बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू : साहित्य आणि फायदे

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Feb 17, 2022

आई आणि मूल दोघे सुदृढ असायला हवे त्यासाठी परंपरागत गोष्टी सांगितल्या आहेत त्या पैकी डिंकाचे लाडू खाणं चांगलं असं आवर्जून सांगितलं जात. मुलाच्या जन्मानंतर बाळंतीनीस तिच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी अनेक विविध अंगी शक्तीच्या गोष्टी दिल्या जातात. डिंकाचे लाडू देखील त्यापैकी एक आहे, जे आईच्या शरीरातील हाडे मजबूत करतात. प्रसूतीनंतर ताकद येण्यासाठी बनवलेल्या या लाडूंची पद्धत काय आहे, जाणून घेऊया.
डिंकाचे लाडू बनवण्याचे साहित्य
२०० ग्रॅम डिंक
१ कप गहू
२ कप साखर
आर्धी वाटी खसखस
१ वाटी देशी तूप
अर्धा कप खारीक
१ टीस्पून खरबूज बिया
५० ग्रॅम बदाम
१ वाटी सुके खोबरे
५-१० लहान वेलची
डिंकाचे लाडू रेसिपी
प्रथम डिंक बारीक फोडून घ्या.डिंक जाडसर कुटावा. आता कढईत तूप गरम करून त्यात डिंक तळून घ्या. डिंक चांगला फुगायला लागला की भाजला आहे असे समजून घ्या. आता एका भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा.खोबरे किसून, भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. खसकस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. आता पीठ हलके सोनेरी होईस्तोवर तुपात तळून घ्या आणि नंतर बाहेर काढून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून साखरेचा पाक बनवा. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी. नंतर साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक करून, त्यात अर्धी वाटी तूप घालावे. या सिरपमध्ये भाजलेला डिंक, गहू आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करा. मिश्रण थंड झाल्यावर लाडूचा आकार द्या. हे लाडू गरमच वळावे लागतात. हे लाडू उपवासालाही चालतात.तसेच बनवलेल्या या लाडूंमध्ये सुंठही वापरता येते.
डिंकाच्या लाडूचे फायदे
- बाळाच्या जन्मानंतर महिलांच्या मणक्यामध्ये,पाठीत तीव्र वेदना होतात, त्याचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
- प्रसूतीनंतर शरीरात अंगदुखी होते. याच्या सेवनाने सांधेदुखीत आराम मिळतो.
- या पौष्टिकतेने भरलेल्या आहाराचा फायदा स्तनपानाच्या माध्यमातून बाळापर्यंतही पोहोचतो.
- या लाडूंच्या सेवनाने स्तनांमध्ये दूध वाढते. हे लाडू तुम्हाला डिलिव्हरीनंतरची कमजोरी लवकर बरे करण्यास मदत करतात.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.