• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

गरोदरपणानंतर रक्तवाहिन्यांमध्ये येणारे ब्लॉकेज: कारणे आणि उपाय

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 28, 2021

गरोदरपणानंतर रक्तवाहिन्यांमध्ये येणारे ब्लॉकेज कारणे आणि उपाय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

गरोदरपणात वजन वाढल्याने किवा डाॅक्टरानी सक्तीचा आराम करायला लावल्यास रक्तभिसरण प्रक्रिया मंदावते यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते.बहुतेक स्त्रियांना हा आजार गर्भधारणेनंतरच होतो. संशोधनानुसार रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज हे सर्वात घातक आहे त्यामुळे हृदयास रक्त पुरवठा योग्य दिशेने होत नाही आहे याचे परिणाम गंभीर स्वरूपात होऊ शकतात. कोणालाही रक्तवाहिनीत अडथळा होऊ शकतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळा आणि ज्या ठिकाणी मज्जातंतू अडकतात त्या ठिकाणी खूप वेदना होत असतात आणि तो भाग काळा निळा होतो.ही समस्या स्त्रियांमध्ये खूप आढळते. 

रक्तवाहिन्यांमध्ये ब्लाॅकेजची कारणे काय असु शकतात -:

 • रक्ता भिसरण न होणे हे रक्तवाहिनीचे ब्लॉक होण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.
 • रक्ताचा क्षय झाल्यामुळे रक्त योग्यप्रकारे प्रवाह धरत नाही आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.
 • जखम किंवा काही दुखापत झाल्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात.
 • शरीरात अशुद्ध रक्त संचय देखील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येण्याचे प्रमुख कारणे मध्ये आहे.
 • जे लोक अधिक तेलकट,तुपकट खाद्यपदार्थावर ताव मारतात त्यांना या समस्येस सामोरे जावे लागू शकते.
 • बैठे काम आणि शारीरिक हालचाली कमी असणार्याना ब्लॉकेजची समस्या उदभवू शकते.
 • ज्या लोकांचे वजन अतिरिक्त प्रमाणात आहे त्याच्यात रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका अधिक असतो.
 • शरीरात प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे सुध्दा बऱ्याच लोकांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.

हि लक्षणे दिसतात-:

 1. रक्तवाहिनी ठळक दिसतात किंवा फुगलेल्या स्वरूपात दिसतात.
 2. रक्तवाहिन्या काळ्या निळ्या स्वरूपात दिसतात.
 3. ज्या भागात रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्या भागामध्ये जाडपणा जाणवतो.
 4. मांसपेशी दुखणे.पायामध्ये सूज येते, चालताना वेदना होतात.
 5. नसाभोवती खाज सुटते.
 6. रक्तवाहिन्या मधील गाठी , गुथंडी टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. 

उपाय-:

 • चांगली जीवनशैलीचे अंगीकारा. 
 • जे लोक कसरत करत नाहीत. त्यांचे रक्त क्षय होण्यास सुरवात होते. रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीरावर सूज येणे व अंग दुखणे या सारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून दररोज व्यायाम , चालणे,फिरणे करा.
 • व्यायामामुळे शरीरात रक्ताचे भिसरण योग्य प्रकारे होते.
 • तेलाने मालिश केल्यास ही बराच फायदा होतो.
 • वजन नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • योग्य आहार,विहार आणि प्रतिकारशक्ती वाढवा.

या रोगावर या उपायानी सहज मात करू शकतो.ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}