• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

पावसाळा ॠतु नुसार 5 फळे खा : आरोग्य मिळवा

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 01, 2021

पावसाळा ॠतु नुसार 5 फळे खा आरोग्य मिळवा
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

"पावसाळा म्हटलं की नटलेली हिरवाई,
रिप रिप,रिमझिम बरसती धारा,लोचन धारण करे नवलाई"
ॠतुमानानुसार दिसणार्या रसदार चकचकीत नाहून धोऊन निघालेल्या फळाची रेलचेल पावसाळ्यात ही फळेच आपल्याला आरोग्य प्रदान करतात. आपल्याला वडीलधारी लोक नेहमीच सांगत आले आहे ऋतु नुसार फळाच सेवन करा किंवा जे ज्या सिझन मध्ये पिकतं ते खा आरोग्यदाई राहाल. यामागे निसर्गाने मानवास आरोग्य जपण्यास दिलेली देणगी आहे.
तर जाणून घेऊया पावसाळ्यात उपलब्ध असणार्या लाभदायी फळाचे फायदे.

डाळिंब(Pomegranate)-:

एक स्वादिष्ट आणि चविष्ट लालचुटूक असे फळ. चवीस गोड थोड तुरट. पण अधिक लाभदायक तसे हे वर्षभर उपलब्ध असतं पण पावसाळ्यात विशेषतः फायदे मिळतात.पावसाळ्यात आजारापासून बचाव करण्यासाठी रोज एक तरी डाळिंब खा. फायबर आणि व्हिटामिन ने युक्त असे डाळिंबाच्या सेवनाचे फायदे अनेक आहेत डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होतात.इम्यून सिस्टम मजबूत होते. यातील अँटी ऑक्सीडेंट मुळे आजारांचा धोका कमी होतो. रक्तप्रवाह सुरळीत व्हायलाही भरपूर लाभदायक.

 

मोसंबी(Citrus)-:

पावसाळ्यात बाजारपेठेत हमखास नजरेत पडणार फळ. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचा फायदा त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी होतो. त्वचा नितळ आणि तुकतुकीत होते. डोळ्याचे आरोग्य चांगले राहते तसेच केसांना आवश्यक पोषण मिळते. दररोज मोसंबी खाल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.रोग प्रतिकारशक्ती चांगली होते आणि पोट स्वच्छ राहते.

चिकू (Chiku)-:

आपण लहानग्यांना सुध्दा प्रेमानें चिकू बोलतो यातच या फळाचा गोडवा आणि आवड दिसून येते.
चिकू मध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यात गरोदर स्त्रियांना आवश्यक घटक फॉलिक अॅसिड असते. चिकूमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे लहान बालकास तरतरी मिळते किंवा थकवा नाहीसा होतो.याने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृदया संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. पावसाळ्यात इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित तक्रारींपासून दूर राहण्यासाठी याचे सेवन अवश्य करावे.

जांभूळ (jambhul)-:

पावसाळ्यातच उपलब्ध असलेल्या फळापैकी एक जांभूळ ,याचे सेवन मान्सून सिझन मध्ये करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. जांभळात आयर्न, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटामिन ची योग्य प्रमाणात असल्यामुळे याचे सेवन केल्याने पोटदुखी आणि इंफेक्शनपासून बचाव होतो. हे डायबिटीज आणि कर्करोग असलेल्या रुग्णांना खूपच फायद्याचे आहे. जांभूळ झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या तक्रारी वर अत्यंत गुणकारी आहे. याची विविध औषध बाजारात उपलब्ध आहेत ते वैद्यकीय तपासणी अंती घ्यावे. डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात त्यांचा उपयोग फायदेशीर असतो.  हे नैसर्गिकरित्या रक्त शुध्दीकरण करतं. जांभळामध्ये मुबलक प्रमाणावर लोह,आयर्न आहे. यामुळे याचे अनेकानेक फायदे आहेत.

पेरू (Peru)-:

पेरू हे सर्वाना परिचित फळ, मुबलक प्रमाणात उपलब्ध आणि सगळ्याना परवळेल असं.पेरू मध्ये रिच फायबर कंटेंट व लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्याने हे मधुमेहापासून  वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला रोखण्याचं काम करतं. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेग्युलेट होत राहते.याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरास आवश्यक घटक मिळतात. तसंच पेरू मेटाबॉलिज्म वाढवतो व वजन कमी करण्यास मदत करतो.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}