• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

दिसत असतील आकस्मिक गर्भधारणेचे लक्षण, तर ठेवा मनात शांती आणि समाधान

Satish Samarth
गर्भधारणा

Satish Samarth च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Dec 03, 2021

दिसत असतील आकस्मिक गर्भधारणेचे लक्षण तर ठेवा मनात शांती आणि समाधान
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ', ही म्हण आता जुनाट झाली आहे. तारुण्यातील पिढीला हीच म्हण नव्या पद्धतीने लिहिली तर 'भावनेपेक्षा करिअर श्रेष्ठ' तंतोतंत लागू पडते. नवीन पिढीला करिअरचे इतके कौतुक असते की, लग्नसुद्धा करावे की नाही, हा ही त्यांना पडलेला यक्षप्रश्न असतो. घरच्यांचा आग्रह ते टाळत नाहीत आणि मग जबाबदारी, करिअर, तारुण्यसुलभ कामेच्छा, गर्भधारणा टाळण्यासाठी केलेला आटापिटा यात तो- ती अक्षरशः भरडून निघतात. 

Planned प्रेगनेन्सी

ही एक व्यवस्थापकीय पद्धत ते लग्नात, मूल जन्माला घालण्याबाबत आणू पाहताहेत, ज्यामध्ये आपल्या अपत्याच्या भविष्याचा व आपल्या स्वत:च्या करिअरच्या किमान गरजा भागल्या की, अपत्य नावाचा सोहळा रंगवायचा त्यांचा विचार असतो. हा विचार नवा आहे; त्यात काही तथ्य असले आणि ते बहुतांशी यशस्वी झालेली अनेक जोडपी असली, तरी अपयशाचे प्रमाणही थोडे-थोडके नक्कीच नाही. यात अनपेक्षित गर्भधारणा मात्र सर्व दिशाच पालटून टाकते. 

आजकाल महिला करिअरच्या प्रेमामुळेच आणि गर्भनिरोधक साधनांमुळे लहानग्यांच्या आगमनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण, प्रकृती आपली कामगिरी चोख बजावतेच; आणि अनपेक्षित गर्भधारणा अंगलट येते. मग, काहीही तयारी, विचार नसताना या उद्भवलेल्या प्रसंगाला सामोरे कसे जावायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. 

प्रसंगाला स्वीकारणे

जर तुम्हाला अचानक कळले की, तुमची पाळी चुकली आहे आणि शंका येताच तुम्ही प्राथमिक तपासणी करता, तेव्हा तुमची शंका खरी असल्याचे कळताच तुम्ही अगदी मुळापासून हादरता; कारण तुमचे प्रमोशन अगदी हाताशी आलेले दूर जात असलेले दिसेल, काहीही तयारी नसताना हे सर्व हाताळायचं कसं, हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल, तर काहीही विचार-अविचार करण्यापूर्वी तुमच्यावर आलेला ताण तुम्ही स्वीकारायला हवा. ही घडी तुम्हाला तुमच्या सर्व यश-अपयशासह स्वीकारायला हवी. लक्षात ठेवा - या शिवाय कोणताही मार्ग नाही. यावेळी कोंडलेल्या भावनांचा निचरा होऊ शकतो, खूप रडायला येऊ शकतं. पण, लक्षात ठेवा. हे रडणं कमकुवतपणाचं नक्कीच नाही; हे तुम्हाला भविष्यातील आव्हानांना स्वीकारायला समर्थ करीत असतं. ही परिस्थिती काही दिवसांचीच असते; एकदा हा काळ थोपवून धरता आला, तर मार्ग दिसेलच. 

आपल्या भावनांशी प्रामाणिकपणा दाखवा...

या दरम्यान, भावनांचा आवेग पाहण्याचे कठीण काम करणे भाग आहे. स्वत:साठी कुठल्याही दयाबुद्धीला जागा देऊ नये. कितीही सांत्वना वाटत असली, तरी स्वीकारू नये.  सर्व भावनांना निरपेक्ष भावनेने पाहणे खूपच कठीण असतं. लिहिणे आणि वाचण्यापेक्षा जगणं नक्कीच कठीण आहे. पण, यापेक्षा दुसरा सुरक्षित मार्ग नाही. यावेळी सर्वात त्रास कुठला होत असेल , तर तो आहे - आत्मघातकी विचारांचा. हा विचार येताच त्याचा सामना करण्याऐवजी त्या भावनांना लिहून काढणे महत्त्वाचे. लिहिल्यानै त्या भावनांचा निचरा झाला नाही, तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. ही तुमची सर्वात मोठी उपलब्धी असेल, यात शंकाच नाही. लिहिण्याचा आणखी एक मोठा फायदा हा होईल की, काही काळानंतर तुम्हाला तुमचे तत्कालीन विचार वाचून हसू आल्याशिवाय राहणार नाही.

साहसावर विश्वास ठेवा

हे खूपच आव्हानात्मक असले, तरी नोकरी, करिअर, कुटुंब, शिक्षण, घरातील मंडळींचं मत यापेक्षा तुमचं स्वतःच्या साहस बिंदूवर एकाग्रतेने लक्ष द्यायला हवे. हे साहस तुम्हाला सुयोग्य दिशेने घेऊन जाईलच, यात काहीच शंका नाही .ही भावना रेखांकित केली पाहिजे. त्यास लिहिलं पाहिजे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमच्या जोडीदाराचीही त्रेधातिरपीट उडू शकते. त्यालाही धक्का लागेल;  त्यातून बाहेर येण्यास वेळ दिलाच पाहिजे. 

जगी सुखी असा कोण आहे....

कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. तुम्हीही परिपूर्ण नाहीत. तसेच कोणीही परिपूर्ण नाहीत. मग आपण पाहिलेले स्वप्न, आराखडे खरेच ठरावेत, हा आग्रह का? 

तुमच्या आई-वडिलांचीही एका चौकटीतील विचार असू शकतात. त्यापलीकडे जाऊन तुम्हाला वैयक्तिक काही शंका-कुशंका असल्यास जसे - जन्मलेले बाळ अपंग असलेल्या तर,  एखाद्या तज्ज्ञाची मदत घेण्यात कमीपणा नाहीच; उलट तुम्हाला तुमच्या समस्येवर यामुळे जास्त प्रभावशाली मार्ग सापडू शकतो. कल्पनाशक्तीचा वापर अधिक सकारात्मकतेने केला जाऊ शकतो. मूल आपल्या हातात आहे. तुम्ही त्या इवल्याशा जीवाला कवटाळत आहात, असा विचार जरी केला तरी तुमच्या इच्छाशक्तीला बळ मिळू शकते.

लक्षात ठेवा - गर्भधारणा ही  वैयक्तिक असते आणि तिचा हा वैयक्तिकपणा जपलाच पाहिजे. मग हा मुद्दा दुय्यम आहे की, गर्भधारणा ही पूर्व नियोजित आहे की आकस्मिक.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • 1
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jul 01, 2019

text

  • Reply
  • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}