• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
बाळ काळजी आरोग्य आणि निरोगीपणा

तुमच्या मुलाच्या शरीरावर अतिरिक्त केस आहेत का? कमी करण्यासाठी 5 घरगुती उपाय

Sanghajaya Jadhav
0 ते 1 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 22, 2021

तुमच्या मुलाच्या शरीरावर अतिरिक्त केस आहेत का कमी करण्यासाठी 5 घरगुती उपाय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

आई झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतात. आपण नेहमी आपल्या मुलाची चिंता आणि काळजी घेतो.
जन्मापासूनच मुलाच्या शरीरात भरपूर केस असतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला मुलाचे केस काढायचे असतील तर तुम्ही ते स्वतः काढू शकता. यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे आणि रासायनिक उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही. चला जाणून घेऊया असे 5 घरगुती उपाय ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलाचे नको असलेले केस दूर करू शकता.

जादा केस काढण्याचा सर्वोत्तम मार्ग (Best Way to Remove Excess Hair)

दूध आणि मुलतानी मातीचा वापर - लहान मुलाला साबणापासून दूर ठेवा. बाळाला स्वच्छ करण्यासाठी आणि केस काढण्यासाठी तुम्ही मुलतानी माती दुधात मिसळून लावू शकता.

तेल फायदेशीर आहे, मसाज करा - तेलाने मसाज केल्याने तुमच्या बाळाचे रडणे संपेल तसेच त्याची हाडे आणि स्नायू मजबूत होतील.

कच्चे दूध वापरा - कच्च्या दुधाने बाळाच्या शरीराला हलके मसाज करा. असे नियमित केल्याने मुलाच्या शरीरातील केस निघून जातात.

बेसनाचा दुधासोबत वापर करा- मुलाचे केस काढण्यासाठी कच्च्या दुधात बेसन मिसळून त्याची पेस्ट बनवून मुलाच्या शरीराला हलक्या हातांनी चोळा.

दुधासोबत मसूर डाळ- जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शरीरावरील केस काढायचे असतील तर तुम्ही यासाठी दूध आणि मसूर डाळ वापरू शकता. हे करण्यासाठी तुम्ही 2 ते 4 चमचे मसूर डाळ कच्च्या दुधात मिसळा आणि रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर ती बारीक करून बाळाच्या अंगावर लावा आणि आंघोळ करा.

उबटन- हा मुलांच्या शरीरातील केस काढून टाकण्याचा एक मार्ग आहे बेसन, दूध आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. या पेस्टने बाळाच्या शरीराला मसाज करा. बाळाच्या शरीरावर आणि चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. दुधाऐवजी तुम्ही दही किंवा मलई/साय देखील वापरू शकता.
हे उपाय करून पाहिल्यास मुलांच्या शरीरातील नको असलेले केस काढता येतात.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}