किशोराआवस्था मुलं चिडचिडे होण्याची 5 कारणे?

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Jun 28, 2021

मुलं विनाकारण चिडचिड करतात हो!! काय करावं सुचतच नाही, बर समजून सागावं तर तो ऐकायला तयार होत नाही अस प्रत्येक पालकाचा आपल्या वाढत्या मुला विषयी पडलेला प्रश्न असतो. हे अस किशोराअवस्थेत का होत असेल याची काही कारणे जाणून घेऊया.
1. शारिरीक आणि मानसिक बदल (Physical and mental changes) -:
किशोरावस्थेतील मुलांना शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमुळे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. मात्र या आकर्षणाला प्रेम समजून त्यात वाहवत जातात , लैंगिकदृष्ट्या अनैतिक गोष्टी करणे अशा गोष्टी घडतात. यामुळे शैक्षणिकदृष्ट्या लक्ष विचलित होणे, प्रेमभंग वगैरेमुळे नैराश्य येणे, अनैसर्गिक कृत्यांमुळे शारीरिक आजार होणे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याशिवाय किशोरवयीन मुले अधिक साहसी, बेधडक तसेच निर्भय असतात. संकटांना आणि गहन प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. त्याचबरोबर धोक्याचे मोजमाप करून, तो पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास पूर्ण झालेला नसल्याने, यावयात चुका होण्याचे प्रमाणही जास्त असते. यातून सावरायचं कस याच पुरेसं मार्गदर्शन नसल्यामुळे आश्या मुलाची मानसिक हेडसाड होते.
2.स्वताःचे मत मांडण्याकडे कल (Tendency to express one's own opinion)-:
मुलींमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स निर्माण होतात. या हार्मोन्सद्वारे अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिणाम या मुलामुलीत घडवून आणतात. स्वत:ची मते मांडण्यास सुरूवात या वयात मुले आपली स्वतंत्र मते मांडण्यास सुरूवात करतात. आजवर आईवडील, शिक्षक यांच्या विचारांनी वागणाऱ्या मुलांना, आपल्यालाही काही कळते असे वाटू लागते. मोठ्यांनी सांगितलेले खरे असतेच असे नाही, हे त्यांना समजते आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळते, अशा भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच बाबतीत आईवडील-ज्येष्ठ किंवा शिक्षकांपेक्षा मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याकडे कल वाढतो. स्वताच्या विचारांनी वागण्याची ,चालण्याची इच्छा बळावते यात बदल झाल्यास आपसूक चिडचिडेपणा वाढतो.
3. विनाकारण चिंतातूर असतात(worries for no reason)-:
काही गोष्टी न कळल्यामुळे , आवश्यकते पेक्षा जास्त विचार , सतत या मुलांना कसली ना कसली काळजी वाटत राहते. परत व्यक्त कुठे व्हाव नेमकं कुणाजवळ,ते समजून घेतील ना,ते दुसर्याना सांगणार तर नाही ना या सर्व कारणांनी त्याच्या चेहर्यावर चिंता दिसत असते.
4. सततच मुल्यांकन (there boundaries have been evaluated)-:
त्याच्या सर्व हालचाली वर लक्ष ठेवलं जातंय त्याच मुल्यांकन किंवा मोजमाप करून त्याना सूचना दिल्या जाताय अस पोगंडावस्थेतील मुलांना वाटतं असतं जो तो आपल्याला प्रशिक्षिण देत आहे त्याच ऐकायला तयार कोणी ही नाही यामुळे ते अधिक चिडचिडेपणा करायला लागतात.
5. अतिउत्साही भावना (feeling overstimulated)-:
या वयात मुलं अतिउत्साही असतात काय करू आणि काय नाही अस होतं. यात मुला मध्ये धडाडीनं काम करण्याची वृत्ती तसेच मुली मध्ये सतत नटन-सजन आरशा समोर उभे राहन हे आपसुक आल.मुलांना मुलींचे व मुलींना मुलांचे आकर्षण वाटू लागून त्यांची मैत्री होऊ शकते. म्हणून याच वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन व जरूर ते लैंगिक शिक्षण देणे इष्ट असते. ही भावना जपली गेली नाही तर त्याचा चिडचिडेपणा वाढत जातो.
ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}