• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

गुढीपाडवा एक आनंदोत्सव : महत्त्व,दंतकथा,संतवाणी

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 01, 2022

गुढीपाडवा एक आनंदोत्सव महत्त्वदंतकथासंतवाणी
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

पुरातन काळापासुन अनेक धर्मातील ,ग्रंथात पुराणांमध्ये काठी पूजेचा उल्लेख केलाला आपणास बघायला मिळतो काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे तसेच विदेशात जसे आफ्रिका, इस्राईल, युरोप अशा देशांत अनेक धर्मातील पुराणांमध्ये काठी पूजेचा उल्लेख केलेला दिसतो. 

 • साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला नवनिर्मितीची जणु चाहूल लागते सर्वाचा नवीन वस्तू खरेदीकडे कल असतो ,नवीन व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सोन्याची खरेदी आदी गोष्टींचा शुभारंभ लोक करतात म्हणजे नवीन गोष्टीसाठी हा दिवस शुभ मानला जातो आणि याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.
 • गुढी पाडवा हा आपल्या हिंदू कॅलेंडर नुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते 


या सणाच्या मागच्या दंतकथा

 • या सणाच्या मागच्या अनेक कथा दंतकथा सांगितल्या जातात. गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर,पण कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा. 

 

 • या दिवशी फार वर्ष जुनी गोष्ट आहे  शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता शक राजायाचे वास्तव्य महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी होते. शालिवाहन हा राजा अत्यंत न्यायप्रिय होता. त्याने आक्रमक अशा शंकाना पराभूत करून करून आनंदाच्या प्रित्यर्थ नवीन अशी कालगणना सुरु केली.  त्याला पुढे शक असे म्हटले जाऊ लागले.शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत.

 

 • उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात

 

 • तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.

 

 • श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.


सामाजिक कार्यक्रम 

१.अनेक ठिकाणी,चोफुलीवर पताका , होल्डींग्स लावून लोक या दिवसाचे स्वागत करतात. 

२. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. 

३. डोलताशे नगारे वाजवून या दिवसाचे स्वागत होते जेणे करून पुर्ण वर्ष आनंदीआनंद साजरा होईल. 

४.ठीक ठिकाणी रांगोळ्या , प्रभात फेऱ्या , पाडवा पहाट असे रंगारंग कार्यक्रम आपणास बघावयास मिळतात. 


गुडीपाडवाचें वर्णन संतांनी देखील अतिशय मार्मिक पध्दतीने केललं दिसते. 

यावरून आपण समजू शकतो गुडीपाडव्यास किती प्राचीन परंपरा लाभली आहे.  

१) संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे.

एकें संन्यासी तोचि योगी।
ऐसी एकवाक्यतेची जगीं। 
गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरीं।।

एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.

२) तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या अभंगात ते म्हणतात

पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । 
देउनि चपळां हातीं गुढी ॥

३) कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या 'गुढी उभारनी' या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. 

आरंभ होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

तुमच्या सूचना आमचा पुढचा ब्लॉग उत्तम बनवू शकतो, मग कृपया टिप्पणी द्या, जर तुम्ही ब्लॉग मध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर ते नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 4
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Apr 01, 2022

Nice 👌 vachun chhan vatle

 • Reply | 1 Reply
 • अहवाल

| Apr 01, 2022

Nice explained....

 • Reply | 1 Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}