• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गर्भवती स्त्रीच्या ताटात नेहमीच असावेत हे आवश्यक घटक

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 28, 2021

गर्भवती स्त्रीच्या ताटात नेहमीच असावेत हे आवश्यक घटक
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

संतुलित आहार गरोदरपणात स्त्रीच्या त्या मार्फत बाळाच्या आरोग्याची गुरूकिल्ली. पोष्टिक आहारावरच गर्भ पोषण अवलंबून असतं. मातेचा आहार हा सात्त्विक आणि मन तृप्त करणारा असावा. जेणेकरून करून गर्भवती स्त्री समाधानी असते. आहार हा चौफेर म्हणजे प्रथिने,पिष्टमय पदार्थ,जीवनसत्वे,स्निग्ध पदार्थ आणि खनिजे आवश्यक घटक ताटात असायलाच हवेत.

1.न्याहारी (breakfast) :-
"न्याहारी सर्वोत्तम तर तुमचा दिवस उत्तमोत्तम" न्याहारीत गर्भवतीने पोहे, उपमा, खीर,शीरा,पराठे,वेगवेगळ्या डळीचे थालीपीठ असे विभिन्न पदार्थ खावे.याद्वारे सर्व घटकाचे पोषण गर्भवतीस मिळेल.

2.जेवणात काय खावे (lunch) :-ज्या त्या ॠतुत उपलब्ध असणारी फळे,भाज्या,अन्न पदार्थ खावेत जसे शेवगाच्या शेंगा, पालक,मटकी,लालमाठ,भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात आवश्यकच.मसूर, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात खावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले.पेरू, चिकू, केळी, (केळीच शिकरण) सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही फळेही गर्भवतीस निरोगी ठेवतात मटण, मासे, अंडी हे आवडीनिवडी नुसार प्रमाणात खावे आहार हा नेहमीच समतोलीत असावा.

3.दुध (milk) :-सुरवातीच्या काळात वजन कमी होते कारण उलट्या,मळमळ,खाण्या वरची वासना उडते अशा काळात दुध हे सर्वोत्तम द्रव पदार्थ ठरतो कारण यातुन कॅल्शियम सुध्दा मिळते जर काहीना दुधाने आणखी मळमळत असेल तर पनीरचे तुकडे किंवा दुध पावडर,चीज खाऊ शकता.

4.तीन ते चार वेळेस खावे (eat for 3 to 4 times):-पोट गच्च भरेल असे न खाता तीन ते चार वेळेस थोडे थोडे करून खावे. यामुळे अपचन होणार नाही आणि पचनास मदत होईल.

5. जीवनसत्व अ,ब,क,ड, ई (vitamins A,B,C,D,E) :-हे सर्व व्हिटॅमिन पोषक आहार आणि फळातून मिळतात यातुन प्रतिकारशक्ती मजबुत होते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी ही संतुलित ठेवणं गरजेचं आहे म्हणून गरोदर स्त्रियांनी पाणी भरपूर प्यायला हवं.

6.रात्रीचा उपहार (dinner) :-तुम्ही गरोदर आहात म्हणून खुप खाल्ले पाहिजेत अस काही नाही पण दिनक्रम मात्र उपयोगी ठरतो आईच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी म्हणून रात्रीचा आहार हलका फुलका असावा. जस मुगाची खिचडी, वरण-भात हलकीशी तुपाची धार त्यावर किंवा टमाॅटो सुप अस काहीस जेणेकरून गर्भ पोषण व्यवस्थित होईल.

तुमचा सल्ला आम्हाला प्रिय आहे आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}