• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
अन्न आणि पोषण गर्भधारणा

गर्भधारणा पोषण काय असावे ?

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jan 18, 2022

गर्भधारणा पोषण काय असावे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

गर्भारपणात आईच्या आहारावर तिचे व तिच्या बाळाचे आरोग्य अवलंबून असते त्यामुळे गर्भवती स्त्रीने सकस, पुरेसा व पोषक आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहार व्यवस्था ही माता आणि बाळ या दोघांना विचारात घेऊन केली पाहिजे. गर्भावस्थेत आहाराबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. या दरम्यान स्त्री अनेक मानसिक व शाररिक बदलातून जात असते त्यामुळे काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. गर्भावस्थेमध्ये खालील घटकांचा आहारामध्ये समावेश करावा. 
 

गर्भधारणा पोषण काय असावे ?

 • दुध व दुग्धजन्य पदार्थ पौष्टिकतेने भरलेले असतात. आहारात दुध आणि तुप यांचा समावेश करावा. गर्भारपणात स्त्रीच्या शरीराला कॅल्शियम होणे महत्वाचे आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थांमुळे बाळाच्या हाडांचा सर्वांगीण विकास होतो. गर्भवती स्त्रीने दररोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी पिणे गरजेचे आहे. दुधासोबातच तुप, लोणी, पनीर व ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा.

 • विविध प्रकारची ताजी रसदार फळे, हिरव्या पालेभाज्यातून भ्रूणाच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण तत्वे मिळतात. मेथी, शेपू, अळू, पालक, गवार अशी कोणतीही भाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात असलीचं पाहिजे. मेथी व पालक या पालेभाज्यांमध्ये असलेली जीवनसत्वे, खनिज आणि कॅल्शियम शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेची आहेत. गाजर, बीट, टोमाटो, काकडी यांच्या आहारात समाविष्ट करावा. चिकु, सफरचंद, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरीज, द्राक्ष अशा प्रकारची फळे खावीत.

 • गर्भावस्थेमध्ये प्रोटीनयुक्त आहार योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. विविध डाळी, मासे, अंडी यांतून प्रोटीन मिळते. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी. अंड्यांचे सेवन उत्तम दर्जाचे प्रोटीन्स पुरावतात, जास्त कॅलरीज वाढवत नाहीत मात्र उत्तम प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अॅसिड पुरावतात. याचबरोबरीने बाळाच्या विकासासाठी आवश्यक असलेले फॉलिक अॅसिड व लोह यांचे योग्य प्रमाण राखते त्यामुळे बाळांमध्ये जन्मजात दोष निर्मिती होण्याचे प्रमाण कमी होते.

 • गर्भावस्थेत अॅनेमिया होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी गर्भावस्थेच्या १४ ते १६ व्या आठवड्यानंतर लोहयुक्त आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. गर्भाच्या परिपूर्ण वाढीसाठी फॉलिक अॅसिड अत्यंत महत्वाचे आहे. गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी तसेच जन्मजात मज्जासंस्थेसंबंधीचे दोष टाळण्यासाठी फॉलिक अॅसिडचा आहारात समावेश असणे महत्त्वाचे आहे.

 • शरीरात रक्ताची कमतरता आणि संक्रमणापासून वाचविण्यासाठी शरीरातील आयर्न मदत करतात. मूल आणि त्याच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. पूर्ण गर्भावस्थे दरम्यान अतिरिक्त ७०० मिलीग्रॅम आयर्नची गरज असते. लीन मीट, स्कीनलेस चिकन, मासे, उकडलेली अंडी, डाळ, हिरव्या भाज्या, सुका मेवा, गहू यांसारख्या पदार्थांत आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. शरीरातील आयर्नची कमी भरून काढण्यासाठी विटॅमिन सी युक्त फळांचं सेवन फायदेशीर ठरतं.

 • गर्भावस्थेत दिवसभरात साधारणपणे ७-८ ग्लास पाणी प्यावे. शरीरातील तसेच मूत्रमार्गातील विषारी घटक पाण्यामुळे दूर होतात. पोट साफ राहते व शौचास स्वच्छ होते. गर्भारपणात मूत्रमार्गात होणारा संसर्ग दूर होतो.

 • गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. मिठाई, बेकरी पदार्थ, कंदमुळे, जंकफूड, फास्टफूड, हवाबंद पदार्थांपासून दूर रहावे. नवनवीन अन्नपदार्थ प्रयोग म्हणून आजमावून पाहणे टाळा. 
  शिळे, अर्ध कच्चे राहिलेले पदार्थ खाऊ नयेत. सॅच्यूरेटेड फॅट्स असलेले खाद्य पदार्थ खाणे टाळा. पाश्चराईज न केलेल दूध व दूधाचे पदार्थ,प्रक्रिया केलेले पदार्थ,रस्यावर विकलेले पदार्थ,तिखट व तेलकट पदार्थ खाणे टाळा.

 • कडधान्य व धान्यांचा आहारातील समावेश कार्बोहायड्रेड्स व फायबर पुरवतात, ज्यामुळे उर्जा मिळते. गर्भारपणातील बद्धकोष्ठतेशी लढायला फायबर मदत करते. कर्बोदक व फायबरच्या पूरक सेवनाने तुमच्या शरीरातील पेशी मजबूत होतात, त्यामुळे स्त्रिया गर्भावस्थेतील व  प्रसूतीकाळातील तणाव सहन करू शकता.

 

एका सामान्य स्त्रीला दिवसभरात १८०० ते २००० कॅलरीची आवशक्ता असते. गरोदरपणी स्त्रीला तिच्या व बाळाच्या पोषणासाठी अधिक २१०० - २३०० कॅलरीची गरज असू शकते. असे असले तरी कधीकधी गरोदरपणी तुमच्या शरीराला आवश्यक आहार व कॅलरीची गरज परिस्थिीनूसार कमी अथवा जास्त होऊ शकते

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}