ,sandaschya jagewar jakhanm zali ahe

 • अहवाल

| Jan 04, 2019

maze bal 2 year 6 month che aahe .to ajun brest fiding kart aahe to zopatach nahi fiding kelyashivay kay karave

 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
वर अन्न आणि पोषण ब्लॉग
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}