• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक शिक्षण आणि शिक्षण

भारतरत्न लता मंगेशकर याची प्रेरणादायी गोष्ट

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Feb 07, 2022

भारतरत्न लता मंगेशकर याची प्रेरणादायी गोष्ट
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

"गान कोकिळा , गान स्वरागिनी , सुर  सम्राज्ञी " कस आणि किती नावाने पुकारा करायचा तरी कुठेतरी कमी वाटते असं आहे "लता मंगेशकर" नावातच जादू अगदीच मंतरलेली स्वरांची पहाट. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायिका म्हणून त्या  मोठ्या प्रमाणावर नेहमी गणल्या गेल्या. भारतीय संगीत क्षेत्रात सात दशकांच्या कारकिर्दीतील त्याच्या योगदानामुळे त्यांना 
नाइटिंगेल ऑफ इंडिया, व्हॉईस ऑफ द मिलेनियम आणि क्वीन ऑफ मेलोडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी छत्तीस पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली, प्रामुख्याने त्यांनी हिंदी, बंगाली आणि मराठीमध्ये गाणी म्हटली होती. त्यांना  संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८९ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००१ मध्ये, राष्ट्रासाठी त्यांना  योगदानाबद्दल भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला; एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यानंतर हा सन्मान मिळविणारी त्या दुसऱ्या  महिला गायिका आहे. २००७ मध्ये फ्रान्सने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार, ऑफिसर ऑफ नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनरने बहाल केले.

 लतादीदीचे बालपण

 लता मंगेशकर यांचा जन्म 1929 साली इंदूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  लतादीदी चे बारशातले नाव हृदया होते. लता ह्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य.

  • बालपणी लतादीदी सर्वच बालका प्रमाणे मस्तीखोर , खट्याळ आणि चिकीत्सक वृत्तीच्या होत्या.
  • त्यांना प्रत्येक गोष्ट जाणुन घ्यायला आवडत असे. त्याचा  ब्राम्हण परिवारात जन्म झाल्या मुळे त्याचे खानपान शुध्द शाकाहारी होते,पण त्यांना जाणुन घ्यायचं होते कि आपण का मासाहार करत नाही ? तेव्हा त्याच्या आजीनी यातील फरक ,फायदेनुकसान लहानग्या लताला सांगितले. 
  • लहानपणा पासून एकमेकांसोबत मिळूनमिसळून वागण्याची सवय अंगवळणी पडली कारण लहान भावंडाची फॊज त्याच्या सोबतच राहायची. लतादीदी घरात सर्व भावंडांमध्ये मोट्या असल्यामुळे इतरांच्या चुकीची शिक्षा सुध्दा लतादीदीला मिळायची. त्याच्यात  जिद्द आणि चिकाटी होती एखादी गोष्ट ठरवली कि त्या करूनच दाखवायची हा गुण त्याच्यात बालपणीच होते. 

 "जबाबदारीची जाणीव कर्तव्य करायला आपोआप शिकवतात" लता दीदी ला लहानपणीच याची जाणीव झालेली असावी कारण आपल्या पेक्षा ४ लहान भावंडाची जबाबदारी त्याच्या वर पडली होती कारण घरची परिस्थिती फारच बेताची होती.


 लतादीदीचे वडील दीनानाथ मंगेशकर- उत्तम थेटर कलाकार होते म्हणून कानावर नाटक , तालीम याच्या कसरती बघायला मिळायच्या त्यामुळे लहान असतानाच लतादीदीला घरातच संगीताचे छोटेखानी धडे मिळायला लागले आणि त्याही आवडीने त्या शिकायला लागल्या.वडिलांकडून संगीताचे पहिले धडे मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी  वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये (मराठी संगीत नाटक) अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. तिच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्या घरी निघून गेल्या कारण लता दीदीला बहीण आशा सोबत शाळेत आणू देत नव्हते. पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. 

लता दीदींची गोष्ट, तुमच्या मुलासाठी प्रेरणा

  • १९४२ मध्ये, लता मंगेशकर १३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले.नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि मंगेशकर कुटुंबाचे जवळचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांची काळजी घेतली. त्यानी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू करण्यास मदत केली. पण यात लतादीदींला विशेष रस नव्हता कारण त्यांना चेहऱ्याला रंगरंगोटी केलेली आवडत नव्हती. तरी पारिवारिक जबाबदारी साठी त्या तयार झाल्या. 

 

  • वसंत जोगळेकर यांच्या किती हसाल (१९४२) या मराठी चित्रपटासाठी सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेले "नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी" हे गाणे गायले, परंतु हे गाणे अंतिम टप्प्यातून वगळण्यात आले. विनायकने नवयुग चित्रपतच्या पहिली मंगला-गौर (१९४२) या मराठी चित्रपटात छोटी भूमिका दिली, ज्यामध्ये  "नटली चैत्राची नवलाई" हे गाणे गायले होते जे दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केले होते.गजाभाऊ (१९४३) या मराठी चित्रपटासाठी "माता एक सपूत की दुनिया बदल दे तू" हे त्याचे पहिले हिंदी गाणे होते.

एवढे मानसम्मान मिळूनही लतादीदी मध्ये जराही अहं नव्हता त्या नेहमी साधी राहणीमान उच्च विचार या प्रमाणे जगल्या.लता मंगेशकर यांनी संगीताला आपली आध्यात्मिक साधना मानली आणि गाताना त्यांनी चप्पल किंवा बूट घातले नाहीत. त्याची ठरलेली दोन वेणी घालण्याची प्रथा त्यांनी सोडली नाही. मुखावर नेहमी स्मितहास्य , आवाजात नम्रपणा साक्षात सरस्वती समोर बसावी अशी वागणूक ... लता दीदींना आमची श्रद्धांजली लता मंगेशकर (१९२९ - २०२२)

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}