आखाजी (अक्षय तृतीया) खान्देश सण!

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित May 02, 2022

खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच गाळगं ठेऊण त्यावरती उन्हाळ्यातील मिळणारी किंवा उपलब्ध फळ खरबुज/टरबूज आणि दोन सांजोर्या(करंज्या), दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं हे पितरांसाठी ठेवलेलं असत. आधी त्यांना पाण्याचा एक घट अर्पण करून मग नविन माठ वापरण्यात येतो. यामुळे पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण पुजा विधी करून पुर्वजांचं स्मरण केले जाते कुंकवाचं एकेक बोट उंबऱ्याला उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं.पुर्वी दुपारी चुलीवर सध्या गॅसवरच 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. या दिवसा पासुन आंबे खायला सुरूवात करावी अशी प्रथा रूढ आहे. ठिकठिकाणी,गल्लीबोळात, रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.
- सासुरवाशिणी साठी हा सण एक पर्वणी असते कारण खान्देशात सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी
- सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी.
- या सणाच्या निमित्ताने तिला निवांत माहेरी राहता येते तिच्या साठी खास दारात झाडाला झोका बांधला जातो जो तिच्या आनंदी भावभावनाला उंच उंच घेऊन जातो.
अक्षय्य तृतीयेची माहिती
यंदा अक्षय तृतीया ३ मे रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. व्यापारी असो वा शेतकरी असो वा सामान्य जन सगळ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्या नातलगांना ,प्रियजनांना , एकमेकांना अक्षय तृतीया शुभेच्छा आपसुक देतात.अक्षय तृतीया हा सण घराघरात साजरा केला जाणारा सर्वांच्या आवडीचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी जे शुभ कार्य केलं जातं त्याचं फळ हे अक्षय मिळतं असे समजले जाते. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होणार नाही असे. या प्रथे मुळे हा दिवस हिंदू धर्मात शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेची माहिती आपल्याला असलीच पाहिजे.
१. ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय चा जन्मही याच दिवशी झाला होता, असे मानले जाते. म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हणतात. याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते.
२. नर-नारायण, श्री परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून वैशाख तृतीया ही लोकांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला रेणुकेच्या पोटी भगवान विष्णूचा जन्म परशुरामाच्या रूपात झाला अशी आणखी एक मान्यता आहे.
३. अक्षय्य तृतीया हा विष्णूचा सहावा अवतार परशुरामाचा जन्मदिवस म्हणून हिंदू मानतात. ते वैष्णव मंदिरात पूजनीय आहेत. जे परशुरामाच्या सन्मानार्थ ते पाळतात ते कधीकधी परशुराम जयंती म्हणून या सणाला संबोधतात.
अक्षय म्हणजे काय?
संस्कृतमध्ये, अक्षय (अक्षय) या शब्दाचा अर्थ "समृद्धी, आशा, आनंद, यश" या अर्थाने "कधीही कमी होत नाही" आसा घेतला जातो, तर तृतीया म्हणजे "चंद्राचा तिसरा टप्पा" असा होतो. हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख महिन्याच्या तिसर्या चंद्र दिवसावरून हे नाव देण्यात आले आहे, जेव्हा तो साजरा केला जातो.
शुभ संकेत
शुभ -अशुभ मानणाऱ्या लोकांसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. धनधान्य, तांदूळ खरेदी करणे, नवनवीन वस्तु खरेदी, बँक खात्यात पैसे जमा करणे, प्रसिद्ध मंदिरात जाऊन भेटवस्तु दान करणे असो किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तू किंवा भांडी खरेदी करणे, गरीब लोकांसाठी अन्न किंवा विशेष प्रसाद दान करणे किंवा गरीब मुलांना शिक्षण शुल्कासह मदत करणे, हे सर्व अक्षय आहेत या सर्वासाठी शुभ संकेत असते हि अक्षय तृतीया.
जैन धर्म
जैन धर्मात, अक्षय्य तृतीयेला पहिल्या तीर्थंकराचे (भगवान ऋषभदेव) स्मरण होते, त्यांची एक वर्षाची तपश्चर्या संपवण्यासाठी त्याच्या कपात उसाचा रस टाकला जातो. काही जैन या सणाला वर्षा तप म्हणतात. उपवास आणि तपस्वी तपश्चर्या जैनांनी विशेषतः पालिताना (गुजरात) सारख्या तीर्थक्षेत्रांवर केली आहे.
या दिवशी जे वर्षभर पर्यायी दिवसभर उपवास करतात, ज्याला वर्षा-तप म्हणतात, पारण (उसाचा रस पिऊन) तपश्चर्या संपवतात.
मान्यते नुसार या दिवशी काय करू नये?
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर रिकाम्या हाताने घरी परतणे शुभ मानले जात नाही. शक्य असल्यास, चांदी किंवा सोन्याचे काहीतरी घेऊन घरी या. दुसरीकडे, जर महागडे दागिने खरेदी करणे शक्य नसेल, तर तुम्ही धातूपासून बनवलेली छोटी वस्तूही घरी आणू शकता.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. या दिवशी दोन्हीची स्वतंत्रपणे पूजा केल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात. असे मानले जाते की लक्ष्मीसह विष्णूची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा शांत चित्ताने करावी, कारण शांततेने पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. याउलट, जी व्यक्ती पूजेच्या वेळी गडबड करते किंवा राग आणते, त्याला माता लक्ष्मीचा राग येतो.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.