• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
बाळ काळजी अन्न आणि पोषण

0 ते 1 वर्ष वयोगटातील शिशूसाठी पोषण, 0-1 वर्षाच्या मुलासाठी पोषण कसे पाहिजे ?

Canisha Kapoor
0 ते 1 वर्ष

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Mar 15, 2019

0 ते 1 वर्ष वयोगटातील शिशूसाठी पोषण 0 1 वर्षाच्या मुलासाठी पोषण कसे पाहिजे

योग्य आणि पुरेशा अन्नाआभावी नवजात शिशूची वाढ खुरटते. कुपोषणामुळे बौध्दिक वाढही खुंटते. रोगाचा मुकाबला करण्याची शक्ती कमी होते. जुलाब, जंत आणि कुपोषण यांचे एकमेकांमध्ये अगदी घट्ट नाते आहे. कारण सर्वसाधारणपणे आर्थिक,सामाजिक परिस्थितीमुळे परिसराची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी राखली जात नाही. लहानपणी कुपोषण, खुरटलेली वाढ आणि रोगटपणा ज्या मुलांच्या मागे लागतो, तो मोठेपणातही त्यांची सहसा पाठ सोडत नाही. मोठेपणीही या मुलांची काम करण्याची शक्ती,रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. म्हणून लहानपणापासून योग्य व समतोल आहार महत्त्वाचा आहे.

 

0-1 वर्षाच्या मुलासाठी पोषण कसे पाहिजे ?

पहिल्या चिकामध्ये भरपूर प्रथिने व रोगप्रतिबंधक घटक (प्रतिघटक) असतात...

 • जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळ जन्मल्यावर लगेच अर्ध्या तासात पाजण्यासाठी अंगावर घेणे महत्त्वाचे असते. म्हणून हा चीक वाया जाऊ देऊ नये. दूध कमी पडल्यास उकळून थंड केलेले पाणी, साखर घालून वाटी-चमच्याने पाजावे. पण प्रत्येक वेळी प्रथम बाळाला पाजायला घेणे आवश्यक आहे.

 • वरचे दूध देताना ते शक्यतो गाईचे किंवा शेळीचे असावे. विशेषत: बाळ दोन महिन्यांपेक्षा लहान असेल तर गाईचे दूध उकळून थंड करून साय काढून टाकावी. एक कप दूध, पाव कप पाणी, एक चमचा साखर असे दूध वाटी-चमच्याने पाजावे. आईच्या दुधात नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असते. मात्र वरच्या दुधात साखर घातली नाही तर त्यांचे उष्मांक कमी पडून बाळाचे पोषण चांगले होत नाही. गाईच्या व म्हशीच्या दुधात क्षार जास्त असतात म्हणून वरचे दूध पाजताना बाळाला दिवसातून दोन-तीनदा स्वच्छ पाणी पाजावे. दूध म्हशीचे असल्यास एक कप दुधाला अर्धा कप पाणी घालावे.

 • तीन महिन्यांच्या पुढे पाणी न घालता दूध पाजावे. दूध पावडरच्या डब्यामधले दूध द्यायलाही हरकत नसते. डब्यावर लिहिलेल्या प्रमाणात दूध तयार करावे लागते. कमी पावडर घातल्यास दूध पातळ होते म्हणून कमी पोषक असते. 

 • सहाव्या महिन्यात आईच्या दुधाबरोबर पूरक अन्न म्हणून वरचे अन्न सुरू करावे. प्रथम भाताची घट्ट पेज, वरणाचे घट्ट पाणी यात पालक, करडई, गाजरे, कोबी सारखी भाजी पूर्ण शिजवून त्यात मीठ किंवा साखर घालून मऊ करून भरवावी. संत्री, मोसंबी, पिकलेले केळे, आंबा, चिक्कू, द्राक्षे सारखे फळाचा रस किंवा गर काढून रोज अर्धी वाटी भरून द्यावा. यामुळे बाळाला जीवनसत्त्व मिळते. तांदळाची खीर, नाचणीची खीर, वरणभात (मऊ शिजवून) किंवा खिचडी, उकडलेला बटाटा मऊ करून, चपाती, भाकरी, केळे, पपई, आंबा, पेरू, इत्यादी फळ, अंडे उकडून प्रथम पिवळा भाग देऊ शकतात.  

 • सात-आठ महिने वय असलेल्या बाळा थोडंसं जड अन्न खाऊ शकते आणि त्याला खाऊ घालणेही सोप्पे जाते. त्याला हा आहारातला बदल आवडू लागतो आणि खाताना ते जास्त त्रासही देत नाही.

 • नऊ -दहा महिन्यांनंतर पूर्ण अंडे, मटनाचे पाणी किंवा सूप, कोणतीही पालेभाजी, गाजर, टोमॅटो, तूप, लोणी, इत्यादी देणे सुरू करावे. अशा प्रकारे आहारातील पदार्थ हळूहळू वाढवत न्यावेत.

 • ११ महीन्याचे होईपर्यंत जरी त्याचे बरेचसे दात आलेले असतात तरीही छोटे छोटे घास भरवणे, आणि कुस्करून खाऊ घालणे कधीही चांगले, जेणेकरून अन्न घशात अडकणार नाही. तेवढी काळजी घ्या.

 • एक वर्षाच्या बाळाने अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वर्षभरानंतर दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळाच दूध द्यावे व वरचे अन्न वाढवावे. दात येण्याच्या सुमारास रोज नाचणीची दूध, गूळ घालून खीर सुरू करावी. पौष्टिक खीर करण्याची एक सोपी पध्दत आहे. 1 कप तांदूळ, अर्धा कप हरबरा डाळ, अर्धा कप शेंगदाणे हे सर्व भाजून भरडून ठेवावे. गरजेप्रमाणे या भरडयात दूध व गूळ घालून खीर तयार करता येते. तांदळाऐवजी नाचणी चालते. १ वर्ष पूर्ण होत आले म्हणून बाळाचे स्तनपान बंद करू नये. कमीत -कमी ६ महिने आणि १२-१८ महिन्याचे होईपर्यंत शिशूच्या आहारात स्तनपान महत्वाचे असते

 

 • 5
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.

| Mar 06, 2019

माझा मुलगा सहा महीण्याचा झाला आहे त्याला मी नाचणी व म्हशीचे दुध मिक्स करूण देतो क्बरोबर आहे का

 • अहवाल

| Mar 06, 2019

माझा मुलगा सहा महीण्याचा झाला आहे त्याला मी नाचणी व म्हशीचे दुध मिक्स करूण देतो क्बरोबर आहे का

 • अहवाल

| Mar 05, 2019

maza mulgala 6month calu zhala tyala ky khayala deu. bhardi dety rice chi pan te suruvar kela pasun sarka ajari padto ani cup pan khup ahai pls sanga na ky karu

 • अहवाल

| Feb 16, 2019

mazya mulila 6va mahina Chalu ahe. Tila Kay Kay khayla Chalu Karu.

 • अहवाल

| Feb 16, 2019

mazya mulala 6 month chalu aahe mi tyala kay khayla deu shakte

 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}