• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक शिक्षण आणि शिक्षण

मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्याच्या १० टिप्स

Sanghajaya Jadhav
1 ते 3 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Feb 20, 2022

मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवण्याच्या १० टिप्स
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

आजकाल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या काळात आपण फोनवर सर्वाधिक अवलंबून झालो आहोत. आपण आपला जास्तीत जास्त वेळ फोन वापरतो. स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी आणि मुलांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही त्यांना फोन अगदी लवकर आणि अगदी लहान वयातच मुलांच्या हातात देतो. हे खरे आहे की मुले मोठ्यांपेक्षा पटकन फोन चालवायला शिकतात आणि त्यानंतर त्यांना त्या फोनसोबत राहायला आणि त्यांचा वेळ घालवायला आवडते. पण ही निवड हळूहळू सवय बनते, ज्यामुळे खरी समस्या सुरू होते.

  • जर तुमचे मूलही अनेकदा मोबाईलला चिकटलेले असेल, तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.
  • वास्तविक, मोबाईलचा अतिवापर आपल्या मुलासाठी घातक ठरू शकतो.
  • डॉक्टरांच्या मते, आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, निद्रानाश आणि चिडचिडेपणा यासारख्या मानसिक समस्या वाढत आहेत.
  • याशिवाय मोबाइलच्या व्यसनामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, भूक न लागणे, दृष्टी कमी होणे, डोळे दुखणे, मान दुखणे असे शारीरिक आजारही होत आहेत.

मुलांमधील मोबाईलचे व्यसन किंवा सवय कशी करण्यासाठी उपाय 

१) वेळ निश्चित ठेवा- मुलांना तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर ठेवणे कठीण आहे, परंतु त्यांनी फोन किंवा इतर गोष्टी वापरण्यासाठी वेळ निश्चित केला पाहिजे.
फोनमध्ये गेम्स ठेवू नका- मुलांना फोन वापरण्यात जास्त मजा येते कारण त्यांना त्यात नवीन गेम खेळायला मिळतात. मुलांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी फोनमध्ये गेम्स ठेवू नयेत हे महत्त्वाचे आहे.

२) फोनमध्ये ठेवा लॉक- आजकाल प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काही खास फंक्शन्स असतात, जी त्यांना लॉक करता येतात. असे विशेष लॉक दोन प्रकारे कार्य करतात. ते स्वत: ठराविक वेळेनंतर फोन बंद करतात किंवा ते असे असतात की मोठ्यांच्या मदतीशिवाय ते उघडणे शक्य नसते.
तंत्रज्ञानाशी संबंधित काही खेळणी द्या - आजकाल अशी काही खेळणी बाजारात येतात, जी फोनसारखी दिसतात आणि त्याच पद्धतीने काम करतात. फोन देण्याऐवजी मुलांना अशी खेळणी देणे चांगले.

३) नेहमी लक्षात ठेवा - मुलांनी जोपर्यंत फोन वापरला आहे तोपर्यंत त्यांची विशेष देखरेख आणि मार्गदर्शन घ्या जेणेकरून मुले फक्त कामाच्याच गोष्टी पाहतात आणि फोनवर मर्यादित वेळ घालवतात.

४)  प्रेम आणि काळजी - मुलांना त्यांच्या पालकांच्या प्रेमाची आणि काळजीची सर्वात जास्त गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही मुलासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे गरजेचे आहे, यामुळे तुमचे मूल हळूहळू मोबाईल वापरणे बंद करेल.

५) मदत घ्या - मोकळ्या वेळेत, मुलाच्या क्षमतेनुसार, घरातील कामात त्याची मदत घ्या, यामुळे मूल स्वावलंबी होईल आणि काही व्यावहारिक गोष्टी देखील शिकेल. 
६) छंद - छंदानुसार मूल चित्रकला, नृत्य, संगीत आणि इतर वर्गात सहभागी होऊ शकते.
 ७) खेळ -  मुलाला निसर्गाकडे आकर्षित करा आणि मैदानी खेळांसाठी देखील प्रोत्साहित करू शकता.

८) सर्जनशील क्षमता - तुमच्या मुलाला असे काम देत राहा, ज्यामुळे त्याची सर्जनशील क्षमता विकसित होते. 
९) पाळीव प्राणी - मुलाला मोबाईल ऐवजी पाळीव प्राणी द्या, जेणेकरून मुले संवाद साधण्यास आणि भावना व्यक्त करण्यास शिकतील. 
१०) मोबाईल वापर - याशिवाय मुलांसमोर जास्त मोबाईल वापरू नका. खरं तर, जेव्हा मुले पाहतात की बहुतेक वेळा माझे पालक मोबाइलमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा त्यांना वाटते की मोबाइल हे मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे, म्हणून ते देखील मोबाइलमध्ये बघायला लागतात.

ही चूक करू नका

  • अनेकदा असे दिसून येते की पालक आपल्या मुलांना सांगतात की तुम्ही तुमचा गृहपाठ (किंवा इतर काही काम) पटकन करा, तर ते तुम्हाला मोबाइल देतील. यामुळे मुल सर्व लक्ष मोबाईलवर लावते. मोबाईलच्या लोभापायी तो काम पटकन करून घेतो, पण नंतर मोबाईल न मिळाल्यास मुलाच्या मनात पालकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ लागतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळा.
  • मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी मुलाला मारहाण करू नका. मारहाण करून तो मोबाईल सोडणार नाही, उलट त्याच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक गोष्टी घडतील. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोला, त्याच्याशी खेळा आणि मग त्याला मोबाईलचे तोटे समजावून सांगा हेच बरे.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}