• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक उत्सव आणि उत्सव

'फादर्स डे' अर्थात कृतज्ञता व्यक्त करावयाचा दिवस

Satish Samarth
0 ते 1 वर्ष

Satish Samarth च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 08, 2019

फादर्स डे अर्थात कृतज्ञता व्यक्त करावयाचा दिवस

तुमची मुलंसुद्धा प्रश्न विचारत असतीलच आणि जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यांना मिळत नाहीत, तोपर्यंत ते तुम्हाला भंडावून सोडतील, हे मात्र नक्की. 'फादर्स डे'बद्दलही तुमच्या मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न येत असतीलच; ती तुम्हाला विचारत असतीलही. जसे, आपण जून महिन्यातच 'फादर्स डे' का बरं साजरा करतो ? 'फादर्स डे' साजरा करण्यामागे हेतू काय आहे..? तर चला आज याबद्दलच बोलू या.
आपण दरवर्षी जून महिन्याच्या तिस-या आठवड्यात; साधारण तिस-या रविवारी हा सोहळा साजरा करीत असतो. हा सोहळा वडिलांप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्याच्या हेतूने साजरा केला जातो. या दिवशी वडिलांनी घेतलेल्या कष्टांबद्दल आपण आपली कृतज्ञता व्यक्त करीत असतो. आता आपण 'फादर्स डे' कधी-केव्हापासून साजरा केला जातोय, याबद्दल माहिती घेऊ या.

'फादर्स डे' केव्हापासून साजरा केला जातोय...?

असं मानलं जातं की अगदी सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील वाशिंग्टन या शहरात (१९ जून १९१०) या उत्सवाला साजरा करण्याची प्रथा पडली. २०१८ रोजी या उत्सवाला तब्बल १०८ वर्षे पूर्ण झालीत. यामागे असलेली रंजक गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल, असे वाटते.
तर झाले असे की, सोनेरा गोड नावाची एक गोड मुलगी होती. ती अगदी चिमुकलीच होती, की तिच्या आईचे निधन झाले. तिच्या वडिलांनी, विलियम स्मार्ट यांनी मात्र कच खाल्ली नाही. दु:खात असतानाही त्यांनी आपल्यावर आकस्मिक पडलेल्या जबाबदारीपासून पाठ फिरविली नाही. त्यांनी आपल्या लेकीचा सांभाळ इतक्या प्रेमाने आणि जाणीवपूर्वक केला की, मोठी झाल्यानंतरही मुलीला कधीही आईची उणीव जाणवली नाही.  वडिलांचे हे प्रेम पाहता, त्या मुलीनेच अर्थात सोनेरा हिने आपल्या वडिलांकरिता 'फादर्स डे' साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस होता - १९ जून १९९०. 'फादर्स डे'ची ही संकल्पना इतकी लोकप्रिय ठरली की, १९२४ या वर्षी राष्ट्रपती कैल्विन खोली यांना  'फादर्स डे' विषयी आपली संमती जाहीर करावी लागली. यानंतर १९६६ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती लिंडसन जान्सन यांनी जूनच्या तिस-या रविवारी हा सण धडाक्यात साजरा करण्याचे घोषित केले. त्यानंतर १९७२ पासून 'फादर्स डे' रोजी सुटी जाहीर करण्यात आली.

भारतात फादर्स डे कसा साजरा केला जातो....?

आपल्या भारतातही 'फादर्स डे' मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. विविध शाळा 'फादर्स डे'निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करीत असतात. यानिमित्त वडिलांकरिता आकर्षक भेटवस्तूंनी जसे ग्रीटिंग कार्ड, भेटवस्तू, वगैरेंनी बाजार अक्षरश: ओसंडून वाहत असतो. सोशल मीडियावरही आपल्या वडिलांबरोबर आपला फोटो व भावना शेअर केली जात असते.  बच्चेकंपनी हा 'डे' साजरा करण्यास विशेष उत्साह दाखवतात. 

आपल्या सूचनांचे पाठबळ आमच्या लेखांना संजीवनी देणारे असतील, त्यांना आणखी उत्कृष्ट करणारे असतील, यात शंकाच नाही. तुम्हाला उपरोक्त माहिती मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करावयाची असेल, तर आम्हाला आनंदच होईल.

  • 1
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.

| Jul 01, 2019

text

  • अहवाल
+ ब्लॉग लिहा

Always looking for healthy meal ideas for your child?

Get meal plans
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}