• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गर्भधारणा मिथक आणि तथ्य काय आहेत?

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 29, 2019

गर्भधारणा मिथक आणि तथ्य काय आहेत

गरोदरपणातील ओळखीतील जवळपास प्रत्येकजण काय करावे आणि काय करू नये याबद्दल निरनिराळे सल्ले देत असतो. मात्र, त्यांच्यापैकी बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्या तरी अनेक गोष्टी मिथकेच असतात.

7 गरोदरपणातील मिथके आणि तथ्ये

#1. सकाळी होणारा त्रास म्हणजे बाळाला कदाचित पुरेसे पोषण मिळत नाही - 

सत्य हे आहे की, सकाळी होणारा त्रास म्हणजे गरोदरपणाच्या लक्षणांपैकी एक सर्वात सामान्य लक्षण आहे, ते शरीरातील हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होते. या अवस्थेमध्ये अन्न दिसल्यामुळे, त्याच्या वासामुळे किंवा विचारामुळेही मळमळू शकते. गरोदरपणातील पहिल्या काही महिन्यांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण कमी असते. उलट, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही स्त्रियांचे वजन कमी होते. शरीरातील पाणी कमी होणे, वजन प्रचंड कमी होणे किंवा सकाळचा त्रास गंभीर होणे अशी दक्षतेची लक्षणे तुम्हाला आढळत नाहीत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. बाळाला शक्य असेल तोपर्यंत स्वतःच्या पोषणाच्या सर्व गरजा ते आईच्या शरीरातून भागवेल आणि गरोदर राहण्यापूर्वी आईचे आरोग्य चांगले असेल तर, पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत बाळाच्या आरोग्याची चिंचा करण्याची गरज नसते. डॉक्टरांचा सल्ला काटेकोरपणे पाळा आणि सल्ला दिल्याप्रमाणे पूरक आहार घ्या.
 

#2. पोटाला होणाऱ्या हलक्याशा स्पर्शानेही बाळाला इजा होऊ शकते - 

गर्भाशयात बाळाचे चांगले संरक्षण असते आणि ते तरंगत असलेल्या अॅम्नियॉटिक द्रवामुळे हलके धक्के, अडथळे आणि पडणे अशा गोष्टींनी त्याला धक्के बसत नाहीत. त्याशिवाय ओटीपोटाचे स्तर हे किरकोळ अपघातांमध्येही गर्भाचे संरक्षण करते. मात्र, कळा आल्या किंवा योनीतून रक्तस्राव झाला तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
 

#3. जड वस्तू वाहून नेल्यास प्रसववेदनांना चालना मिळेल - 

हे अंशतः खरे आहे. जड सामान उचलल्यामुळे पाठीचे दुखणे वाढू शकते आणि त्यामुळे मणक्याला इजा होऊ शकते. मात्र, त्याचा ताण पडत नसेल आणि ते योग्य प्रकारे केले तर काही प्रमाणात वजन उचलणे ठीक आहे. उदाहरणार्थ, वाणसामानाच्या पिशव्या आणि लहान मुलांना उचलणे तुम्ही योग्य प्रकारे केल्यास ते अगदी योग्य ठरेल. कोणतीही वस्तू उचलण्यासाठी गुडघ्यांमधून वाका आणि ती शरीराजवळ ठेवून वाहून न्या. पाठीवर वाकू नका म्हणजे त्यामुळे पाठीवर परिणाम होणार नाही.
 

#4. व्यायामाने बाळाचे नुकसान होईल - 

कोणताही व्यायामप्रकार डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुरू केला पाहिजे. तंदुरुस्त राहिल्यामुळे तग धरण्याची क्षमता वाढते आणि बाळाच्या जन्माच्या थकवणाऱ्या प्रक्रियेसाठी तयारी होते. व्यायाम केल्याने थकत नसल किंवा अंगात उष्णता अधिक वाढल्यासारखे वाटत नसेल किंवा श्वास लागत नसेल तर व्यायाम करू शकता. उलट ज्या स्त्रियांना व्यायामाची सवय नसते त्यांना अनेकदा गरोदरपणात थोडा व्यायाम सुरु करण्याचा सल्ला दिला जातो. वेगाने चालणे हा सर्वात सुरक्षित व्यायाम असू शकतो. गरोदर स्त्रिया पोहोणे सुरू ठेवू शकतात. प्रशिक्षित व्यावसायिकाच्या देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा. तसेच श्वसनाचे व्यायाम, योगासने आणि प्राणायम प्रमाणपत्रधारक प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली करू शकता. व्यायाम करत असताना शरीरात पुरेसे पाणी राहील याची खबरदारी घ्या.
 

#5. गरोदर स्त्रियांसाठी हवाई प्रवास सुरक्षित नसतो - 

हे अंशतः खरे आहे. तुमच्या प्रसूतीची तारीख ६ आठवड्यांपेक्षा दूर असेल तर एखाद वेळेला हवाई प्रवास करणे अगदी सुरक्षित असते. हवाई प्रवास लांबचा असेल तर विमानात थोडे फिरा आणि पाय पसरून बसा. सातत्याने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी थोडी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.
 

#6. मोबाईल, मायक्रोवेव्ह आणि कम्प्युटरसुद्धा हानीकारक असतात - 

कम्प्युटर हे संपूर्णतः सुरक्षित असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. मायक्रोवेव्हचा विचार करता, त्यातून गळती होत असेल तरच किरणोत्सर्गाचा धोका असतो. सुरक्षेचा उपाय म्हणून हे चालू असताना त्यापासून जितक्या सुरक्षित अंतरावर राहू शकाल तितके राहा. याच प्रकारे, मोबाईलमुळे बाळावर कोणताही परिणाम होत नाही.
 

#7. माझे बाळ फार फिरताना दिसत नाही, त्याचा विकास हळू होत आहे का ? 

नाही. बाळाची हालचाल त्याच्या वेगाने सुरू होते आणि त्याच वेगाने सुरू राहते. बाळांच्या हालचालींची अत्यंत काळजी वाटत असेल तर, अधूनमधून मोजत राहा.
 

गरोदर असताना माझे केस डायने रंगवू नयेत खरे आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये हेअर कलरसारखी रसायने टाळणे सर्वोत्तम, कारण ही रसायने टाळूमध्ये शोषली जातात आणि रक्तप्रवाहात मिसळतात. नैसर्गिक आणि वनस्पतींपासून तयार केलेल्या केसांच्या रंगांना प्राधान्य द्यावे.

 

  • टिप्पणी
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

Always looking for healthy meal ideas for your child?

Get meal plans
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}