अॅक्युप्रेशर,रंग,चुंबक 3 उपचार पध्दती: 3 आवश्यक फायदे

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Jul 05, 2021

आरोग्यासाठी कशी फायदेशीर होऊ शकतात अॅक्युप्रेशर थेरपी(Acupressure therapy) रंग थेअरपी(Color Therapy) चुंबक चिकित्सा (Magnet therapy) ते या लेखातून जाणू तसेच त्या कश्या पद्दतीने वापरल्या जातात याची माहित घेऊ या
अॅक्युप्रेशर थेरपी(Acupressure therapy)
शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर दबाव ठेवून कार्य केले जाते या पध्दतीस अॅक्युप्रेशर थेरपी असे म्हणतात. हे एक वैकल्पिक औषध तंत्र आहे जे बहुतेक वेळा अॅक्यूपंक्चरच्या रूपात वापरले जाते. अॅक्यूपंक्चर पॉईंट्स किंवा ट्रिगर पॉइंट्सवर शारीरिक दबाव लागू केला जातो. एक्यूप्रेशर सुई सोडण्यासाठी शरीरावर विशिष्ट बिंदूंवर दबाव ठेवून कार्य करते. प्रेशरच्या वापरास शरीरावरती योग्य पाॅईन्ट व अचूकपणा आवश्यक. अंगदुखी, नस वर नस चढणे,मळमळ किंवा उलट्या, पाठदुखी, तणाव डोकेदुखी, पोटदुखी इत्यादी व्याधी वर अॅक्युप्रेशर प्रभावी ठरू शकते, एक्यूप्रेशरच्या प्रभावीतेसाठी कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत पण बर्याच जनांना याचा लाभ होतो.शरीरातील तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आणि काहींना क्षणातच विश्रांती मिळते.त्याऐवजी दोन्ही पायांच्या अंगठ्यावरील भागावर प्रेशर दिल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
एक्युप्रेशर मध्ये आजारांवर उपचार करण्यासाठी हात पायांवर विशिष्ट बिंदू वर लक्ष केंद्रित केले जाते. विशिष्ट भागावर दाब दिला जातो समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या थेरपीची उत्तम क्षमता आहे.
रंग थेअरपी(Color Therapy)
रंग उपचार पध्दतीत कोणते रंग रूग्णाला प्रभावित करतात परिणाम काय होतो त्यानुसार विशिष्ट क्रिस्टल द्वारे किरणे किंवा प्रकाश ते शरीरावर कसे परिणाम साधतात हे बघू शकतो . ही मन शांती देणारी उपचार पध्दती आहे, रंग थेरेपीमुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही नियंत्रीत राहते, मानसिक विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगोपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. आरोग्य सुख राखण्यास मदत होते. रंग-थेअरपीमध्ये रंगांचे व्हायब्रेशनमुळे बदलणारे मूडला सुरळीत ठेवण्यास उपयोग होतो याचा आपल्या आरोग्यावर चागंला परिणाम करतात. या थेअरपीचा उपयोग तणाव मुक्त होण्यासाठी देखिल होतो.
भारतातील आरोग्य शास्त्रात शरीरातील चक्रास अन्यन्य साधारण महत्व आहे याला आध्यात्मिक शक्ती आणि उर्जेच्या निर्मितीचे केंद्र मानतात. संप्त रंगांचं वर्णन हे आगळे वेगळे ते सात चक्रांचे प्रतिनिधी म्हणून करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे वेगळे अस्तित्व दिसते.पांढरा रंग पवित्रता देतो,निळा समाधान, लाल रंग भौतिक शक्ती जागृत करतो. नारंगी रंग उदासीनता दूर करतो, हिरवा रंग तटस्थ रंग आहे.
चुंबक चिकित्सा (Magnet therapy)
शक्तिशाली चुंबक शरीराच्या आजूबाजूला ठेवून करावयाची उपचारपद्धती आहे.
भारतीय संस्कृतीत माेठ्या माणसांच्या पायांना हात लावून नमस्कार करण्याची व माेठ्यांनी लहानांना डाेक्यावर, पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. यात चैतन्यशक्तीचे, चुंबकीय शक्तीचे हस्तांतरण हाेत असावं म्हणून ही पध्दती परंपरागत विकसित झाली असावी. अखंड ब्रम्हांड हे उपग्रह, तारे, चंद्र, सूर्य यांच्यातून चुंबकीय शक्ती प्रसारित हाेते व तिचा मानवी शरीर व प्राणिमात्रांवर परिणाम हाेताे. आसपासच्या परिसरात देखील आपणास निसर्गातील चुंबकीय शक्तीचे प्रतीक दिसते जसे दर पोर्णिमा अमावस्याला समुद्रात ओहोटी किंवा चक्रिवादळ दिसते तसेच शारीरीक त्रास काही व्यक्तीत आढळून येतो सर्व शारीरिक हालचाली, भावनात्मक, शारिरीक व्याधीत, आनंद, राग, द्वेश, कष्ट, जाणीवा, लाैकिक-अलाैकिक शक्ती यांना प्रभावित करीत असावी अस वाटतं. आयुर्वेदातील बरीचशी अाैषधे विशिष्ठ तारखा लक्षात घेऊन तयार केली जातात. भारतीय संस्कृतीचा हेतुच मुळात आजार होऊच नये यासाठी पहिल्यांदा उपाय योजने हा आहे सर्व प्राणीमात्रांचे जीवन आराेग्यसंपन्न व सुखसमृद्धीसंपन्न नटलेल असावं.
फायदे (benefits)
वेदना विरहीत उपचार पध्दती (No pain)
कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत(No side effect)
कसलं ही औषधं घेण्याची गरज नाही (No drug's)
ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.
वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग
वर आरोग्य आणि निरोगीपणा चर्चा
वर आरोग्य आणि निरोगीपणा प्रश्न

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}