• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गरोदरपणात केशर खाण्याचे फायदे

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 27, 2022

गरोदरपणात केशर खाण्याचे फायदे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

केशर सुगंधी असून ते अतिशय सुंदर दिसते हे आपणा सर्वांना माहीत आहे. 'किंग ऑफ स्पाइसेस' म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकप्रिय मसाल्यांपैकी हे  एक आहे. हे जगाच्या अनेक भागांमध्ये पिकवले जाते परंतु फारच कमी प्रमाणात, म्हणूनच कदाचित ते इतके महाग आहे.
या सुगंधी मसाल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.दमा, खोकला, डांग्या खोकला, पोट फुगणे, नैराश्य, जळजळ, वेदना आणि कर्करोगाच्या उपचारात याचा उपयोग होतो. केशर मासिक पाळीत पोटदुःखी आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्व आणि पुरुषांमधील वंध्यत्वावर उपचार करू शकते. आपण याचा वापर स्वादिष्ट आणि सुंदर पदार्थ बनवण्यासाठी देखील करतो.

हे अनेक आरोग्य फायद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हे विशेषतः गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गर्भधारणेदरम्यान अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.

गर्भवती महिलांसाठी केशरचे काही प्रमुख उपयोग 
 

  • रक्तदाब नियंत्रित करते

 आपण गर्भवती महिलेचा बदललेला मूड आणि असंतुलित रक्तदाब अनुभवतो. गर्भधारणेदरम्यान रक्तदाबात अनियमित वाढ होते ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब होतो. केशर रक्तदाब संतुलित ठेवते.

  • पचन सुधारणे

 गरोदर महिलांना अनेकदा गॅसमुळे अपचनाचा त्रास होतो.केशरमध्ये एक पडदा तयार करण्याची क्षमता असते जी अपचनास कारणीभूत गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऍसिडिटीपासून संरक्षण करण्यास मदत करते.

  • स्नायू शिथिल करणारे

 गर्भवती महिलांना स्नायू मध्ये क्रॅम्प होण्याची शक्यता असते. ज्यामध्ये हाडांचे स्नायू किंवा मऊ स्नायू सहभागी होऊ शकतात. जेव्हा स्नायू अधिक लवचिक असने गरजेचे असते तेव्हा प्रसूतीदरम्यान ही समस्या चिंताजनक असू शकते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांनंतर केशरचे नियमित सेवन करा कारण स्नायूंना आराम देण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

  • अशक्तपणा प्रतिबंधित करते

 केशरमध्ये लोह असल्याने ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते आणि अँनिमियापासून बचाव करते. केशरमध्ये आढळणारे लोह रक्त शुद्ध करण्यात आणि अशक्तपणाच्या आजारांवर उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

  • सकाळच्या(मोर्निंग सिक्नेस)आजारावर उपचार

 सकाळी थकवा येणे ही गर्भवती महिलांची एक सामान्य तक्रार आहे, जसे की चक्कर येणे आणि मळमळ. हे रात्रभर शरीरातील चयापचय क्रिया वाढल्यामुळे होते, ज्यामुळे त्यांची गर्भधारणा वाढत राहते. रोज सकाळी दुधासोबत केशर सेवन केल्याने मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळतो.

केशर खाताना घ्यावयाची खबरदारी 

 १) गर्भवती महिलांनी केशर २-४ दाण्यांपेक्षा जास्त वापरू किंवा देऊ नये.

 २) जास्त प्रमाणात सेवन केल्याने उलट्या, संवेदनशीलता किंवा गर्भपात होऊ शकतो.

 ३) केशर शरीरातील उष्णता वाढवते. 

 ४) त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने नाकातून किंवा पापण्यांमधून रक्त येणे, चक्कर येणे,मूत्र किंवा मल मध्ये असंतुलन आणि रक्त येण्यासारख्या समस्या असू शकतात, ज्याचा गर्भवती महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

 ५) त्यामुळे याचे सेवन मात्र प्रमाणात करावे तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}