• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा गर्भधारणा

गर्भावास्थेतील डोकेदुखीची कारणे आणि त्यावरील घरगुती उपचार

Tejashri Askar
गर्भधारणा

Tejashri Askar च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 02, 2020

गर्भावास्थेतील डोकेदुखीची कारणे आणि त्यावरील घरगुती उपचार
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

ज्याप्रकारे गर्भवस्थेमध्ये कंबर दुखने,पाय दुखने किंवा पायावर सूज येने, पोटदुखी या सर्वसामान्य गोष्टी आहेत त्याचप्रमाणे डोकेदुखी हिदेखील अतिशय सामान्य बाब आहे. परंतु गर्भवती महिला यामुळे खुपदा चिंतित होताना दिसतात. आज आपण गर्भावास्थेमध्ये होणारया डोकेदुखी विषयी समजुन घेताना यावरील घरगुती उपचारांसंबंधी बोलणार आहोत.

जर तुम्ही गर्भवती आहात तर तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहाणे तुमच्या तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आतिशय महत्त्वाची बाब आहे. तुम्ही काही दिवसांनी एक गोंडस चिमुरड्याला जन्म देणार आहात ही भावनाच मुळात जगातली सर्वात सुंदर भावना आहे. आजच्या आपल्या लेखामध्ये आपन अशाच गर्भवती स्त्रियांना होणार्या डोकेदुखीच्या त्रासाबद्दल तसेच त्यावरील उपयांबद्दल चर्चा करणार आहोत.

गर्भावास्थेमध्ये होणारी डोकेदुखी सामान्य बाब आहे का ?(Causes of headache in pregnancy)

होय ! गर्भावास्थेमध्ये शरीरातील हार्मोन्स मध्ये होणार्या बदलांमुले गर्भवती स्त्रीयांमधे होणारी डोकेदुखी ही एक सामान्य बाब आहे. सुरुवातीच्या जवळ जवळ तीन महिन्यांपर्यंत डोकेदुखी सतत होऊ शकते,परंतु त्यानंतर थोडा आराम मिलु शकतो. पण फ़क्त हार्मोन्स मध्ये होणारे बदल हेच गर्भवती स्त्रीयांमधील डोकेदुखीचे कारण होऊ शकत नाहीं, तर इतरही काही कारनांमुले डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

 • मानसिक तनाव – गर्भावास्थेमध्ये मानसिक तान-तनावांमुले देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
 • रक्तदाब (Blood pressure) –गर्भावास्थेमध्ये कमी किंवा जास्त रक्तदाब हे देखील दोकेदुखिचे महत्त्वाचे कारण असू शकते.
 • कैफिनयुक्त पदार्थांचे सेवन –गर्भवती स्त्रियांनी कैफिनयुक्त पदार्थांचे सेवन अचानकपने बंद केल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
 • थकवा - गर्भावास्थेमध्ये अति थकवा किंवा अशक्तपना यांमुले देखील डोके दुखु शकते.
 • भूक – कधी कधी गर्भवती स्त्रिया बराच उशिरापर्यंत उपशी पोटाने राहतात ज्यामुले डोकेदुखी होते.  गर्भावास्थेमध्ये स्त्रियांनी वेळेवर आहार घ्यायला हवा.
 • शरीरातील पाण्याची कमतरता – गर्भावास्थेमध्ये योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने देखील डोके दुखु शकते.

गर्भावस्थेमध्ये जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांकड़े केव्हा जायला हवे?

 1. .सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा फार त्रास होत असेल तर
 2. डोखेदुखी बरोबर मानेत दुखत असेल,तसेच ताप असेल तर
 3. गर्भवती महिलांच्या वजनामध्ये वारंवार बदल होत असतील आणि सोबतच डोकेदुखीचा देखील त्रास होत असेल अशा वेळेला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 4. पोटात दुखने- गर्भवती स्त्रियांना डोकेदुखी सोबतच पोटदुखीचा देखील तरस होत असेल तर डॉक्टरांकड़े जावे.
 5. दात दुखने – गर्भवती महिलांना डोकेदुखी होत असेल त्याच बरोबर दात देखील दुखत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भावास्थेमध्ये डोकेदुखीसाठी आपण औषध किंवा गोळ्या घेऊ शकतो का?

कुठल्याही महिलेसाठी गर्भावास्थेचा काळ हा खुप नाजुक असतो, त्यासाठी या दरम्यान गर्भवती स्त्री ची चांगली काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. पण खुपदा कही गर्भवती महिला डोकेदुखी साठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेताना दिसतात,जे गर्भवती स्त्रीयांसाठीच नाही तर बालासाठी देखील हानिकारक ठरू शकते.

गर्भावास्थेमध्ये डोकेदुखीपासून सुटका मिळवन्यासाठी गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा विनाकारण कुठलेही औषध घेऊ नये त्यापेक्षा प्रेगनेंसीच्या सुरुवातीच्या काळातच डॉक्टरांशी अशा औषधांविषयी चर्चा करावी जी आपन डोकेदुखी वर घेऊ शकतो.

गर्भावास्थेमध्ये डोकेदुखीवर कशा प्रकारे उपाय करावा?

 • अरोमापेथी - गर्भावास्थेमध्ये डोकेदुखी होत असेल तर पेपरमिंट तेल आणि लवेंडर तेलाचे कही थेंब रुमाल किंवा टिश्यू पेपर वर टाकुन त्याचा वास घ्यावा,फर्क जाणवेल.
 • होमियोपैथी – गर्भावास्थेतील हलक्या डोकेदुखीवर होमियोपैथीने इलाज होऊ शकतो परंतु यासाठी गर्भवती स्त्रियांनी योग्य डॉक्टरांची निवड करावी.
 • रिफ्लेक्सोलौजी – रिफ्लेक्सोलोजी मध्ये कुथ्याही तेल किंवा लोशन चा वापर न करता अंगठा,बोट किंवा  हातांवर दाब टाकला जातो.नेहमी नेहमी होणार्या डोकेदुखी वर देखील हा एक खुप चांगला उपाय होऊ शकतो.
 • ओस्टियोथेरेपी किंवा कायरोप्रोटिक – गर्भवती महिलांन डोकेदुखी,मानदुखी किंवा खांद्यामधे त्रास होत असेल तर ओस्टियोथेरेपी हा एक उत्तम उपाय आहे,ज्यामध्ये गर्भवती महिलेच्या शरीरातील तनाव बिंदु द्वारे कमी केला जातो.
 • एक्युप्रेशर किंवा एक्यूपंक्चर - एक्युप्रेशर किंवा एक्यूपंक्चरद्वारे शरीरातील काही अवयव जसे की हात,पाय आणि गळा या अवयवांना उत्तेजित केले जाते,ज्यामुळ डोकेदुखीवर आराम मिलु शकतो.

गर्भावास्थेमधील डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कही घरगुती उपाय – (Home remedies for headache in pregnancy)

 1. वाफ घ्या -  एका भांड्यामध्ये गरम पाणी घेउन डोके एखाद्या कपड्याने झाकावे आणि वाफ घ्यावी डोकेदुखीवर आराम मिळेल.
 2. मालिश करा – डोकेदुखी चा त्रास कमी व्हावा यासाठी गर्भवती स्त्रियांनी डोके,मान,कंबर अशा अवयवांची मालिश करून घ्यावी.
 3. अंघोळ करा – गर्भवती स्त्रियांनी थंड पाण्याने अंघोळ केल्यास देखील डोकेदुखीवर काही प्रमाणात आराम भेटू शकतो.
 4. योग्य ब्रा ची निवड करा – गर्भावास्थेमध्ये गर्भवती स्त्रियांच्या स्तानांचे माप नेहमी बदलत असते, ज्यामुले मानेवर तसेच पाठीवर दाब वाढल्या कारणाने डोके दुखु शकते. अशावेळी गर्भवती स्त्रियांनी योग्य मापाच्या ब्रा ची निवड करावी जेणेकरून डोकेदुखीचा त्रास होणार नाही.
 5. हर्बल किंवा अद्रकचा चहा प्या – गर्भावस्थेत डोकेदुखी कमी करण्यासाठी एक चमचा लिम्बाची पाने, लवेंडर आणि कैमोमाइल चा उपयोग करूण हर्बल चहा बनवावा, किंवा अद्रक वापरून बनवलेला चहा प्यावा, यामुळेत डोकेदुखीला आराम मिळेल.
 6. सफरचंदाचा रस प्या -  डोकेदुखीवर एक घरगुती उपाय म्हणून गर्भवती महिलांनी दोन चमचे सफरचंदाचा रस दोन चमचे मधात मिसळून पिल्यास फायदा होतो.

गर्भावास्थेमध्ये डोकेदुखीपासून वाचण्यासाठी काय करावे?

योग्य वेळेत किंवा योग्य प्रमाणात आराम करावा,कारण गर्भवती स्त्रियांसाठी आरामाचे देखील विशेष महत्त्व आहे. तसेच कैफीनयुक्त जे पदार्थ आहेत, उदा. चहा आणि कॉफ़ी यांचे सेवन कमीत कमी प्रमाणात करावे. गर्भवती स्त्रियांना डोकेदुखीच्या त्रासपासून स्वताहाचा बचाव करायचा असेल तर त्यांनी वेळेचे पालन करून वेळेवर पोटभर जेवण करने खुप महत्त्वाचे आहे.

याशिवाय गर्भवती स्त्रियांनी तनावमुक्त राहणे हेदेखील गरजेचे असल्या कारणाने तुम्ही सकाळी फिरायला जाणे आवश्यक असते. व्यायाम केल्याने गर्भवती स्त्रियांचे स्वास्थ्य चांगले रहाते आणि डोकेदुखी पासून आराम देखील मिळतो म्हणून व्यायाम देखील करावा.

गर्भावास्थेमध्ये डोकेदुखी पासून आराम मिळावा यासाठी या आर्टिकलमध्ये दिलेले घरगुती उपाय तुम्ही करूण बघू शकता या उपायांनी नक्कीच गर्भवती स्त्रियांना आराम मिळेल पण जर डोकेदुखीचा असह्नीय त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}