• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गरोदरपणात कोरोनाचा सामना लक्षणे, प्रतिबंध, उपचार

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 19, 2021

गरोदरपणात कोरोनाचा सामना लक्षणे प्रतिबंध उपचार

गरोदर स्त्रियां म्हटलं कीं आपसुक येणारी दोन जीवांची अतिरिक्त काळजी यात सध्या फोफावत चाललेला कोरोनाचा (covid-19) प्रादुर्भाव. संसर्गजन्य रोग,विकार असला कीं तो संवेदनशील व्यक्तीस बांधीत करू शकतो. त्यात गर्भवती स्त्रीयांची प्रतिकारशक्ती (immunity factors) कमी झालेली असते त्याची विशेष काळजी महत्त्वाची.


 कोरोनाचा नेमका अर्थ काय ?/ (meaning of covid-19 In Marathi)

साल 2019 ला जगात एका घातक विषाणू (covid-19) ची नोंद झाली. कोवीड-19 या शब्दात CO ही अक्षरे कोरोना या शब्दाचे लघुरूप आहेत, VI म्हणजे व्हायरस किंवा विषाणू, D म्हणजे डिसीज किंवा आजार आणि 19 हा आकडा 2019 या वर्षाचा निर्देश करतो. कोरोना व्हायरस: रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने काय म्हटले आहे ?
 
WHO  – वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशन
CDC:  – द युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशन

Covid-19 कोरोनाचा प्रसार-:

गरोदर स्त्रियां या संसर्गजन्य विकाराने लवकर बांधीत होतात. यातुन गर्भवतीस अधिक गुंतागुतीच्या प्रक्रियेतून जाऊ शकतात. म्हणूनच  सामाजिक विलगीकरण (social distancing) महत्त्वाचे आहे
 हे सर्व परिचित झाल आहे की कसा पसरतो कोरोना. ज्या व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, अशा व्यक्तींच्या सान्निध्यात येण्याने या संसगार्चा फैलाव अधिक प्रमाणात होतो.


कोरनाची लक्षणे (covid-19 symptoms) :-

 • ताप
 • खोकला
 • कफ 
 • अंगदुखी
 • थकवा 

श्वास घ्यायला त्रास होतो ही कोरोना (covid-19)  संसगार्ची मुख्य लक्षणे आहेत. या संसर्गजन्य व्यक्तीला कमी- अधिक प्रमाणात  अशक्तपणा,अंगदुखी, वेदना, नाक-छाती चोंदणे, घसा खवखवणे किंवा अतिसार यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात. मात्र काहींना या आजाराची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. विशेष कोणतीही काळजी न घेताही यांतील काही व्यक्ती संसर्गमुक्त होऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या संक्रमनापासून बचावासाठी घरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

कोरोना (COVID-19) व्हायरस वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. बऱ्याच संक्रमित लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे असतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल न करता ते बरे होतात.

कोरोना बांधीत (positive) गरोदर स्त्रियांना आणि इतर व्यक्तीना नवीन लक्षणे दिसू लागले आहेत ती अशी

 • चव किंवा गंध न कळणे
 • ठणका व वेदना होणे
 • घसा खवखवणे
 • डोळे लालसर दिसणे
 • अचानक जुलाब होणे 
 • डोकेदुखीचा त्रास सुरु होणे 
 • त्वचेवर पुरळ येणे किंवा हाताच्या बोटांवर किंवा पायांच्या बोटांवर डाग येणे
 • धाप, श्वासोच्छ्वास घेता न येणे
 • छातीत दुखणे किंवा दबाव येणे
 • बोलता न येणे किंवा हालचाल करता न येणे

आपल्यास अशी लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या डॉक्टरांना किंवा आरोग्य केंद्रास भेट देताना गर्भवतीनी अतिरिक्त काळजी घ्या

प्रतिबंध (restrictions)

विलीगीकरण कक्ष (Home quarantine) :-  


सौम्य लक्षणे दिसत आहेत अशा अन्यथा निरोगी असलेल्या गर्भवतीनी घरीच उपचार करावेत.
एखाद्या व्यक्तीस व्हायरसची लागण झाल्यास त्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसून येण्यास साधारण 14 दिवस देखील लागू शकतात.

उपचार (treatment COVID-19):-
कोरोनावरती विशेष उपचार उपलब्ध नाहीत हा पण पुढील गोष्‍टी नक्कीच करू शकतो.

 1. प्लाझ्मा थेरपी (plasma therepy)
 2. लसीकरण (covid-19 vaccine)
 3. आयुर्वेद,युनानी,होमिओपॅथी वैद्यकीय सल्ला नुसार वापर
 4. चाचणी कुठे,कधी, कसी करायची हे शोधण्‍यासाठी गर्भवतीची धावपळ होऊ नये यासाठी हेल्‍थ केअर सेंटर ची (COVID-19 health care centre) नंबर जवळ ठेवा
 5. व्‍हायरसचा फैलाव रोखण्‍यासाठी संपर्क-ट्रेसिंग  प्रक्रियांना सहकार्य करा
 6. गरोदर स्त्रियांना कमी, सौम्य लक्षण आढळून आल्यास चाचणी उपलब्‍ध नसल्‍यास,डॉक्टरांच्या संपर्कात घरी राहा आणि इतरांपासून 14 दिवस दूर रहा

इतरांपासून किमान 1-मीटरचे अंतर ठेवा

वैद्यकीय मदत लागणार असल्‍यास, इतरांचे संरक्षण करण्‍यासाठी मेडिकल मास्‍क घाला.

टिप -: तुमचे हात वारंवार धुवा,सुरक्षित अंतर ठेवा आपले व इतरांचे जीव वाचवा.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}