• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
अन्न आणि पोषण गर्भधारणा

आपल्या गरोदरपणासाठी 4 मधुर अन्न रेसेपी

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 21, 2021

आपल्या गरोदरपणासाठी 4 मधुर अन्न रेसेपी
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

गर्भधारणा दरम्यान पाककृती काय पाहिजे

सालवाली मुगाची डाळ वापरून बनवलेले लाडू अधिक पौष्टिक आहेत. हे लाडू गरोदर आणि स्तनपान देणार् या स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत

#1. मुगाचे लाडू

सालवाली मुगाची डाळ वापरून बनवलेले लाडू अधिक पौष्टिक आहेत. हे लाडू गरोदर आणि स्तनपान देणार्या स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

साहित्य:

सालवाली मुगाची डाळ - २५० ग्रॅम
पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम 
साजूक तूप - १२५ ग्रॅम
बदाम पूड - अर्धी वाटी 
खारीक पूड - साधारण अर्धी वाटी
डिंक - २ टेबलस्पून
काळ्या मनुका - अर्धी वाटी 
जायफळ पूड - अर्धा टीस्पून
वेलची पूड - १ टीस्पून

कृती:

सालवाली मुगाची डाळ गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दळावी. डिंक थोड्याशा तुपात तळून घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा. पिठीसाखरेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी. जाड बुडाच्या एका नॉन-स्टिक पॅनमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम आचेवर  भाजावे. सतत हलवावे, अन्यथा खालून जळण्याची भीती असते. थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर व इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू वळावेत.

#2. शिंगाड्याचे ढोकळा

शिंगाड्याचे काही उपयुक्त गुण आहेत. गरोदर स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे आहे.  शरीराला हवे असणारे फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शिअम व फायबर्स ह्या एका फळातून आपल्याला मिळतात.

साहित्य:
२ वाट्या शिंगाड्याचे पीठ
१ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट
२ वाट्या आंबटसर ताक
मीठ (स्वादानुसार)
मिरची (स्वादानुसार)
आले
जिरे
खायचा सोडा

कृती:
सकाळी शिंगाड्याच्या पिठात थोडेसे आंबटसर ताक घालून भिजवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले,शेंगदाण्याचे कुट, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापून घ्याव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा उपवासाच्या चटणी बरोबर वाढावात. आवडत असल्यास वरून जिऱ्याची फोडणी करून ढोकळ्यावर घालावी.

#3. बेसन पोळी

साहित्य

दोन वाटया डाळीचं पीठ

तीन मिरच्या किंवा दीड चमचे तिखट

पाच-सहा लसूण पाकळ्या

अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट

एक चमचा जिरं , पाव वाटी तेल

दोन वाटया कणीक

दोन वाटया पाणी

चार चमचे तेल

एक चमचा मीठ

कृती :-

दोन वाटया डाळीच्या पिठात मीठ घालावं .  मग लसूण , जिरं , मिरची व शेंगदाण्याचा कूट बारीक वाटून त्याचा गोळा या पिठात मिसळावा आणि दोन वाटया पाणी घालावं. कढईत पाव वाटी तेल घालून तापवावं. त्यात हे मिश्रण ओतावं  आणि थोडं हलवून झाकण ठेवावं. दोन-तीन सणसणीत वाफा आणाव्यात व गार होऊ दयावं. मिश्रणाचा  गोळा झाला पाहिजे. दरम्यान कणीक नेहमीप्रमाणे भिजवावी आणि तेल लावून मळून मऊ करून  घ्यावी. मग पुरणाच्या पोळ्या करतो तशा उंडा भरून या बेसन पोळ्या करायच्या आहेत. फक्त बेसनाचा गोळा उंड्यात भरण्यापूर्वी तो कोरडया कणकेत घोळवून घ्यावा   व मग भरावा म्हणजे चांगला लाटता येतो. या पोळ्या नॉनस्टिक तव्यावर तेल सोडून खरपूस भाजाव्यात.

 

#4. पालकाची पोळी

गरोदर महिलांना हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे.

साहित्य

३ मोठे चमचे तूप

१/२ छोटा चमचा तेल

कणिक भिजवण्यासाठी

दिड वाटी गव्ह्याचे पीठ

अर्धी वाटी पालकाची पेस्ट

१ छोटा चमचा (हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची )पेस्ट

१ छोटा चमचा मीठ

पाव छोटा चमचा गरम मसाला

अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड

१ छोटा चमचा धने पूड

कृती : -

एका मोठ्या परातीत कणिक भिजवण्यासाठी वर दिलेले सर्व साहित्य घेणे. थोडे-थोडे पाणी घालून पोळ्यांना मळतो तशी मऊसर कणिक मळून घ्यावी. अर्धा चमचा तेल कणकेच्या गोळ्याला लाऊन अजून दोन मिनटे मळावे. हा मळलेला कणकेचा गोळा कमीतकमी २५ मिनटे झाकून ठेवावा. ह्या गोळ्याचे १० सारखे भाग करून घ्यावे. एकेक करून ह्या पालकाच्या पोळ्या लाटून तूप लावून गरम तव्यावर खरपूस भाजाव्यात. गरमागरम पराठे, रायत्यासोबत खायला द्यावे.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 5
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| May 31, 2019

unhalat mde kahi khaychi kaynhi

 • Reply
 • अहवाल

| Aug 17, 2019

wffdi

 • Reply
 • अहवाल

| Mar 09, 2020

 • Reply
 • अहवाल

| Mar 09, 2020

 • Reply
 • अहवाल

| Mar 17, 2020

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर अन्न आणि पोषण ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}