• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
अन्न आणि पोषण गर्भधारणा

गर्भावस्थेतील आहार आणि पथ्य

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Dec 12, 2019

गर्भावस्थेतील आहार आणि पथ्य

गर्भावस्थेत आहाराचे अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणामध्ये गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने पौष्टिक आहाराचे सेवन करावे आणि आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. आज आम्ही तुमच्यासाठी गर्भावस्थेत आहाराबाबत  काही खास सूचना घेऊन आलो आहोत.

गर्भधारणा वेळ गर्भधारणा आहार पाहिजे काय

 • गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. जेवणाच्या वेळी अगदीच गच्च पोट भरून जेवू नये. अगदी जास्त जेवणामुळे पचनात अडचण येते. दोन घास कमीच खावेत. त्यामुळे पचनात अडचण येत नाही. थोडे थोडे करून 3-4 वेळा ही खाउ शकतात.

 • गर्भावस्थेतील आहार व्यवस्था ही माता आणि शिशु या दोघांना विचारात घेऊन केली पाहिजे.

 • गर्भावस्थेमध्ये आईद्वारे जो आहार घेतला जातो त्या द्वारेच गर्भातील शिशूचे पोषण होत असते. त्यामुळे पोषणतत्व युक्त आहाराचे सेवन करावा, म्हणजे आई आणि शिशू यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. 

 • जीवनसत्वे, कॅल्शीयम, लोह, प्रोटीन (प्रथिन), कर्बोदके, फॉलिक ऍसिड, फायबर आणि मिनरल्स चा आहारात भरपूर समावेश असावा. पौष्टिक आहार घेतल्याने स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते. लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ‘A’, ‘C’ आणि ‘D’ ही घटकद्रव्ये गर्भस्थ शिशुच्या वृद्धि आणि विकासासाठी आवश्यक असतात.

 • भोजनाच्या मात्रेपेक्षा गुणवत्तायुक्त पौष्टिक आहाराचे सेवन करावे. भोजनाच्या मात्रेपेक्षा गुणवत्तायुक्त पौष्टिक आहाराचे सेवन करावे.

 • गर्भावस्थेमध्ये वेळच्या वेळी आहार सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

 • गर्भवतीचा आहार हा पोषकतत्वांनी भरपूर, सुपाच्य व संतुलित असला पाहिजे.

 • गर्भावस्थेमध्ये वेळच्या वेळी आहार सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

 • गरोदर स्त्रीने शक्यतो ताजे अन्न खावे.

 • गर्भावस्थेत रक्ताल्पता होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी गर्भावस्थेच्या १४ ते १६ व्या आठवड्यानंतर लोह आणि कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.

 • जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. पाणी उकळून प्यावे. दिवसभरात साधारणपणे ६-८  तांबे पाणी प्यावे. बद्धकोष्टता होणार नाही याची काळजी घ्यावी.

 • दिवसातून किमान तीन वेळा थोडे थोडे करून जेवावे.

 • आयोडीनयुक्त मीठाचा आहारात प्रमाणामध्ये समावेश करावा.आयोडीनयुक्त मीठाच्या सेवनाने बालकाचा शारिरीक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यास मदत होते. म्हणून आयोडीनयुक्त मीठाचे सेवन करावे.

 • मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची पालेभाजी जेवणात असायला हवीत.

 • गर्भावस्थेमध्ये प्रोटीनयुक्त आहार योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. विविध डाळी, मांसाहार, मासे, अंडी यांतून प्रोटीन मिळते, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करावा. शाकाहारी लोकांनी जेवणात कोणत्याही डाळीचे घट्ट वरण आणि मोड आलेली मटकी, दूध, हरभरे, भुईमुगाचे दाने, मूग, वाटाणे, सोयाबीन अशी कडधान्ये खाल्यास आवश्यक ती प्रथिने मिळतात.

 • रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे. मात्र दही सेवन करु नये.

 • गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नयेत

 • मिठाई, जंकफूड, फास्टफूड, आणि हवाबंद पदार्थ टाळावेत.

 • विविध प्रकारची ताजी रसदार फळे हिरव्या पालेभाज्यातून बाळाच्या विकासासाठी आवश्यक पोषण तत्वे मिळतात. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमाटो, काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले. चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.

 • गर्भारपणात उपवास व डाएट करणे टाळा. याचा विपरित परिणाम आपल्या व बाळाच्या आरोग्यावर होउ शकते.

 

गर्भावस्थेत नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. आई आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

 • 2
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.

| Aug 22, 2019

jshjhhgdhh

 • अहवाल

| Aug 16, 2019

mi aata 5 month aahe balache vajan kami aahe tar kay upya

 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

Always looking for healthy meal ideas for your child?

Get meal plans
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}