• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गर्भवती महिलांनी उष्णतेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी !

Tejashri Askar
गर्भधारणा

Tejashri Askar च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 20, 2020

गर्भवती महिलांनी उष्णतेपासून स्वतचे रक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

जगातील प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा ही सर्वात सुंदर भावना असते, परंतु गर्भवती महिलांना पाठ दुखणे, डोकेदुखी, मळमळ तसेच उलट्या यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर आजच्या ब्लॉग द्वारे आपण या कडक उष्णतेमध्ये गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असे काही उपाय बघणार आहोत ज्यामुळे गर्भवती महिलेला उष्णतेपासून वाचविण्यात किंवा उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

उन्हाळ्याच्या काळात गर्भवती महिलांना आरोग्य अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आणि गर्भधारणेदरम्यान, गर्भवती महिलेला नेहमीच उन्हाळ्याच्या काळात थंड खायला प्यायला आवडते, परंतु गरोदरपणात जास्त थंड गोष्टी खाल्ल्यामुळे सूजेची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, गर्भवती महिलेने उष्णता टाळण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

उष्णतेपासून बचावासाठी गर्भवती महिलांनी स्वत:ची पुढील प्रकारे काळजी घेतली पाहिजे-

 1. निरोगी अन्नाचे सेवन- सहसा उन्हाळ्यामध्ये भूक कमी होते, परंतु गर्भधारणेदरम्यान प्रथिने खाणे फार महत्वाचे असते. भाजीपाला आधारित प्रथिने पावडर, बेरी आणि नारळ पाणी याबरोबरच प्रथिने खावित. आपल्या आहारात अ‍ॅव्होकॅडोचा समावेश करा.
   
 2. हायड्रेटेड रहा- गर्भधारणेदरम्यान, गर्भवती महिलेने दररोज कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाण्याचे सेवन करायला हवे. जर आपण उन्हाळ्यात बाहेर जात असाल तर कमी साखरयुक्त इलेक्ट्रोलाइट द्रव प्या. थोडक्यात,शक्य होइल तितके जास्त पाणी पिउन हायड्रेटेड रहावे.
   
 3. मीठाचे प्रमाण तपासा -मीठामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे शरीरावर सूज येण्याची शक्यता वाढते. सोडियम आपल्या शरीरातील बाहेरील आहारामधून येतो. म्हणून गर्भवती महिलांनी काहीही खाण्यापूर्वी त्यांच्या सोडियमची पातळी तपासली पाहिजे. गरोदरपणात फास्ट फूड आणि पॅकेड फूड टाळायला हवे. तसेच, फळे आणि कच्च्या भाज्या चांगल्या धुवून मग सेवन करावे. ज्यामुळे मीठाचे प्रमाण कमी राहील आणि गरम होणार नाहीं.
   
 4. आरामदायी थंड टॉवेल-डोक्यावर किंवा मानेवर थंड टॉवेल गरोदरपणात गर्भवती महिलांना उष्णतेपासून थोडा आराम देऊ शकतो. या अशा कही बाबी आहेत ज्या उन्हाळ्यात आपल्याला थोडा थंडावा देऊ शकतात . असा थंड टॉवेल, जो मऊ, रासायन मुक्त असेल आणि त्वचेच्या तपमानापेक्षा 30 टक्के जास्त थंड असेल.
   
 5. आपले घर जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा प्रयत्न करा-उन्हाळ्याच्या दिवसात आपले घर जास्तीत जास्त थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त गरमीमुळे उन्हाळ्यात नीट झोप लागत नाही किंवा आरामही होत नाही. म्हणून आपले घर थंड ठेवण्यासाठी आपण घराच्या खिडक्यामध्ये पडदे टाकू शकता ज्यामधून सूर्यप्रकाश आत येतो. या हवामानात, जर एसी किंवा कुलर आपल्या घरात असेल तर आपले कपडे शक्यतो घरामध्येच सुकवा. जेव्हा बाहेरून येणारी हवा या ओल्या कपड्यांना धडकेल तेव्हा आपोआप घर थंड व्हायला मदत होईल.
   
 6. फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये काही काकडीचे तुकडे थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतर ते आपल्या डोळ्यांच्या वर ठेवा. आपण थंड पाण्यात भिजलेल्या सूती स्वॅब किंवा टी बैग्स देखील वापरू शकता ज्यामुळे आराम मिळेल. 

उन्हाळ्यासाठी पोशाख

 • शक्यतो सूर्यप्रकाश टाळण्यासाठी सैल कपडे आणि टोपी वापरा. उन्हाळ्याच्या काळात गडद रंग घालण्याचे  टाळा कारण ते सूर्य किरणांना आकर्षित करतात. गर्भवती महिलेने सहसा सूती कपडेच वापरावेत.
   
 • पॉलिस्टर, कंपोझिट आणि सिंथेटिक फायबर असे फॅब्रिक घालणे टाळा. या कपड्यांमुळे त्वचेसाठी नैसर्गिक कपड्यांपेक्षा श्वास घेणे कठीण होते. त्याऐवजी कमी उष्णता असलेले सुती कपडे, तागाचे किंवा खादीचे कपडे घालणे उत्तम. तसेच, हलक्या रंगाचे कपडे सहसा गडद रंगांपेक्षा कमी उष्णता शोषून घेतात.
   
 • आपण काही नोकरी करीत असाल तर, आपल्या कामाचे तास कमी करण्याचा विचार करा. कारण गर्भधारणेदरम्यान गर्भवती महिलेने स्वतःची तसेच बाळाचीही विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आरामदेखील केला पाहिजे.
   
 • व्यायाम- गर्भवती महिलेने सक्रिय आणि ताजेतवाने वाटन्यासाठी दररोज योगासने आणि व्यायाम करायला हवा. जर आपण व्यायाम करत असाल तर पाणी पिण्याचे प्रमाण जास्त असले पाहिजे. योग आणि व्यायाम आपल्याला ऊर्जा देईल आणि शांत करण्यास मदत करतील. या कडक उन्हाळ्यात थंड गर्भधारणेसाठी व्यायाम करणे हा एक चांगला उपाय आहे.

प्रस्तुत लेखामध्ये आम्ही गर्भवती महिलांना उन्हाळ्यातील कड़क उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टिप्स दिल्या आहेत. या टिप्स उन्हाळ्यात आपला गर्भधारणेचा वेळ सहज आणि प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात नक्कीच मदत करतील. जर आपल्याला उष्णतेमुळे काही त्रास होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 2
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Apr 21, 2020

मस्त👌👌

 • Reply
 • अहवाल

| Apr 21, 2020

धन्यवाद

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}