• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक शिक्षण आणि शिक्षण

मुलांना शारीरिक/लैंगिक शोषणाबद्दल प्रशिक्षित करा

Sanghajaya Jadhav
3 ते 7 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Mar 31, 2022

मुलांना शारीरिकलैंगिक शोषणाबद्दल प्रशिक्षित करा
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 "लहान पण देगा देवा जसे मुंगी साखरेचा रवा" किती निरागस असते बालपण आनंदी , समाधानी ,उल्लाशीत ,प्रफुल्लीत पण याना गालबोट लावतात समाजात वावरणारे तुमच्या आमच्या ओळखीचेच विकृत लोक. 
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित बातम्या तुम्ही रोज वाचत किंवा पाहत असाल. बाल लैंगिक शोषण ही किती मोठी समस्या आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, बालवयात प्रत्येक ४ पैकी १ मुली आणि ६ पैकी १ मुलाचे लैंगिक शोषण झाले आहे. मुलांचा गैरफायदा घेणारी व्यक्ती अनेकदा ओळखीची असते आणि ते सहजपणे मुलाला फूस लावतात, कारण मुलांना अनेकदा समजत नाही की त्यांच्यात काहीतरी चूक आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त प्रेम आणि आपुलकी पुरेशी नाही, तर त्याला चांगले आणि वाईट यात फरक करायला शिकवणे देखील खूप महत्वाचे आहे. अनेक पालकांना असे वाटते की त्यांचे मूल लैंगिक शोषणासारख्या गोष्टींबद्दल शिकवण्यासाठी खूप लहान आहे. अशी मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता जास्त असते, कारण समाजात उपस्थित अत्याचारी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात.

बालक कुणाला म्हणायचे ?

आपण मुलं जेव्हा पौगंडाअवस्थेत येते तेव्हा ते जेम तेम ११ ते १६ वर्षाच्या दरम्यान असते याला सरळ भाषेत किशोरावस्था म्हणतात पण आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे, ‘बालक’ हा १८ वर्षाखालील कोणीही व्यक्ती ही बालक म्हणुन संबोधिले जाते  आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त व्याख्या आहे आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन ऑन द राईटस् ऑफ द चाइल्ड (यु.एन.सी.आर.सी.) ने व बर्‍याच देशांनी देखील ही व्याख्या मान्य केली आहे.

बालकांचे लैंगिक शोषण म्हणजे नक्की काय? (What exactly is child sexual abuse? in marathi)

नातेवाईक, स्नेह्यांकडून प्रेमाने गोंजारणे, अश्लील टिप्पणी करणे आणि लगटपणे थापडणे आशे कोणतेही कृत्य किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा होईल ज्याद्वारे बालकाच्या शरीराला इजा किंवा हानी पोहोचेल असा संपर्क/ स्पर्श, आणि कोणतेही संभाषण ,वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल/ लज्जित होईल/ अवमानित होईल ते सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडले जातात. 

बालकाचे शारीरिक शोषण कसे ओळखणार? (How to recognize the physical abuse of a child?)

बालकाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. चिमटे काढणे ,असहनीय मार ,चटके देणे, जाळणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल असे वर्तन. त्यात मुलाला इजा करण्याचा हेतू नसला तरी जर ती कृती मुलाच्या वयासाठी अयोग्य अशा अती-शिस्तीचा किंवा शारीरिक शिक्षेचा परिणाम असेल तर त्याची गणना शारीरिक शोषणातच होते.

मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी १० टिपा (10 tips to protect children from sexual abuse in marathi)

१) तुमच्या अनुपस्थितीत मुलाला कोणत्याही व्यक्तीच्या मांडीवर बसण्यास मनाई करा.
 
२) मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक शिकवा.
 
३) मुलं जेंव्हा बाहेर खेळायला जातात तेंव्हा ते कोणते खेळ खेळत आहेत आणि त्यात त्यांना काय करायचं आहे हे जाणून घ्यायला हवं.

 

४) जर त्यांना एखाद्याला भेटण्यास अस्वस्थ वाटत असेल तर, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू नका, मग ते तुमच्या कितीही जवळ असले तरीही.
 
५) जर मुल एखाद्याशी खूप संलग्न होत असेल तर त्याकडे लक्ष द्या.
 
६) जर मुल अचानक खूप शांत झाले तर त्याला आवश्यक प्रश्न संयमाने विचारा.

 

७) मुलांसमोर सेक्सला गंमतीशीर विषय किंवा विनोद बनवू नका, त्याबद्दल त्यांना स्वतःच शिक्षित करा. जर तुम्ही शिकवले नाही तर दुसरे कोणीतरी त्यांना चुकीचे शिकवू शकते.
 
८) ते कोणत्या प्रकारची पुस्तके वाचत आहेत, टीव्हीवर कोणते कार्यक्रम पाहत आहेत, याचे भान ठेवा.
 
९) जर मुलाने एखाद्याबद्दल तक्रार केली तर ती गांभीर्याने घ्या आणि योग्य पावले उचला.
 
१०) मुलाला तुमच्याबरोबर सर्वकाही शेअर करण्यास सांगा, त्याचे मित्र व्हा, जेणेकरून असे काहीतरी घडल्यावर तो तुम्हाला सांगण्यास संकोच करू नये.

आपल्या मुलासोबत लैंगिक शोषण होऊ शकत नाही असा विचार कधीही करू नका. खूप उशीर होण्यापूर्वी त्यांना हे सर्व अनिवार्यपणे शिकवा.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}