• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

नवरात्रोत्सवाचा उपवास आणि आरोग्यदायी पर्याय

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Oct 07, 2021

नवरात्रोत्सवाचा उपवास आणि आरोग्यदायी पर्याय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

आज पासुन  नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मागच्या साला प्रमाणे कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने  केले आहे. नवरात्रीमध्ये चर्चिला जाणारा विषय म्हणजे उपवास. काही जण तर नवरात्रोत्सवात नऊ दिवस काही न खाता फक्त पाणी आणि जूस पितात. तर काही जण फलाहार करतात.यामुळे मन ,शरीर शुद्धी होते म्हणुन लोक नवरात्रीचे उपवास करत असतात. पण आवश्यक घटक न मिळाल्या मुळे बऱ्याच जणांना आरोग्य तक्रारी चा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला अशा उपवासाच्या पदार्थांबद्दल किंवा पर्याया विषयी सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुम्हाच्या शरीराला पोषक तत्वे देखील मिळतील आणि तुमचा नवरात्रोत्सवाचा उपवास देखील तुटणार नाही.

केळी-

केळी हा पोट भरणारा उपवासात आवर्जून खाल्ले जाणारे. केळी ने शरीराला ऊर्जा पण मुबलक मिळते आणि पोट भरल्या सारखे वाटत राहते. 
नवरात्रोत्सवाच्या उपवासादरम्यान केळी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

भगर -

सर्वाचा माहितीतील प्रकार याचे अनेकानेक पदार्थ करून महिला उपवास सोडतात. वारीचे तांदूळ असे म्हणून हि संबोधिले जाते महाराष्ट्रातील धार्मिक उपवासाच्या वेळी आवर्जून बनवले जाते. ही मसालेदार डिश,खिचडी,डोसा,भगर उपमा असे विविध पदार्थ बनवु शकतो. कोणत्याही दिवशी हा उत्तम पर्याय आहे.

 शिंगाड्याचे पीठ -

शिंगाड्याचे काही उपयुक्त गुण आहेत. गरोदर स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे आहे.  शरीराला हवे असणारे फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शिअम व फायबर्स ह्या एका गोष्टीतून आपल्याला मिळतात. यापासून पराठे ,थालीपीठ ,ढोकळा असे अनेक उपासाचे पदार्थ बनवू शकतो. 


साबुदाना -

आबाल वृद्ध जे आवडीने खाऊ शकतात आसा उपवासाचा पदार्थ. पोटभरीचा खाद्य पदार्थ , ऊर्जा हि आवश्यकतेने नुसार मिळते म्हणून प्रसिद्ध. नवरात्रीत महिला साबुदाण्याचे विविध प्रकार करून खातात ,कटलेट,गोड खीर, साबुदाण्याचे तेफले, वळ्या. 


दुध ,दही ,ताक -

दुध पिल्याने तुमची प्रोटीन कॅल्शिअम ची कमतरता भरून निघेल. दही या उपवासाच्या दिवसात पोटाच्या तक्रारी कमी करेल म्हणजेच तुमचं पंचतंत्र टिक राहते. ताक तुमची शरीर शुद्धी करण्यास मदत करते अर्थात स्वच्छता करते. उपवासाचे दुध ,दही ,ताक हे उत्तम पर्याय आहेत. 

फलाहार  -

फळांच्या रसाऐवजी जर संपूर्ण फळ चावून खाल्ले, तर त्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढत नाही. तसेच इन्सुलिन देखील वाढत नाही. ज्यामुळे वजनही वाढत नाही. फ्रुट जूस आरोग्य दायक आहे आणि हे  सर्वश्रुत आहे. नवरात्रीत सर्व फळ उपलब्ध असतात त्यानुसार उपासक मीठ, साखर, पुदिन्याची पाने, काळे मीठ  टाकूनही उपास करू शकतो. 

  • या सर्व पदार्थातून उपसातील तेच ते अन्न खाण्या पासून वेगळे पदार्थ आवलंबवता येतील  
  • तोच तो पणा कमी होईल  
  • तुम्ही मजेत नवरात्री उत्सव मनवू शकतात.  

आशा आहे की तुम्हास याद्वारे उत्तम माहिती मिळाली असेल तुमचे नवरात्री उपवास सुखकारक आणि आरोग्यदायी जावो हीच अपेक्षा.तुमच्या सूचना आमचा पुढचा ब्लॉग उत्तम बनवू शकतो, मग कृपया टिप्पणी द्या, जर तुम्ही ब्लॉग मध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर ते नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}