• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
बाळ काळजी आरोग्य आणि निरोगीपणा बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक

बाळाने लवकर चालायला सुरुवात करण्याचे ५ फायदे?

Sanghajaya Jadhav
0 ते 1 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Feb 02, 2022

बाळाने लवकर चालायला सुरुवात करण्याचे ५ फायदे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 बहुतांश मुलं त्यांच्या पहिल्या वाढदिवसापासून चालायला लागतात. १५ महिन्यांच्या वयापर्यंत, बहुतेक बाळांना मदतीशिवाय चालणे शक्य होते, जरी त्यांची पावले सहसा दोघी पायाच्याअसमान असतात. गुडघ्यावर चालणारे मुल ढोपरावर सरकणाऱ्या बाळांपेक्षा लवकर चालतात. तुमच्या बाळाने अजून चालायला सुरुवात केली नसेल तर घाबरू नका. काही बाळ १७ किंवा १८ महिन्यांची होईपर्यंत चालत नाहीत.
चालायला शिकणे ही मुलाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी आहे. हे त्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. उभं राहायला शिकल्यानंतर तो आता कोणताही आधार न घेता चालायला सुरुवात करेल आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने धावेल, उडी मारेल. अशा रीतीने तो आपले बालपण मागे टाकून हळू हळू आपण पुढे जात असतो.मुले जेव्हा लवकर चालायला लागतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते तसेच खूप आनंद ही होतो.

मुलांना लवकर चालायला सुरू करण्याचे फायदे जाणून घ्या

१) या बाळांना आत्मविश्वास असण्याची शक्यता जास्त असते - तुमचे बाळ फर्निचरला धरून चालण्याचा प्रयत्न करू लागेल आणि आठ ते दहा महिन्यांच्या दरम्यान उभे राहण्यासाठी स्वतःला योग्य बनवेल. जर तुम्ही त्याला पलंगावर उभे केले तर तो आधारासाठी सोफ्याला धरण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या काही आठवड्यांत, जेव्हा तुमचे बाळ सरळ उभे राहायला शिकेल, तेव्हा तो फर्निचरला धरून चालायला सुरुवात करेल. यानंतर, त्याला कदाचित पुरेसा आत्मविश्वास मिळेल की तो आधार सोडून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. या सर्व गोष्टींवरून मुलाची उत्सुकता दिसून येते की तो गोष्टी जाणून घेण्यासाठी किती जागरूक आहे. 

२) जे बाळ लवकर चालतात ते रुंद आणि मजबूत असतात - तुमच्या बाळाचे स्नायू बळकट होतात कारण तो गुडघ्यावर सरकायला आणि चालायला शिकतो. या हालचालींचा परिणाम मुलांच्या हाडांवर होतो, ज्यामुळे ते उशीरा चालायला सुरुवात करणाऱ्या मुलांपेक्षा जास्त रुंद आणि मजबूत असतात. 

३) या मुलांना स्वतः खेळात जास्त रस असतो - मुले वयाच्या १८ महिन्या नंतर जेव्हा चालणे, धावणे आणि उडी मारणे इत्यादी सुरू करतात, तेव्हा त्यांना खेळांमध्ये अधिक रस वाटतो कारण ते त्यांच्या पायाने गोष्टी मारायला शिकतात , मारण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ फुटबॉल , बॉल ,बॅट ,लंगडी ,आबादाबी. 

४) जसजसे ते मोठे होतात तसतसे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी असते - या लोकांना इतर मुलांपेक्षा ऑस्टिओपोरोसिस किंवा हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी असू शकते. अधिक सक्रिय असण्याने तुमचे स्नायू मजबूत होतात, चालणे, धावणे, उडी मारणे आदी दरम्यान, त्यांच्यावर अधिक दबाव असतो. आपली हाडे आणि नंतर वाढत्या वयानुसार हाडांची ताकदही वाढते.

५) चंचलता कळते - अशी मुलं चंचल आणि चपळ असतात. अस म्हणतात कि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच लवकर चालणाऱ्या मुलां बाबत आपण बोलू शकतो. लवकर चालणे बोलणे झाले कि आपण किंवा कुटूंब निश्चित होते कि आपल्या मुलाची वाढ योग्य दिशेने होते आहे. 

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर बाळ काळजी ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}