गर्भावस्था, सामान्य आजार आणि समस्या

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Nov 28, 2018

गरोदरपणात सर्व स्त्रियांना सतावणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे मळमळ, उलट्या असे सकाळचे आजार. हे साधारणपणे गर्भधारणेच्या ४थ्या ते ६व्या आठवड्यांपासून सुरू होते आणि १४व्या ते १६व्या आठवड्यांपर्यंत टिकते. काही स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत सकाळच्या आजारांचा त्रास होऊ शकतो. यामुळे हलकीशी मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. सकाळच्या आजारांचे कारण हे शरीरामधील हार्मोनमध्ये होणाऱ्या प्रचंड बदलांमुळे होत असल्याचे मानले जाते. गरोदरपणातील मळमळ आणि उलट्या यांची काही संभाव्य कारणे ही हार्मोनमधील स्रवांशीच संबंधित असतात.
-
एचसीजी हार्मोनमुळे मळमळ होते. गरोदरपणात शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ह्युमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) या हार्मोनचा स्राव होतो. यामुळे आईच्या अंडाशयातून इस्ट्रोजेन स्रवते, त्यामुळे मळमळ होते.
-
गर्भधारणेदरम्यान लोह कमतरता ऍनिमिया सर्वात सामान्य आहे. भारतीय स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता अनीमिया जगातील सर्वात जास्त आहे. रक्तातील हीमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा कमी असते. याला 'लोहाची कमतरता' किंवा 'रक्त कमी' असेही म्हटले जाते. हेमोग्लोबिन लाल रक्तपेशींच्या आणि ऑक्सिजनच्या संग्रहात मदत करते. रक्तातील पुरेसे हीमोग्लोबिन नसल्यामुळे शरीरातील भाग आणि उतींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळणार नाही.
-
प्रोजेस्टरोनमुळे स्नायू शिथिल होतात. गरोदरपणात प्रोजेस्टरोनची पातळी वाढल्यामुळे गर्भाशयाचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे बाळाची वाढ आणि जन्म सोपे होते. मात्र, याच कारणाने पोट आणि आतड्यांचे स्नायू देखील शिथिल होतात, त्यामुळे अतिरिक्त गॅस्ट्रिक अॅसिड स्रवते, आणि त्यामुळे गॅस्ट्रो-इसोफेगल रिफ्लक्स (पोटातील आम्ल उलट्या दिशेने वाहते आणि छातीत जळजळ होते) होते. ऊर्जेचे प्लॅसेन्टल ड्रेनेज झाल्यामुळे रक्तातील साखर कमी होते (हायपोग्लायसेमिया).
-
वासाबद्दल अति संवेदनशील होणे. अनेक गरोदर स्त्रियांमध्ये हा सर्वात जास्त आढळणाऱ्या त्रासापैकी एक आहे. वासाबद्दलची संवेदना वाढल्यामुळे पचनसंस्था अति उत्तेजित होते आणि त्यामुळे गॅस्ट्रिक अॅसिड बाहेर पडते आणि त्यामुळे उलट्यादेखील होऊ शकतात.
-
बिलिरूबीनच्या (यकृतामध्ये आढळणारे एन्झाईम) पातळीत वाढ झाल्यामुळे देखील उटल्या होऊ शकतात.
-
पहिल्या 3 महिन्यांमध्ये थायरॉईड गर्भवतींसाठी धोकादायक आहे. गर्भवती महिलांमध्ये थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे. थायरॉईडची समस्या गंभीर झाल्यास बाळाला धोका असू शकतो. थायरॉईडचा पचनांवर चांगला प्रभाव पडतो. थायरॉईड रोगाच्या दरम्यान पाचन मार्ग 50 टक्क्यांनी कमी होते. एवढेच नव्हे तर थायरॉईड ग्रंथीपेक्षा जास्त पाचन क्रियावर प्रभाव पडतो, ज्यामुळे मोठ्या आरोग्य समस्यांसह गर्भधारणेदरम्यान धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते.
-
पहिल्या तिमाहीत गर्भाची पिशवी लघवीच्या पिशवीवर दाबली जाते. यामुळे लघवी वारंवार होते. दुस-या तिमाहीत गर्भाशय वाढून मूत्राशयाच्या वर गेले, की हा त्रास आपोआप थांबतो.
-
लघवीच्या मार्गावर गर्भाशयाचा दाब पडून जळजळ, लघवी अडकणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास तीन-चार महिन्यांनंतर थांबतो. फार त्रास होत असेल तर मात्र रुग्णालयात नेऊन मूत्रमार्गात नळी घालून लघवी मोकळी करावी लागते.
-
गर्भाशयाच्या दाबामुळे गुदाशयावर दाब देऊन मलविसर्जनाला अडथळा येतो. तसेच गर्भावस्थेत शरीरात जे संप्रेरक रस निर्माण झालेले असतात त्यांच्यामुळे आतडयाची हालचाल कमी होऊन बध्दकोष्ठाची प्रवृत्ती तयार होते. जेवणात भाजीपाला भरपूर असेल तर बध्दकोष्ठाची तक्रार सहसा निर्माण होत नाही. जुलाबाचे कोणतेही औषध गरोदरपणात घेऊ नये, त्यामुळे गर्भपाताची भीती असते. सौम्य रेचक घेणे पुरेसे असते.
-
गरोदरपणात काही जणींच्या हिरडया सुजून लालसर दिसतात व दुखतात.
-
गर्भाशयाचे वजन पोटातल्या मुख्य रक्तवाहिन्यांवर पडून पायावरच्या शिरांमधून रक्त साठते. याचमुळे गुदद्वाराच्या नीलाही फुगतात. रक्तप्रवाहात असा अडथळा विशेष करून उताणे झोपून राहिल्याच्या अवस्थेत होतो. यावर उपचार म्हणजे झोपताना पायथ्याकडची बाजू उंच करणे. बहुतेक वेळा पायावरच्या शिरांची सूज बाळंतपणानंतर कमी होते.
-
गर्भाशयाचा दाब पोटातल्या नीलांवर आल्याने मूळव्याधीचे मोड दिसतात. हे मोड दुखत नाहीत व रक्तस्रावही होत नाही. यासाठी तिखट मसालेदार पदार्थ टाळणे, पालेभाज्या खाणे, या उपायांबरोबर मूळव्याध मलमाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

| Jan 03, 2019
मॕडम 5 तारखेला ग़हण आहे आणि ते भारतात दिसणार नाही मग ग़हण पाळायचा का