• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

जननी योजना गर्भवती महिलांसाठी एक प्रभावी उपक्रम

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 11, 2021

जननी योजना गर्भवती महिलांसाठी एक प्रभावी उपक्रम
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

जननी योजना गर्भवती महिलांसाठी एक प्रभावी उपक्रम (Janani Yojana is an effective initiative for pregnant women)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुपोषण आणि महिला सक्षमीकरणासाठी पूरक असलेल्या जननी सुरक्षा योजनेचा आरंभ आणि अंमलबजावणीने गर्भवती मातांना दिलासा देण्याच काम केल आहे. ही महिला सुरक्षा योजनामुळे अप्रत्यक्षपणे माता मृत्यूचा दर कमी करण्यासाठी या योजनेने चांगली कामगिरी केलीली आकडेवारीत दिसते.
राज्य शासनाकडून गर्भवती मातांची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम आरोग्य खात्याकडून राबविले जातात. यासाठी प्राधान्याने  मातांची ग्रामीण स्तरावर आरोग्य यंत्रणेकडे नोंद व्हावी म्हणून आशा कार्यकर्तीमुळे नोंद करण्याची सोय झाली आहे. आज प्रत्येक गाव खेड्यावर आशा सेवीकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गर्भवती मातेची काळजी आणि लोहयुक्त गोळ्या देण्याबाबत सुलभता आली आहे. गर्भवती मातेचा प्रसूतीकाळ येईपर्यंत आशा कार्यकर्ती आणि गावातील परिचारिका मातेचे वाढते वजन आणि औषधाचा पुरवठा करतात.

उद्दिष्ट (Objective) -:

राज्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्‍या कुटुंबातील माता मृत्‍यु व अर्भक मृत्‍युचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांचे आरोग्‍य संस्‍थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही कार्यप्रणाली इतकी कार्यान्वित आहे की त्याचे प्रमाण शंभर टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे.
त्यानंतर गर्भवती मातेची प्रसूती ही संस्थात्मक व्हावी या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तयार असते. संस्थात्मक प्रसूतीमुळे प्रत्येक गर्भवती मातेला प्रसूतीच्या वेळी कोणतीही गुंतागुंत झाल्यास तातडीने जीव वाचवणारे उपाय करणे शक्य होऊ लागले आहे. त्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवेचा वापर प्रभावी होत आहे. संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यासाठी गर्भवती मातांना केवळ औषधोपचार व सुरक्षित प्रसूती एवढेच मुद्दे महत्त्वाचे नाही. प्रसूती झाल्यानंतर तिला चांगल्या पोषण आहाराची गरज असते.
मात्र आपण पाहतो की पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेत याही काळात मातेची हेळसांड होऊ शकते. अनेकवेळा कुटुंबियांकडे प्रसूतीमुळे मातेच्या प्रकृतीत झालेली झीज भरून काढण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असो की अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी एवढेच नव्हे तर अंत्योदय योजनेत असलेल्या महिलेला पोषण आहारासाठी विशिष्ट रक्कम देण्याची सोय शासनाने केली आहे. जननी सुरक्षा योजनेत ही रक्कम प्रत्येक मातेला प्रसूतीच्या वेळी दिली जाते. यातून या मातेला पौष्टिक आहार खाण्याची सोय होते. प्रसूतीसाठी आलेल्या मातांना या योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळत आहे. माता मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यासाठी योजनेचा लाभ उपयुक्त ठरला आहे. जननी सुरक्षा योजना अत्यंत प्रभावीपणाने राबवली जात असल्याने राज्याने माता मृत्यूचा दर कमी करण्यामध्ये फार मोठी आघाडी मिळवली आहे. पाचशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जाते. तसेच त्यासाठी निधी देखील प्रत्येक जिल्हास्तरवरील यंत्रणेला वर्षाच्या सुरुवातीलाच दिला जातो. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी ही मदतीची रक्कम देण्याची सोय सहजपणे होते. त्यामुळे योजनेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले जात आहे.

जननी-बालक सुरक्षा कार्यक्रम ( Maternal-Child Protection Program )-:

 • नि:शुल्क संस्था अन्तर्गत प्रसव
 • नि:शुल्क सिजेरियन प्रसव
 • नि:शुल्क औषध उपचार आणि इतर उपयोगी सामग्री
 • नि:शुल्क तपासणी ( रक्त, लघवी,अल्ट्रा सोनोग्राफी इत्यादी )
 • नि:शुल्क जेवण ( दवाखान्यात थांबण्यापासुन सामान्य डिलीव्हरी प्रयत्न तीन दिवस आणि सिजेरियन मध्ये सात दिवसा पर्यंत मोहलत दिली जाते )
 • नि:शुल्क रक्त सुविधा
 • नि:शुल्क बस सेवा ( घरापासून ते दवाखान्या पर्यत्नचा तसेच रेकमेड केल्यावर मोठ्या दवाखान्यात आणि वापस परत घरा पर्यंत सेवा )
 • ह्या सर्व सुविधा फ्री दिल्या जातील
 • आजारी नवजात बालकास 30 दिवसांचे देखरेखीखाली नि:शुल्क प्रावधान
 • नि:शुल्क उपचार
 • नि:शुल्क औषधं किंवा अन्य उपयोगी साहित्य
 • नि:शुल्क तपासणी
 • नि:शुल्क रक्त पुरवठा
 • नि:शुल्क बस सेवा ( घरापासून ते दवाखान्या पर्यत्नचा तसेच रेकमेड केल्यावर मोठ्या दवाखान्यात आणि वापस परत घरा पर्यंत सेवा )
 • ह्या सर्व सुविधा फ्री दिल्या जातील

लाभार्थ्यास दिले जाणारे लाभ (Benefits to be given to the beneficiary)

 • ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍थेत प्रसूती झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ७००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़-या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
 • शहरी भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगीआरोग्‍य संस्‍थ्‍ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ६००/-लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़-या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
 • ग्रामीण व शहरी भागातील फक्‍त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्‍यांची प्रसुती घरी झाल्‍यास अशा लाभार्थ्‍यांस रुपये ५००/- लाभ प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
 • जे पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्‍ञक्रिया करणे आवश्‍यक असल्‍यास लाभार्थीस रुपये १५००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.

आशा सेविकांना मिळणारे लाभ ( Benefits to Asha Seviks )

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थीची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ६००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते. त्‍यामधील रुपये ३००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये ३००/- आरोग्‍य संस्‍थ्‍ेात प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.

शहरी भागात पात्र जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ४००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते. त्‍यामधील रुपये २००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये २००/- आरोग्‍य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.

सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था (Health organizations providing services)

ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा स्‍ञी रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये.
शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

बिगर शासकिय संस्थांचे कार्य (Functions of non-governmental organizations)

खाजगी रुग्‍णालये सुध्‍दा जननी सुरक्षा योजनेच्‍या अंतर्गत जसुयो पात्र लाभार्थ्‍यांना लाभ देण्‍यासाठी मानांकित करण्‍यात आलेले आहेत.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 1
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jun 11, 2021

खूप छान माहिती आहे मॅडम ....👌👌 या माहीत वरून नक्कीच महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची मदत देखील होईन.... 👍 धन्यवाद मॅडम... 🙏🙏🙏🙏

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}