• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
शिक्षण आणि शिक्षण

21ऑगस्टला अकरावीची सीईटी परीक्षा: आवश्यक नियमावली

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Aug 04, 2021

21ऑगस्टला अकरावीची सीईटी परीक्षा आवश्यक नियमावली
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला होता. दहावीचा निकाल आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल लागल्यानंतर सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. बहुतांश राज्यात बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.

 • यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले गेले होते. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे.
 • यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, गुण मूल्यमापन  (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले गेले. 

येणार्या 21ऑगस्ट ला 11वी ची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल नुकताच महाराष्ट्र राज्यात जाहीर झाला. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यापुढे त्याना वेध लागले आहे ते म्हणजे 11वी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शिक्षण विभागाकडून अकरावी सीईटी परीक्षेची नियमावली जाहीर केली आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी अकरावी सीईटीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ,

 1. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान अकरावी सीईटीची परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. ही परीक्षा तब्बल दोन तासांची असणार आहे.ही परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
 2. खर तर सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा 100 माक्स अशी असेल.
 3. तसेच त्यात 1.गणित 2.विज्ञान 3.समाजशास्त्र 4.इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी अनुक्रमे 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
 4. या परीक्षेला पर्यायी उत्तरांची सोय असणार आहे ओएमआर (OMR) पद्धतीने घेतली जाणार.

परीक्षेला जाताना

 •  ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत त्यांना त्यांच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात त्याना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
 • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नक्कीच दडपण आल असेल कारण आभ्यासातील नियमीतता निघून गेलेली आहे  मुलं अभ्यासा बाबतीत आळशी झालेली आहे.
 • तसेच मार्ग दर्शन केवळ ऑनलाईन चालू असल्यामुळे ती एक उदासीनता त्याच्यात दिसून येतेय
 • तरीही योग्य नियोजन आणि सातत्याने ही परिक्षा सहज पास करता येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी बाऊ करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा आणि शेअर करायला विसरू नका. परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर शिक्षण आणि शिक्षण ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}