• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
बाळ काळजी आरोग्य आणि निरोगीपणा बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक विशेष गरजा

लहानग्यांना उष्माघात (सन स्ट्रोक) कारणे ,लक्षणे, प्रथमोपचार

Sanghajaya Jadhav
0 ते 1 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 10, 2022

लहानग्यांना उष्माघात सन स्ट्रोक कारणे लक्षणे प्रथमोपचार
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

उन्हाचा लहानग्यांना सर्वात जास्त त्रास होतो. त्यांना धड सांगता येत नाही तर बोलता येत. ते रडुन गांगून आपली वेथा मांडतात. आजकाल तर उन्हाचा पाऱ्याने लहानगेच काय थोर मोठे ही हैराण झाले आहेत उन्हाची लाहीलाही इतकी वाढत चाललीय की उन्हात बाहेर जाणे एक अग्निदिव्य म्हणावं लागेल अस वाटतं रस्त्याला आग लागेल इतकी सुर्य देवता आग ओकतोय आणि मुलांना शाळेला सुटट्या लागल्या मुळे त्यांना घराबाहेर पडल्या शिवाय होत नाही मुलांना एकदा तरी उन्हाचा सामना (हीट एक्झॉशन)) करावा लागतोय घरातही उन्हाच्या झळा (हीट स्ट्रोक) लागून त्रास होतोच. 

कारणे 

 •  बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते यामुळे शारीरिक क्षमते वर परिणाम होतो प्रतिकार शक्ती कमी होऊन विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात जसे उष्माघात (हीट स्ट्रोक) 

 

 •  प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (१०४ डिग्री पेक्षा जास्त) उष्माघात सनस्ट्रोक ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णता संतूलन संस्था संतूलन गमावते. अती शारीरिक श्रम , वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये काम करणे किंवा अति व्यायाम करणे आणि पाणी, क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने ही परिस्थिति उद्भवते.  जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात.

 

 •  खेळाडूना आणि बराच वेळ आउटडोअर काम करणाऱ्यांना उष्मापात होऊ शकतो. उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो. 

 लक्षणे

 • चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी आहेत. 
 • घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते. 
 • रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी (क्रांप्स) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते. 
 • बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो.

प्रथमोपचार

 • लहानग्याच्या शरीरातली वाढलेली उष्णता सर्वप्रथम कमी करणे व रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करणे हाच प्रथमोपचार आहे. त्याला सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते.
 • शरीराला ओल्या कापडाने पुसून काढावे. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक देण्यास सुरुवात करावी. कारण या जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.
 • मूल किंवा व्यक्ती उन्हामुळे बेशुध्द झाली असेल तर त्याच्या तोंडावर थोडे पाणी शिंपावे श्वसनक्रियेची तपासणी करावी. नाकातून रक्तस्रव सुरू झाला असेल तर नाकाच्या मांसल भागावर दहा मिनिटे प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्रव थांबतो. व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास आरामदायी थंड ठिकाणी ठेवावे. 

 काळजी

 उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर मुलांना बाहेर काढणे टाळा उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. 
बाहेर जाणे आवश्यक असल्यास  सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टोपी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधवा, छत्रीचा वापर करावा. जवळ पाण्याची बाटली,चॉकोलेट ठेवावी. पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे 
तसेच लहानग्यांना नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, लिंबूपाणी, तसेच ओआरएस भुकटी पाण्यात टाकून घेत राहावी. साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊ नयेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते. तसंच बाहेरील थंड पेय घेणं टाळावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा.

१. कैरीचं पन्न 
कैरीचं पन्न बलवर्धक शक्तिदायक आणि सर्वांचे आवडीचे अतिशय गुणकारी लहान मुलांना कैरी तसेच कैरीच्या पन्ह्याची चव जास्तचं आवडते. 

२. कांदा  
कांदा शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया वाढवतो शीतलता प्रदान करतो तसेच शक्ती वर्धक आहे. 

३. टरबूज
टरबूज मध्ये मुबलक प्रमाणात पाण्याची मात्रा असते. लहान मुलांमधील पाण्याची कमतरता टरबूजभरून काढतो म्हणुन  डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मुलांना दरराेज टरबूज खायला द्या.

४. दही
 लहान मुलांच्या आहारातलं दह्याचं प्रमाण उन्हाळ्यात वाढवावं. दही साखर, दही भात किंवा आवडत असेल तर ताक अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना दही अवश्य खाऊ घाला. 

५. लिंबू पाणी
 लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. जी मुलं शाळेत जातात. त्यांना लिंबू पाणी असलेली एक बॉटल मुलांना खेळताना दिली तरी चालेल. 

६. गुळाचा खडा 
 गुळाचा खडा देखील शरीराला थंडावा देतो. त्यामुळे मुलांना उन्हाळ्यात दिवसातून एकदा गुळाचा खडा तुकडा अवश्य चघळायला द्या. पाचनशक्ती सुधारते. शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर बाळ काळजी ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}