• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

बडीशेफ एक उपयुक्त औषधी: जानूया 10 फायदे

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 07, 2021

बडीशेफ एक उपयुक्त औषधी जानूया 10 फायदे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 

घराघरात आवडणारा सहज मिळणारा एक निरोगी सुंदर आवडणारा मुखवास बडीशेप (Fennel Seeds). प्रेत्यकाच्या घराघरात अगदी हाताला लागेल असा काचेच्या, रंगीबेरंगी डब्यात ठेवलेली बडीशेप. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते.तुम्हाला हे ठाऊक आहे का की, बडीशेप किंवा सौंफमध्ये असे अनेक गुण आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर आहेत.फक्त तोंडाचा दुर्गंध जाण्यासाठी याचा वापर होत नसून बडीशोप खाण्याचे अनेकानेक फायदे आहेत.

अनेकाअनेक फायदे जाणूया(Health Benefits Of Saunf )

1.ज्याना बद्धकोष्ठता सतत होते ही तक्रार बडीशेप दूर करते, गुलकंद आणि बडीशेप याना एकत्र करून दूधातून प्यावं.

2. खोकला लागल्यास बडीशोप उपयुक्त आहे जर तुम्ही बडीशेप खाल्ली तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. खोकल्यावर बडीशेप भाजुन ओव्या सोबत घ्यावी दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.

3.बडीशेप खाल्ल्याने पीरियड म्हणजे मासिक पाळीसुद्धा नियमित राहते. जर तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसतील तर बडीशोप आणि गुळ खा. तसंच रोज बडीशेप खाल्ल्याने तुमच्या गर्भाशय निरोगी राहण्यास मदत होईल.

4. सौदर्य वाढवण्यास बडीशेप खूपच परिणामकारक आहे.  जर तुम्ही हर रोज बडीशोेप चावून खाल्ली तर याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुमची त्वचा तुकतुकीत व्हायला मदत होते.

5.बडीशेप आणि खडीसाखर रोज खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.

6. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी चं प्रमाण भरपूर असतं.

7. यामध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. 

8. शरीर निरोगी राहण्यासाठी बडीशेपेचं सेवन आवश्यक आहे.

9. पोटात दुखत असल्यास बडीशेप खाल्ल्यास फरक पडतो. हे ही ध्यानांत घ्या की ही बडीशोप भाजलेली असावी. अशा प्रकारची बडीशेप खाल्ल्यास पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो.

10. जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल. 

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}