• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा गर्भधारणा

गर्भधारणा दरम्यान व्यायाम आणि योग फायदे

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Mar 14, 2019

गर्भधारणा दरम्यान व्यायाम आणि योग फायदे

‘योगा’ व ‘व्यायाम’ निरोगी आरोग्य देणारे आहेत. त्यांचे शरीराला होणारे फायदेही भिन्न आहेत. चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, विविध खेळ प्रकार या सा-यास आपण ‘एक्सरसाईज’ किंवा ‘व्यायाम’ असे म्हणतो, तर योगासने स्थिर एकाजागी बसून केली जातात.

 पोहोणे हा गरोदरपणासाठी उत्तम व्यायाम प्रकार आहे, कारण तुमच्या वाढणार्या पोटाला पाणी चांगला आधार देते आणि तुमच्या गरोदरपणाच्या टप्प्यानुसार तुम्ही तुमचा वेग कमी जास्त करू शकता. रात्रीच्या जेवणाआधी थोडा वेळ चपळाईने चाला. त्यामुळे तुम्हाला आरामशीर वाटेल आणि चांगली झोप लागेल. आठवड्यातून ४-५ वेळा रोज २०-२५ मिनिटे व्यायाम करा. कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही विशिष्ट व्यायाम हे गरोदरपणात करण्यासाठी सामान्यपणे सुरक्षित असतात

काहीजण म्हणतील कारण गरोदरपणात व्यायाम आणि योग कसा करता येईल. पण व्यायाम आणि योगा हा जितका कठीण आसनांनी बनलेला आहे तितकाच सोपा व प्रत्येकाला करता येतील अशा आसनांचा त्यात समावेश होतो. तुम्हाला गरोदरपणात कोणती योगासने करता येतील त्याची माहिती आम्ही देत आहोत.

 1. भद्रासन किंवा फुलपाखरु आसन संपूर्ण शरीराचा भार उठविणाऱ्या पायांवर गरोदरपणात दबाव वाढतो. यासाठी हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो.
   
 2. यस्तिकासन शरीराचा तणाव कमी करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानले जाते. यामुळे संपूर्ण शरीराला पूर्णत: स्ट्रेच करण्यासाठीही मदत मिळते.
   
 3. पर्वतासनचा गरोदरपणात खूप फायदा होत असतो. शिवाय जास्त बैठे काम करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांच्या पाठीच्या कण्यात समस्या आहे, अशांनाही हे आसन फायदेशीर ठरते. यामुळे खांदेदुखीवरदेखील आराम मिळतो.
 4. कोनासनाने कंबरेच्या वेदनेपासून मुक्तता मिळते, सोबतच डिलिवरीनंतर चरबी कमी होण्यास मदत होते. या योगामुळे कंबर लवचिक होईल ज्यामुळे प्रसुतीदरम्यान वेदना जास्त होणार नाहीत. मात्र प्रेग्नन्सीच्या सात महिन्यानंतर हा योगाप्रकार बंद करावा. 
   
 5. वक्रासन केल्यास यकृत, किडनी, पॅनक्रियाजवर सकारात्मक परिणाम होतो. सोबतच पाठीचा कणा देखील मजबूत होतो. 

 

ह्या प्रकारची योगासने गर्भावस्थेत करू शकतात पण प्रत्येक गर्भवती स्त्रीचे स्वास्थ वेगवेगळे असते तेव्हा जी आसने करायला सोपी व कोणताही त्रास होत नसेल तरच करावीत. नाहीतर साध्या शारीरिक हालचाली कराव्यात. ही योगासने सहज, सुलभ, बाळंतपण, आणि बाळंतपणानंतर लवकर पूर्ववत होणे याच्यासाठी मदतशील ठरतील. पोटावर दबाव पडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेत करू नयेत.

पहिल्या तिमाहीत उभाने करायची योगासने करावीत कारण त्याने पायांना बळकटी मिळते. रक्तभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणाऱ्या मुंग्या बंद होतात. दुसऱ्या तिमाहींत आसने करण्याचा वेळ कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान ह्याच गोष्टी कराव्यात. गर्भावस्थेच्या दहाव्या आठ्वड्यापासून ते चौदाव्या आठ्वड्यापासून सराव करू नये. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणून खूप ताण येऊ देऊ नका. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. उलटे होणे पूर्णपणे टाळावे. जी आसने तुम्हाला कठीण वाटत असतील ती करू नये.

व्यायाम आणि योग करण्याचे फायदे

जर गर्भधारणेच्या काही समस्यांमधून स्त्रियांना काही सवलत मिळत नसेल तर. जर त्यांना गर्भधारणेमध्ये काही व्यायाम आणि योग दिले गेले असेल, तर ते आपल्याला खालील फायदे देतात...

 • वितरण सुलभ आणि वितरण योग्य प्रकारे केले जाऊ शकते.
 • गरोदरपणात महिलांनी काही ठराविक व्यायाम आणि योगासने केल्यास त्यांना फक्त त्या समस्यांपासून आरामच मिळत नाही तर डिलिवरीमध्येही सहजता येऊ शकते आणि बाळाचाही विकास योग्यप्रकारे होतो.
   
 • गरोदरपणात महिलांच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल घडत असतात. शरीरात वेदना आणि मूड स्विंगची समस्या सामान्य असते, जर महिलांनी गरोदरपणात काही ठराविक योगासन केले तर बऱ्याच समस्या दूर होतात. 
   
 • योग आणि व्यायाम गर्भवती महिलांना मानसिक व शारीरिक दृष्ट्र्या कणखर व सशक्त बनवत असतो. खूप मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि शरीराला कार्यशील होण्याबरोबरच सकाळी होणाऱ्या उलट्या, सिकनेस, बद्धकोष्ठता त्यांच्यावरही मात करते. बाळंतपण नॉर्मल व्हायला अडचण येत नाही. गर्भाशय आणि गर्भनलिका यांच्यातील तणाव कमी करून बाळंतपण सुखकर पार पाडण्यास मदत करते. 

 

प्रेग्नन्सी योग वर्गाला जाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी आणि त्याच्याबरोबर असताना वापरल्या जाणार्या त्या विशिष्ट स्नायूंना मजबुती आणि बळकटी येईल. महिलांनी गरोदरपणात कोणताही व्यायाम किंवा योगाभ्यास करताना विशेषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

 • टिप्पणी
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Tools

Trying to conceive? Track your most fertile days here!

Ovulation Calculator

Are you pregnant? Track your pregnancy weeks here!

Duedate Calculator
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}